भेंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Okra health benefits in marathi

मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या जमिनीत भेंडीचे उत्पादन करण्यात येते. भेंड्याचे सहा धारी, आठ धारी असे प्रकार आहेत. काही जातीच्या भेंड्यांवर लव असते. अत्यंत पौष्टिक व आरोग्यासाठी लाभदायक अशा भेंड्यांपैकी काटेदार व खडबडीत भेंड्यांपेक्षा कोवळ्या व मऊ भेंड्या जास्त गुणकारी असतात. भेंड्यांचा वापर आहारात, औषधासाठी, कागद उद्योगासाठी तसेच भेंड्यातील चिकट रसाचा रंगनिर्मितीसाठी वापर केला जातो.

भेंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Okra health benefits in marathi

  • भेंडी (okro) चिकट, ग्राही, आंबट, पौष्टिक, वीर्यवर्धक, रुचकर, वायूकारक व कफकारक आहे.
  • आमवाताचा विकार असणाऱ्यांनी भेंड्यांच्या मुळांना वाटून त्यात साखर घालून खावे.
  • प्रमेहामुळे होणारा दाह कमी होण्यासाठी भेंड्याचे ताजे बी घालून खावे. वाटून साखर
  • रोज सकाळी कोवळ्या भेंड्या शरीरास झेपतील इतक्या प्रमाणात खाल्ल्यास शक्ती वाढते, बल प्राप्त होते तसेच धातुवृद्धी व पुष्टी होते.

हे सुध्दा वाचा:तांदूळजा खाल्ल्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • भेंड्याची ( lady’s fingers) ताजी पाने वाटून त्याचा लगदा बांधल्यास गळू पिकून फुटते, जखम भरून येते व सूजही ओसरते.
  • 10 ग्रॅम भेंडी 50 ग्रॅम पाण्यात 15-20 मिनिटे उकळवून त्याचा काढा साखर घालून घेतल्यास लघवीला जळजळणे, अडथळा येणे, ताप, खोकला यांमध्ये फायदा होतो तर या काढ्याचा वाफारा घेतल्यास घशाची खवखव, छातीतील जळजळ, खोकला आदींमध्ये बरे वाटते.
  • भूक मंदावणे, पोटात गुबारा धरणे आदींनी त्रस्त असणाऱ्यांनी भेंड्याचा उपयोग करू नये.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button