चलनातील नोटांची निर्मिती कशी होते | How currency notes are made

एका पाचशेच्या नोटेने एक दिवसाचा बाजार आणता येतो. दोन हजारच्या पाच नोटा (दहा हजार रुपये) काही कुटुंबाच्या महिन्याचा पगार असतो. पण कधी विचार केलाय की, या एका कागदी तुकड्याच्या निर्मितीसाठी किती खर्च येतो? पाचशे रुपये छापण्यासाठी पाचशे रुपये लागत असतील का? आज जाणून घेऊया याविषयी.

चलनातील नोटांची निर्मिती कशी होते | How currency notes are made

चलनी नोटा मुद्रणालयाने आरटीआय (माहितीच्या अधिकार) अंतर्गत दिलेल्या माहितीनुसार 2018-19 मध्ये 50 रुपयांच्या नोट साठी 1.24 रुपये खर्च येत असे. 2019-20 मध्ये हा खर्च कमी होऊन 1.22 रुपये इतका झाला. 500 रुपयांचा विचार केला तर हा खर्च 2018-19 मध्ये 2.71 रुपये तर 2019-20 मध्ये हा खर्च 2.65 रुपये होता. इतर नोटांसाठी देखील साधारण दोन ते अडीझ रूपयांचा खर्च येत होता. 2000 रुपयांसाठी मात्र नक्की किती खर्च येतो ती माहिती चलनी नोटा मुद्रणालयाने दिली नाही. प्रत्येक वर्षी नव्या नोटा छापल्या जातात. जितक्या नव्या नोटा छापल्या जातात तितक्याच त्या बाजारातून बाद केल्या जातात. आरबीआय तर्फे प्रत्येक नोटेचं एक आयुष्य ठरवण्यात येतं. त्यानुसारच नव्या नोटा बाजारात आणल्या जातात.

आर्थिक वर्ष 2020च्या अहवालानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेने 500 रुपयांच्या 1463 कोटी नोटा, तर 50च्या 240 कोटी नोटा छापण्यात आल्या. पण या आकडेवारीत तफावत असल्याचं समोर आलंय. कारण भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रणालय प्रायव्हेट लिमिटेडने हीच आकडेवारी कमी मांडली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 500चे 1200 कोटी तर 50चे 234 कोटी नोटा छापण्यात आल्यात.

हे तुम्हाला माहीत आहे का?

2016 मध्ये नोटबंदीला भारतीय सामोरे गेले. एका रात्रीत 500 आणि 1000 च्या नोटा ‘कागज का तुकडा’ झाल्या. याचे परिणाम देश अद्याप भोगत असला तरी त्यावेळी नव्या 500 आणि 1000च्या नोटा छापण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेला आलेला खर्च हा मागील दोन दशकातील सर्वाधिक असल्याचं ब्लूमबर्गने सांगितलं. 2016-17 मध्ये आरबीआयला नवीन नोटा छापण्यासाठी 7965 कोटी रुपये खर्च आला. हा खर्च गतवर्षीच्या तुलनेत 133 टक्के अधिक होता. 2015-16 मधील खर्च 3420 कोटी इतका होता. या नोटा पुन्हा बाजारात आणण्यासाठी सरकारला पुन्हा 15.9 लाख कोटी त्यात ओतावे लागले.

काही वर्षांपूर्वी शंभरच्या नोटेचा रंग हिरवा होता. म्हणून “खिशात हिरवाई असली की सगळं मिळवता येतं,” असं तेव्हा म्हटलं जायचं. सामान्य माणसाला नोटांच्या माध्यमातून केला जाणारा व्यवहार महत्त्वाचा आहे, त्या बनतात कशा यात त्याला रस नसतो. असं असलं तरी टाकसाळीत नोटा बनतात तेव्हा राष्ट्रीय उत्पन्नाचा एक मोठा भाग यासाठी खर्च होतो हे लक्षात घेतलं तर कळतं की आपल्या मेहनतीने ज्या नोटा आपल्या हातात आल्या आहेत त्या खरं तर आपण नोटाच देऊन विकत घेतलेल्या आहेत. त्या नोटांवर सुद्धा आपल्याच सारख्या कामगारांनी मेहनत केलेली आहे. ही प्रक्रिया जितकी जटील आहे तितकीच महत्त्वाची सुद्धा. तूर्तास, आपल्या मेहनतीच्या नोटांवर दुसऱ्या कोणाच्या तरी मेहनतीची मोहर उमटली आहे एवढंच आपण लक्षात ठेऊया आणि आपल्या खिशातील नोटांचा आदर करूया.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button