सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा जीवन प्रवास… | General Bipin Rawat biography in marathi

हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला. बुधवारी संध्याकाळी सहानंतर ही बातमी आली आणि मन सुन्न झालं. अतिशय हुशार, ठाम भूमिका घेणारे, कडक लष्करी शिस्तीत वावरणारे, ज्यांच्या विधानाने पाकिस्तान आणि चीनला धडकी भरायची असे देशाचे पहिले सीडीएस जनरल रावत आज आपल्यात नाहीत. मला एका खासगी चॅनलच्या समेटमधील तो कार्यक्रम आठवला जिथे जनरल रावत यांनी ‘पाकिस्तानपेक्षा चीन भारताचा मोठा शत्रू असल्याचे विधान केले होते. देशाच्या संरक्षण क्षेत्रात काम करताना त्यांची भूमिका कायमच आक्रमक असे.

सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा जीवन प्रवास… | Bipin Rawat biography in marathi

सीडीएस जनरल बिपीन रावत (General Bipin Rawat) यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यात झाला. त्यांचे कुटुंब चौहान राजपूत घराण्यातील होते आणि त्यांची आई परमार क्षत्रिय घराण्यातील होती. जनरल बिपीन रावत यांचे वडील लक्ष्मण सिंह रावत हे सैन्यात लेफ्टनंट जनरल राहिले आहेत.

वडील लष्करामध्ये असल्याने बिपिन रावत यांचं बालपण लष्करी शिस्तीमध्येच गेलं. जनरल रावत यांचं शिक्षण हिमाचल प्रदेशातील शिमला येथील सेंट एडवर्ड स्कूल आणि डेहराडूनच्या कॅम्बेरियन हॉल स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि ते पुन्हा आपल्या जन्मस्थळी म्हणजेच डेहराडूनला गेले. तेथे त्यांना ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ हे पहिलं सन्मानपत्र मिळालं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि ते अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली.

अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर बिपिन रावत यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. जनरल रावत डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (वेलिंग्टन, तामिळनाडू) आणि कमांड अँड जनरल स्टाफ कोर्स फोर्ट लीव्हनवर्थचे (अमेरिका) पदवीधर होते जनरल रावत यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्करी नेतृत्वावर अनेक लेख लिहिले आहेत. तसंच व्यवस्थापन आणि संगणक अभ्यासात त्यांनी डिप्लोमा केला होता. मेरठ येथील चौधरी चरणसिंग विद्यापीठाने मिलिट्री मीडिया स्ट्रॅटेजिक अभ्यासातील संशोधनासाठी त्यांना डॉक्टर ऑफ फिलोसॉफी पदवीने सन्मानित केले गेले होते.

16 डिसेंबर 1978 रोजी बिपिन यांचं लष्करात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. वडिलांच्याच म्हणजे, 11 गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनमधून कारकीर्द सुरू केली. जनरल रावत यांनी ब्रिगेड कमांडर, जनरल ऑफिसर कमांडिंग चीफ, दक्षिणी कमांड, मिलिट्री ऑपरेशन्स डायरेक्टोरेटमध्ये जनरल स्टाफ ऑफिसर ग्रेड अशा महत्त्वाच्या पदांवर काम केलं. चार दशकांच्या कारकीर्दीत विविध आघाड्यांवर कामगिरी बजावली. 2016 मध्ये लष्कराच्या दक्षिण विभागाची जबाबदारी होती आणि काही महिन्यांत म्हणजे 31 डिसेंबर 2016 रोजी ते लष्करप्रमुख झाले. सैन्यात असताना त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते. त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्याकडे आणखी अनेक जबाबदाऱ्या होत्या. देशाच्या सुरक्षा मंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांपैकी ते एक होते. लष्कर प्रमुख पदावरून 31 डिसेंबर 2019 ला निवृत्त झाल्यानंतर ते पहिले सीडीएस म्हणजे Chief of Defence Staff या पदावर नियुक्त झाले. म्हणजेच ते भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख होते. सीडीएस हे पंतप्रधान आणि सैन्य दलांमध्ये दुवा साधण्याचे काम करतात.

भारतीय लष्कराने 29 डिसेंबर 2016 रोजी पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक करत अनेक दहशतवादी स्थळे उद्धवस्त केली होती. विशेष बाब म्हणजे बिपीन रावत यांची लष्कराच्या प्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर केवळ एका महिन्याच्या आतच सर्जिकल स्ट्राईक केला होता. हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले होते. तर जून 2015 मध्ये मणिपूरमध्ये झालेल्या हल्ल्यात 18 भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर 21 पॅरा कंमांडोंनी सीमा ओलांडून म्यानमारमध्ये NSCN- या दहशतवादी संघटनेच्या अनेक दहशतवाद्यांना ठार केले. याचेही नेतृत्व कमांडर रावत यांनी केले होते. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्येच प्रचंड धाडस आणि देशप्रेम होतं. त्यामुळे त्यांच्याशी हस्तांदोलन केल्यानंतर मनातून आणि मुखातून आपोआप ‘जयहिंद’ निघायचं अशी आदरांजली अभिनेता अनुपम खेर यांनी वाहिली.

हेलिकॉप्टर अपघातात बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचेही निधन झाले. मधुलिका कुटुंबाला सांभाळण्यासोबतच आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशनच्या (Awwa) अध्यक्षा होत्या. ही लष्करातील कर्मचाऱ्यांच्या पत्नी, मुले आणि आश्रितांच्या कल्याणासाठी काम करणारी नोडल संस्था आहे. मधुलिका यांचे शिक्षण मध्यप्रदेशात झाले. तर दिल्ली येथे त्यांनी मानसशास्त्राची पदवी घेतली. राजकन्या ते शहीद कुटुंबियांचा आधारवड असा त्यांचा जीवनप्रवास आहे. निर्भिड, बेधडक आणि करारी बाणा असणाऱ्या जनरल रावत यांना मधुलिका यांनी आयुष्यभर खंबीर पाठिंबा आणि शेवटच्या क्षणापर्यंत साथ दिली.’लष्करच नव्हे तर संपूर्ण देशाने युद्धासाठी तयार असावे’ अशी सडेतोड भूमिका घेणारे बिपीन रावत यांना अखेरचा सॅल्युट ! अलविदा जनरल !!!

Note: जर तुमच्याकडे Biography of Bipin Rawat in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Bipin Rawat information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button