दिवाळीचा पहिला दिवस ‘वसुबारस’ दिनाबद्दल संपूर्ण माहिती | Vasubaras information in marathi

आपल्या भारतीय संस्कृतीत असलेला महान सण दिवाळी. त्याचा पहिला दिवस म्हणजे वसू बारस. यालाच गोवत्सद्वादशी असे देखील म्हणतात. आपलं राज्य, देश कृषिप्रधान. जो शेतकरी आपल्या सर्वांसाठी अन्न पिकवतो तो अन्नदाता. गोवत्स द्वादशीचं महत्व या आमच्या शेतकरी बांधवांसाठी अधिक आहे, गोमाता अर्थात गाईबाबत कृतज्ञता या दिवशी व्यक्त करीत असतात. प्रेम भावनेचा हा अविष्कार जगात कुठेच बघायला मिळणार नाही इतकं हे शेतकरी आणि गायी वासराचं अनोखं प्रेम,नातं आहे.

दिवाळीचा पहिला दिवस ‘वसुबारस’ दिनाबद्दल संपूर्ण माहिती | vasubaras information in marathi

ज्या शेतीवर आपण परिश्रम करतो त्यासाठी बैलाची माता असणाऱ्या या गोमातेला शेतकरी लक्ष्मी मानतात आणि गाय वासराची पूजा करतात. या गायीच्या शेण आणि गोमूत्र यांचा शेती विकसित करण्यासाठी उपयोग होत असल्याने या गोमातेविषयी कृतज्ञता व्यक्त न करणे म्हणजे अन्यायकारकच ठरेल. म्हणून शेतकऱ्यांना या सणाच्या सुरुवातीचा दिवस हा खऱ्या अर्थाने या शेतकरी राजासाठी दिवाळी असते. दिवाळी म्हणजे आनंद, पण शेतकरी ती ज्या प्रकारे साजरी करतो ते अतिशय महत्वाचे आहे. गाय आणि वासराची पूजा करून दिवाळी सुरू होत असते. आपल्या संस्कृतीत ज्या परंपरा आहेत त्या अतिशय दुरदूरष्टी ठेऊन तयार केल्या आहेत. बघा, वसू बारसच्या दिवशी केवळ गाय वासराचीच पूजा करतात, बैलाची नाही. बैलाचा सण पोळा असतो.

गायीचं महत्व केवळ अध्यात्मिकदृष्ट्या विशिष्ट हेतूने अधोरेखित करणे चुकीचे आहे. गायीच्या शेणाचे व गोमूत्राचे महत्व वैज्ञानिक दृष्ट्या आधुनिक काळात सर्वांनाच पटू लागले आहे. सेंद्रिय शेतीचे प्रयोग पुन्हा सुरू झाले आहेत, वैद्यकीय कारणासाठी त्यांचा उपयोग होत आहे. दुग्धोत्पादनात आपण भरारी घेत आहोत. आता तर, साबण, उदबत्ती, धूप व अन्य वस्तूंची निर्मिती यांपासून केली जाऊ लागली आहे.

हे सुध्दा वाचा:- आपण धनत्रयोदशी का साजरी करतो? काय आहे धनत्रयोदशीची कथा?

भूमातेच्या रक्षणासाठी तिला सुपीक बनवण्यासाठी गायीच्या शेणात जे गुणधर्म आहेत ते अन्य कशात नाहीत. रासायनिक खतांमुळे ही जमीन नापीक बनते. पण गाय, वासरू, म्हैस, बैल, शेळी, मेंढरं यांच्या शेणापासून जमीन सुपीक होते. या सर्वांना आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या घरात खूप मोठे स्थान तर आहेच पण तेवढाच मान देखील आहे. किंबहुना हा सण आणि क्षण शेतकरी बांधवांसाठी आज खूप महत्वाचा मानला जातो. जी गोमाता आपल्या वर्षभराच्या उत्पन्नाची सोय करते तिच्या विषयीची ही अशी कृतज्ञता आजच्या दिवशी व्यक्त करणे हे कित्येक वर्षांपासून सुरू आहे. यावरूनच वसू बारसचे महत्व लक्षात येते. अश्विन महिन्यातील कृष्ण द्वादशीला हा सण साजरा करतात.

वसू म्हणजे सूर्य, धन, कुबेर! ही धनाची कुबेराची पूजा असते. शेतकरी राजासाठी गाय वासरू हे धन आहे. गाय ही हिंदू संस्कृतीत पवित्र मानली जाते. यानंतर दिवाळीतील इतर सण साजरे होतात. जसे, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज. पण आपल्या संस्कृतीच वैशिष्ट्य हे आहे की आधी जो आपले पोट भरतो, त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते. दिवाळी हा मोठा सण ज्यांच्यामुळे हे आनंदाचे दिवस बघायला मिळताहेत त्यांना न विसरता करण्याची ही परंपरा उदारता, विशालता आणि कृतज्ञता यांचं देखणं प्रतिक आहे. खाल्ल्या मिठाला खऱ्या अर्थाने जागणे हेच असावे बहुदा…! येथे उपकार, अहंकार, परतफेड अशा वृत्तीला अजिबात स्थान नसतं. गाय ही आपली आई आणि तिचं वासरू देखील पुढे शेती कामात मदत करणार, ही विशाल जाणीव ठेवूनच शेतकरी हा दिवस आनंदाने साजरा करतात.

खरं तर पावसाळा सुरू होण्याअगोदरच शेतीची कामे सुरू झालेली असतात. अधिकाधिक उत्पन्न मिळावे व परिवार, आपला देश त्यातून समृद्ध व्हावा ही महान भावना शेतकऱ्यांची असते. तो केवळ शेतात स्वतःसाठी कधीच राबत नाही, ऊन-पाऊस झेलत, अपार कष्ट करून शेती बहरते तेव्हा त्यातून येणारं पीक व उत्पन्न म्हणजे आपल्या जगण्याची सोय. ते उत्पन्न करण्यात मोठी मदत करणाऱ्यांविषयी ही अनोखी कृतज्ञता जगाच्या पाठीवर माणुसकीचा आदर्श उभा करणारी आहे हे मान्य करावेच लागेल. ह्या वसू बारसा निमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!

Telegram Grouplink
WhatsApp Channellink

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button