व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या जीवनाबद्दल माहिती | VVS Laxman biography in marathi

भारतीय क्रिकेटमधील व्ही. व्ही. एस. लक्ष्मण ( VVS Laxman) हा लक्षणीय तारा. अनेक क्रिकेट खेळाडूंनी आपली कारकीर्द आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात गाजवली. पण काही मोजके खेळाडू असे आहेत, जे त्यांच्या वेगळ्या निराळ्या गुणवैशिष्ट्यांमुळे आपलं स्थान अढळ ठेऊन आहेत. किरमानी, कर्सन घावरी, सेहवाग, द्रविड, अश्विन, श्रीकांत हे आणखी अनेक आहेत. यांची शैली निराळीच आहे. त्यांचे विक्रम देखील लक्षणीय आहेत.

व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण यांच्या जीवनाबद्दल माहिती | VVS Laxman biography in marathi

वंगीपुरप्पू व्यंकट साई लक्ष्मण हे या खेळाडूचे पूर्ण नाव. जन्म हैद्राबाद येथे १ नोव्हेंबर १९७४. भारतीय क्रिकेट संघात १९९६ मध्ये एन्ट्री. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या संघांविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. आता ही या खेळाडूची सामान्य माहिती. पण या खेळाडूने क्रिकेट कारकिर्दीत व आयुष्यात जे पराक्रम केलेत ते नक्कीच वेगळे आहेत.

त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिले शतक लक्ष्मणने १३ वर्षांखालील वयोगटाच्या सामन्यात झलकवले. त्यावेळी त्याने १५३ धावा केल्या होत्या. हैद्राबाद संघाकडून तो विजयवाडा येथे खेळला होता. १९ वर्षांखालील मालिकेत ११०.२५च्या सरासरीने सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम लक्ष्मणच्या नावे आहे. त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटची सुरुवात शून्याने बाद होण्याने तर झालीच पण एक दिवसीय सामन्याची सुरुवात आणि शेवटी देखील शून्यावर बाद होऊन झाला आहे. १९९९-२०००च्या काळात एका हंगामात सर्वाधिक धावा केल्याचा विक्रम या व्हेरी व्हेरी स्पेशल नावाने लोकप्रिय असलेल्या खेळाडूच्या नावे आहे. त्यावेळी रणजी ट्रॉफीच्या हंगामात त्याने १,४१५ धावा केल्या होत्या. हा विक्रम ठरला. भारतीय क्रिकेट संघात तर त्याची निवड झाली खरी पण कसोटी सामन्यात शतक झळकवण्यासाठी १७ सामन्यांची वाट बघावी लागली.

आस्ट्रेलिया संघांविरुद्ध लक्ष्मण कर्दनकाळच ठरला. प्रत्येक कांगारू गोलंदाजाला लक्ष्मणने जेरीस आणले होते. त्याचं पाहिलं शतक याच संघांविरुद्ध झळकलं. २००० मध्ये झालेल्या या सामन्यात त्याने १६७ धावा केल्या. २००१ मध्ये सौरव गांगुली कर्णधार असताना कंगारूविरुद्ध पहिल्या डावात ६व्या क्रमांकावर आल्यावर ५९ धावा केल्या. त्याचा आत्मविश्वास बघून त्याला दुसऱ्या डावात तिसऱ्या क्रमांकावर पाठवले. तेव्हा लक्ष्मणने २८१ धावा करून भारताला विजयी बनवले. या संघांविरुद्ध त्याने २९ सामने खेळले आणि २,४३४ धावा केल्या. २१ एकदिवसीय सामने खेळून ७३९ धावा केल्या.

लक्षमणची कामगिरी खरोखर अफलातूनच आहे. त्याच्या कारकिर्दीतील १७ कसोटी शतकांपैकी ६ शतके आस्ट्रेलिया संघांविरुद्ध आहेत. एकदिवसीय सामन्यातील त्याच्या ६ शतकां पैकी ४ याच संघांविरुद्ध आहेत. त्याने जी २ द्विशतके केलीत ती देखील याच संघांविरुद्ध…!

कसोटी सामन्यात सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा विश्व विक्रम या व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मणच्या नावे आहे. राहुल द्रविड सोबत त्यांनी ३७६ धावांची पार्टनरशिप केली. कसोटी सामन्यांच्या एकाच सत्रात त्याने ६ व्या क्रमांकावर खेळून १०० धावा करण्याचा देखील विक्रम केला आहे.

झेल घेण्यात देखील लक्ष्मण पटाईत होता. एका एकदिवसीय मालिकेत डझनभर म्हणजे १२ झेल घेण्याचा विक्रम केलेला आहे. गम्मत म्हणजे १०० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळणाऱ्या या खेळाडूला वर्ल्डकप मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

२००४ च्या कालावधीत आस्ट्रेलियात तिरंगी मालिकेत लक्ष्मणने आठवडाभरात तीन शतके करण्याचा देखील विक्रम केलेला आहे. यात नाबाद १०३, चार दिवसांनी १०६ आणि लगेच दोन दिवसांनी झिम्बाब्वे विरुद्ध १३१ धावा अशी ही अनोखी कामगिरी आहे.

हे सुध्दा वाचा:- भारतीय युवा खेळाडू ‘श्रेयश अय्यर’ यांच्या जीवनाबद्दल माहिती

आता त्याच्या वैयक्तिक जीवनातील महत्वाच्या काही प्रेरक गोष्टी: अभ्यासात हुशार असलेल्या लक्ष्मणने इयत्ता १० वीत ९८ टक्के गुण मिळवले. हा खेळाडू साईबाबांचा मोठा भक्त आहे. त्याच्या काकांनी साई बाबांवर बनवलेली सीडी त्याने लॉन्च केली आहे. तो शुद्ध शाकाहारी आहे व रस्सम त्याला अधिक आवडते. संगणक अभियंता असलेल्या शैलजा या मुलीशी त्याने विवाह केला. त्याला सर्वजित आणि अंचिता ही मुले आहेत. त्याचे मामा कृष्णमोहम् यांनी त्यांच्यातील क्रिकेटचे कौशल्य हेरले व या क्षेत्रात आणले. आई वडील डॉक्टर आहेत. सर्वात विशेष गोष्ट ही की, भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे लक्ष्मणचे पणजोबा आहेत. त्याने आपल्या जीवनात आणखी एक उत्तम विधायक कार्य केले आहे. हैदराबाद येथील समंता रूथ प्रभू, पुलेला गोपीचंद यांनी एकत्र येऊन फूड फॉर चेंज हा इव्हेंट आयोजित करून २ लाख विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाचे कार्य केले. आस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना त्याची २००३-०४ मधील त्याची लक्षणीय कामगिरी बघून इयान चॅपलने लक्ष्मण ला व्हेरी व्हेरी स्पेशल नाव दिले.

अशा या गुणी खेळाडुकडून भविष्यातही विधायक कार्य होत राहो ही त्याच्या जन्मदिनी शुभेच्छा…!

Note: जर तुमच्याकडे Biography of VVS Laxman in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला VVS Laxman information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button