भारतातील या राज्यांचा आज आहे स्थापना दिवस | Indian foundation day information

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा इतिहास आपल्या मराठी लोकांना कमी जास्त प्रमाणात माहिती आहे. आपल्या मराठी भाषेचा अभिमान जसा आपल्याला आहे तसा अभिमान इतर राज्यांच्या लोकांना त्यांच्या भाषेबद्दल आहे. भारताच्या इतिहासात भाषेच्या प्रश्नावरून अनेक वाद झालेले आहेत, जाळपोळीच्या घटना झालेल्या आहेत. लोकांनी भाषेवरून, संस्कृतीवरून वेगळे राज्य मागितले आहे, म्हणूनच देशात 29 राज्यं निर्माण झाली आहेत. पण वेगळ्या देशावरून कधी भांडणे झाली नाहीत. लोकासाठी आपले वेगळे राज्य असणं, ही त्यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट असते. वेगळ राज्य म्हणजे वेगळी अस्मिता असते. ही अस्मिता भाषेतून आणि संस्कृतीमधून तयार होत असते. आपल्या भाषेचं वेगळं राज्य असावं, यासाठी लोकांनी खूप मोठे लढे दिले आहेत, जनता शहीद झाली आहे पण स्वतःच्या भाषेचं राज्य मिळविल्याशिवाय मागे हटली नाही.

भारतातील या राज्यांचा आज आहे स्थापना दिवस | Indian foundation day information in marathi

अशा राज्याची गोष्ट आपण थोडक्यात पाहणार आहोत, ज्याची स्थापना आजच्याच दिवशी म्हणजे 1 नोव्हेंबरला झाली, वर्ष वेगवेगळं आहे पण तारीख एकच आहे. ज्यामुळे याला राज्य स्थापना दिवसही म्हटल जातं.

1) आंध्रप्रदेश या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. त्याआधी या राज्याचा बराचसा भाग निजामाच्या राजवटीखाली होता, अन्यायी निजामाच्या विरुद्ध या प्रदेशातील लोकांनी प्रखर असा लढा दिला. या लढ्यात अनेक लोक धारातीर्थी पडले. सप्टेंबर 1948 साली हा प्रदेश स्वतंत्र झाला. पण या राज्यात तेलगु, तमिळ, कन्नड, मराठी अशी भाषा बोलणारे लोक मोठ्या संख्येने होते. त्यावेळी तेलगु भाषा बोलणाऱ्या लोकांसाठी वेगळं राज्य निर्माण केलं गेलं. सर्वात जुन्या राज्यांपैकी हे एक राज्य आहे.

2) मध्य प्रदेश – हे राज्य भारताच्या मध्यभागी असल्याने त्याला भारताचं हृदय म्हटलं जातं. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1950 रोजी झाली. त्यावेळी मध्य प्रदेशची राजधानी नागपूर होती पण महाराष्ट्रातील जनतेने संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठा लढा उभा केल्याने नागपूर महाराष्ट्रात राहिलं आणि 1956 साली भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी झाली. या राज्यासाठी मोठा लढा उभा राहिला नाही कारण यांना त्यामानाने लवकर वेगळ राज्य मिळालं.

3) केरळ – ज्या 1 नोव्हेंबर 1956 रोजी आंध्रप्रदेश राज्याची स्थापना झाली त्याच दिवशी केरळ राज्याची स्थापना झाली. केरळच्या प्रदेशात लहान लहान राज्य होती आणि तिथे राजेशाही होती. स्वातंत्र्यानंतर ती पद्धत मोडून काढून केरळ नावाचे मल्याळी भाषा बोलणारे वेगळे राज्य निर्माण करण्यात आले.

4) कर्नाटक – या राज्याची स्थापनाही 1 नोव्हेंबर1956 याच दिवशी झाली. कर्नाटक राज्याचा बराचसा भाग म्हेसुर राज्याच्या अंतर्गत यायचा. ज्यावेळी हैदराबादचा निजाम शरण आला, त्यावेळी हैद्राबाद म्हणजे जो कन्नड भाषा बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश होता तो प्रदेश आणि म्हैसूर राज्य यांचं एकत्रिकरण करून कर्नाटक राज्याची निर्मिती झाली. यात सर्वात वादग्रस्त भाग ठरला तो म्हणजे बेळगाव. बेळगाव आणि सोलापूरसाठी अटीतटीची लढाई झाली. अजूनही तो वाद सुरुच आहे.

5) हरियाणा – या राज्याची निर्मिती पंजाब या राज्यापासून झाली ती म्हणजे 1 नोव्हेंबर 1966 रोजी. या राज्याची निर्मिती होत असताना दंगे झाले, अनेक वर्ष हा वाद चालला. या दोन राज्यात सर्वाधिक मारामारी ही चंदिगढ वरून झाली. दोन्ही राज्य यावरून खूप भांडले की चंदिगढ आमच्याच राज्याची राजधानी झाली पाहिजे. शेवटी केंद्र सरकारने चंदिगढ हे केंद्र शासित प्रदेश केले आणि दोन्ही राज्याची राजधानी बनवून टाकली. आजही चंदिगढ दोन्ही राज्याची राजधानी आहे.

6) छत्तिसगढ या राज्याची स्थापना अगदी अलीकडे म्हणजे 1 नोव्हेंबर 2000 रोजी झाली. हे राज्य आधी मध्य प्रदेशचा भाग होतं. या राज्यात आदिवासींची संख्या जास्त असल्याने आदिवासींनी आपल्या वेगळ्या राज्यासाठी लढा दिला आणि त्यांची मागणी 2000 साली मान्य करण्यात आली.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button