चविष्ट स्वीट कचोरी कशी बनवायची हे जाणून घ्या | Sweet kachori recipe in marathi

मित्रांनो कचोरी जवळपास सगळ्यांनाच आवडते. कचोरीचे अनेक प्रकार भारतात उपलब्ध आहेत. पण तुम्ही कधी गोड कचोरी चाखली आहे का? गोड कचोरीची चव खूप वेगळी असते. रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांपासून ते महागड्या हॉटेल्समध्येही हे खाद्यपदार्थ मिळतात. बाजारात 200 ते 300 रुपये प्रतिकिलो दरानेही उपलब्ध आहे.

अशा परिस्थितीत जर तुम्हाला जास्त किंमत चुकवायची असेल तर तुम्ही ते घरी सहज बनवू शकता. घरी बनवलेली गोड कचोरी बाजारापेक्षा नक्कीच चविष्ट आणि स्वस्त असेल. गोड कचोरी बनवण्यासाठी कोणते पदार्थ आवश्यक आहेत आणि ती बनवण्याची योग्य पद्धत कोणती आहे. चला जाणून घेऊया. तसे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही aloo chi kachori recipe दिवसभरात नाश्त्यात किंवा संध्याकाळी चहाच्या वेळीही खाऊ शकता.

चविष्ट स्वीट कचोरी कशी बनवायची हे जाणून घ्या | Sweet kachori recipe in marathi

साहित्य

सारण

1 कप ताजा खवलेला नारळ, अर्धा कप साखर किंवा चवीनुसार, 2 टेस्पून काजू तुकडा, 2 टेस्पून बेदाणे, पाव टिस्पून जिरे, चिमूटभर मीठ, 1 हिरवी मिरची, बारीक चिरून.

कव्हरसाठी

3 ते 4 मध्यम बटाटे, उकडून सोललेले, 5 ते 6 टेस्पून शिंगाडा पीठ, चिमूटभर मीठ

इतर साहित्य

कचोऱ्या तळण्यासाठी तूप.

कृती :

  • बटाटा कुसकरून घ्या. गुठळ्या राहू देऊ नये. मीठ घाला. मध्यम घट्ट गोळा होईल इतपत शिंगाडा पीठ घाला. पीठ मळताना लागल्यास थोडेसे तूप घ्या. झाकून ठेवा.
  • नारळ, साखर, काजू, बेदाणे, जिरे, चिमूटभर मीठ आणि बारीक चिरलेली मिरची असे सर्व मिक्स करा.
  • मळलेल्या बटाटा-शिंगाडा पीठाचे दीड इंचाचे गोळे करा. लहान प्लॅस्टिकचा जाड पेपर घेऊन त्याला तुपाचा हात लावा. तळव्यांनाही तूप लावा. एक लहान गोळा घेऊन प्लॅस्टिकवर थापा किंवा लाटण्याने अलगद लाटा. लाटलेली पारी हातात घ्या. त्यात चमचाभर सारण घाला. पारीच्या कडा एकत्र करून कचोरी तयार करा. अशाप्रकारे कचोऱ्या तयार कराव्यात.

हे सुध्दा वाचा:तुम्ही पण चीज टोस्ट खाण्याचे शौकीन आहात का? मग या 5 रेसिपी तुमच्यासाठी

  • मध्यम आचेवर तुपात तळून घ्या.
  • तयार कचोऱ्या गरमच सर्व्ह करा. याबरोबर गोड दही किंवा साखर घातलेले दही सर्व्ह करा.

टीप : कचोऱ्या आधी भरून ठेवून काही तासांनी तळू नये. साखर आणि नारळ एकत्र केल्याने साखर वितळते आणि बाहेरील आवरण ओलसर होते. म्हणून कचोऱ्या भरून लगेच तळाव्यात. उपासाचे दुसरे कोणतेही पीठ जसे साबुदाणा, वरी, राजगिरा इत्यादी वापरले तरी चालेल.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button