आज आपण भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या जीवनाबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
किरण बेदी नेहमी म्हणतात,
“अशक्य असं काहीच नसतं, सगळं शक्य असतं. कोणताही लक्ष प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
किरण बेदी यांच्या जीवनाबद्दल माहिती | Ips Kiran Bedi History
नाव | किरण पेशावरिया |
जन्मतारीख | 9 जुन 1949 |
जन्मस्थान | अमृतसर, पंजाब |
वडिलांचे नाव | प्रकाशलाल पेशावरिया |
आईचे नाव | प्रेमलता पेशावरिया |
पतीचे नाव | बृज बेदी (टेनिस खेळाडू) |
शिक्षण | इंग्लिश ऑनर्स पदवी, राज्यशास्त्रतून एम ए, दिल्ली विश्वविद्यालयतून लॉ, समाजशास्त्रात पीएचडी. |
किरण बेदी यांचा जन्म 9 जून 1949 मध्ये अमृतसर पंजाब येथे झाला त्यांच्या परिवारात त्यांचे आई-वडील आणि तीन बहिणी आहेत. वडिलांचे नाव प्रकाश लाल आहे आणि ते कपड्याचे व्यापारी होते आणि त्याचबरोबर ते टेनिस खेळाडू सुद्धा होते.
वडील टेनिस खेळत असल्यामुळे बेदीजी यांनासुद्धा टेनिस खेळण्याची आवड निर्माण झाली. विधी यांच्या आई प प्रेमलता या एक गृहिणी आहे.किरण बेदी यांना तीन बहिणी आहेत. पण त्या मधील दोन बहिणी रिता आणि अनु ह्या टेनिस खेळाडू आहेत.
किरण बेदी यांच्या आई-वडिलांनी खूप संघर्ष केला आहे. कारण तो काळ असा होता की, पुरुष प्रधान संस्कृतीला जास्त मानणारा होता त्यामुळे यांना या तिन्ही जणींना सांभाळणे खूप कठीण गेले.
किरण बेदी यांची शिक्षण | Kiran bedi education
किरण बेदी यांचा प्राथमिक शिक्षण आहे अमृतसरच्या ‘सेक्रेड हार्ट कॉन्वेंट’ या शाळेतून झालं. शाळेत असताना त्यांनी एनसीसी कॅम्प मध्ये सुद्धा भाग घेतला होता.
1968 मध्ये त्यांनी अमृतसर येथील महिला महाविद्यालयातून इंग्रजी पदवी मिळविली. आणि 1970 ला पंजाब विद्यापीठातून राज्यशास्त्रात एम.ए पूर्ण केलं.
1998 मध्ये दिल्ली विद्यालयातून ची लॉ पदवी घेतली. 1993 मध्ये आयटी दिल्ली येथून समाजशास्त्रात पीएचडी करून त्यांनी ड्रग, शोषण आणि डोमेस्टिक वायलेंस विषयावर शोधनिबंध सुद्धा लिहिला.
किरण बेदी यांचे वैवाहिक जीवन | Kiran bedi marriage life
Kiran यांनी 9 मार्च 1972 रोजी टेनिस खेळाडू बृज बेदीत्यांच्याशी लग्न केले. यांची पहिली भेट ही टेनिस मैदानावर झाली होती. टेनिसच्या सरावाच्या वेळेस ह्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि हे मैत्री नंतर प्रेमात बदलली आणि नंतर त्याने विवाह केला. त्यांना एक मुलगी आहे तिचं नाव सायना बेदी आहे. 2016 म्हणजे त्यांच्यासाठी काळा दिवस कारण त्यांच्या पतीचे कर्करोगाने निधन झाले.
किरण बेदी यांचा पोलिस करियर | Kiran Bedi’s Career in Civil Services
किरण बेदी अभ्यासाच्या काळात एक हुशार विद्यार्थिनी होत्या.परंतु टेनिस ही त्यांची आवड होती. 1972 मध्ये पुणे आशिया खंडातील महिला टेनिस चॅम्पियनशिप जिंकली. आणि त्याच वर्षीत्यांनी भारतीय पोलिस अकॅडमी मध्ये प्रवेश केला.
तेथून त्यांनी 1974 मध्ये पोलिस अधिकारी म्हणून बाहेर आली. किरण बेदी यांनी पोलिस सेवेत रुजू होण्यापूर्वी 1970 ते 1972 ह्या दरम्यान अध्यापनात प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. आणि त्या दरम्यान प्रशासकीय सेवेची तयारी सुरू केली.
पोलिस सेवेत असताना किरण बेदी यांनी बरीच महत्त्वाची पदे सांभाळली आणि खूप परिश्रम सुद्धा घेतले. 1977 मध्ये इंडिया गेट दिल्ली येथे अकाली आणि निरंकारी यांच्यात ज्या पद्धतीने झालेल्या शीख उठावावर त्यांनी चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवले.
1979 मध्ये त्या पश्चिम दिल्लीच्या डी.सी.पी ( DCP) पोलिस होत्या. किरण बेदी एक भारतीय राजकारणी, समाजसेवक, भूतकाळातील टेनिसपटू आणि निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. किरण बेदी यांनी 1972 मध्ये पोलिस सेवेत (आयपीएस) जॉइन केले आणि ते भारतातील पहिल्या महिला अधिकारी बनल्या.
Note: जर तुमच्याकडे About Kiran Bedi मध्ये अजून Information असेल, जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Kiran Bedi Biography in Marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही WhatsApp, Facebook आणि twitter वर Share करू शकता.