टोमॅटो खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Tomato health benefits in marathi

मित्रांनो कांदा, बटाटा यांच्यानंतर स्वयंपाकघरात मानाचे स्थान असलेल्या प्रकारात टोमॅटोचा (Tomato) क्रमांक लागतो. टोमॅटोमध्ये पौष्टिक घटक भरपूर असतात. भारतात टोमॅटोचे पीक सर्वत्र येते. बाराही महिने आपल्याला टोमॅटो उपलब्ध होतात. जसे जसे टोमॅटो पिकू लागतात तसतसे त्याचे गुणधर्म वाढतात.

पदार्थाला एक विशिष्ट प्रकारची आंबटगोड चव टोमॅटोमुळेच प्राप्त होते. टोमॅटोची भाजी जशी करता येते तशीच अन्य भाज्यांमध्येही टोमॅटोचा अंतर्भाव करून भाजीची चव वाढवता येते. टोमॅटोची कांदा घालून कोशिंबीर करता येते तसेच टोमॅटोचे लोणचे, खूप, सॉस, जॅम करता येतात.

टोमॅटो खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Tomato health benefits in marathi

 • टोमॅटो आंबट-गोड, रुचकर, सारक, पाचक, अग्नीप्रदीपक असून मूळव्याध, पांडुरोग, रक्तविकार, अग्निमांद्य, उदरशूळ या विकारांमध्ये फायदा होतो.
 • पोटात कृमी झाल्यास टोमॅटोचा रस काढून त्यास हिंगाची फोडणी देऊन प्यावा. कृमी नष्ट होतात.
 • लहान मुलांना दूध पिऊन झाल्यावर लगेचच उलटी होत असेल तर दूध देण्यापूर्वी थोडा वेळ आधी चमचाभर टोमॅटोचा रस पाजावा.
 • ताजे, पिकलेले टोमॅटो स्वच्छ धुऊन जेवणापूर्वी व झोपण्यापूर्वी खाल्ल्याने मलावरोध दूर होतो.
 • आतड्यांमध्ये मळ साठून मलावरोध झाल्यास एक पेला टोमॅटो सूप रोज प्यावे.
 • शरीराला कंड सुटते, डोक्यात कोंड्याचे प्रमाण वाढते अशा वेळेस टोमॅटोच्या रसात दुप्पट खोबरेल तेल घालून ते मिश्रण अंगाला व डोक्याला लावावे व थोड्या वेळाने कोमट पाण्याने स्नान करावे.
 • पिकलेल्या टोमॅटोच्या रसात पाणी व मध घालून प्यायल्यास रक्तविकार दूर होतो.
 • अग्निमांद्य, तोंडाला चव नसणे आदी त्रास असता टोमॅटो कापून त्यावर सुंठपूड व सैंधव घालून खावे.
 • पित्ताचा त्रास झाल्यास टोमॅटोच्या रसात साखर घालून प्यावे.
 • तृषारोग झाल्यास टोमॅटोच्या रसात साखर व लवंगचूर्ण घालून प्यावा
 • अजीर्ण झाल्यास कच्च्या टोमॅटोचे तुकडे थोडा वेळ परतून त्यात मिरपूड व सैंधव घालून खावे.
 • टोमॅटोच्या सेवनामुळे रक्तातील रक्तकण वाढतात. शरीराचा फिकटपणा नाहीसा होतो. पिकलेल्या टोमॅटोच्या सेवनाने जठराग्नी प्रदीप्त होतो, पचनशक्ती वाढते, रक्तविकार, पित्तविकार दूर होतात. वजन वाढण्यासही याचे सेवन फायदेशीर ठरते. दूर

हे सुध्दा वाचा:जर तुम्ही रात्री ब्रश केला नाही तर, लवकरच होऊ शकतो

 • टोमॅटोची चटणी (टोमॅटोच्या रसात पुदिना, आले, सैंधव, धने घालून) करून जेवणात घेतल्याने तोंडाला चव येते.
 • सकाळ संध्याकाळ रोज टोमॅटोचा रस प्यावा व जेवणातील मिठाचे प्रमाण कमी करावे. त्यामुळे त्वचेचे विकार, कंड सुटणे, पुरळ येणे, त्वचा रुक्ष होणे यांवर फायदा होतो.
 • चेहरा स्वच्छ व नितळ होण्यासाठी टोमॅटोचे बारीक काप काढून चेहऱ्यावर चोळावे. त्वचा स्वच्छ होते.
 • तोंडाला दुर्गंधी येत असल्यास टोमॅटोचे काप काढून मीठ लावून खावेत.
 • दातातून रक्त येणे, हिरड्यांना सूज येणे यांवर कच्चे टोमॅटो खावेत. शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते.
 • संधिवात, आम्लपित्त, सूज, मुतखडा, आमवात आदींचा विकार असणाऱ्यांनी टोमॅटोचे सेवन करू नये. उष्णतेचे विकार, जठरव्रण,आतड्यांचे दोष, शितपित्त उठणे आदींचा त्रास होणाऱ्यांनीही टोमॅटोचे सेवन टाळावे. आंबट पदार्थांची ॲलर्जी असणाऱ्यांनी, जुलाब होत असल्यास टोमॅटो खाऊ नये.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button