विमा फसवणुकीचे किती प्रकार आहेत आणि आपण त्यापासून कसे वाचू शकतो? |Insurance Frauds in India & How to Avoid it?

मित्रांनो विमा हे एक उत्पादन (product) आहे जे प्रत्येकाला सहज समजत नाही. या कारणास्तव अनेकवेळा लोक यामध्ये फसवणुकीलाही बळी पडतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अशी आहे की, अनेक वेळा लोक विमा फसवणुकीला बळी पडतात तरी त्यांना समजतं नाही. आज आपण या पोस्टमध्ये विमा फसवणुकीचे किती प्रकार आहेत आणि त्यापासून आपण कसे वाचू शकतो हे जाणून घेणार आहोत.

विमा फसवणुकीचे किती प्रकार आहेत आणि आपण त्यापासून कसे वाचू शकतो? |Insurance Frauds in India & How to Avoid it?

डुप्लिकेट पॉलिसी

लोकांना फसवणुकीचा बळी बनवण्यासाठी फसवणूक करणाऱ्यांद्वारे वापरली जाणारी ही सर्वात सामान्य पद्धत आहे. यामध्ये फसवणूक करणारे ऑनलाइन बनावट पॉलिसी लोकांना फोन किंवा ईमेल इत्यादीद्वारे विकतात.काही लोक पूर्ण माहिती घेत नाही आणि लगेच पॉलिसीसाठी अप्लाय करून टाकतात.

कधी कधी एजंटकडून फसवणूक होते

अनेक वेळा विमा एजंटकडून कव्हरेज, फायदे आणि प्रीमियम इत्यादीबद्दल चुकीची माहिती देऊन पॉलिसी विकली जाते.

प्रीमियमला डायव्हर्ट करणे

अनेक वेळा विमा प्रीमियम हा ग्राहकांकडून गोळा केला जातो. परंतु एजंट हा कंपनीकडे ते पैसे जमा करत नाही. या प्रकारची फसवणूक अनेक वेळा होत असते. कारण बहुतेक लोक प्रीमियम हा ऑफलाईन भरतात.

व्याजमुक्त कर्ज

पॉलिसी विकण्यासाठी, अनेक वेळा फसवणूक करणारे ग्राहकांना बिनव्याजी कर्ज देण्याचे आश्वासन देतात जेणेकरून पॉलिसी विकता येईल.

खोटा दावा

अनेक वेळा पॉलिसी दस्तऐवजात खोटेपणा करून फसवणूक करणार्‍यांच्या वतीने दावा केला जातो आणि वेळ आल्यावर वास्तविक पॉलिसीधारकाला पॉलिसीचा कोणताही लाभ मिळत नाही.

उच्च परतावा देण्याचे वचन

अनेकदा असे दिसून येते की विमा उत्पादने फसवणूक करणारे गुंतवणुकीचे उत्पादन म्हणून विकतात आणि लोक जास्त परताव्याच्या लोभाने पॉलिसी खरेदी करतात.

हे सुध्दा वाचा:- PF धारकांनो लग्नासाठी पैसे पाहिजे? मग ‘या’ स्टेप्स फॉलो करुन PF मधून पैसे काढू शकता

विम्याची फसवणूक कशी टाळायची?

  • कोणत्याही प्रकारची इन्शुरन्स फसवणूक टाळण्यासाठी, तुम्ही थोडे दक्ष राहणे आवश्यक आहे.
  • विमा उत्पादन खरेदी करण्यापूर्वी, संपूर्ण पेपर वाचणे आणि नियम आणि शर्ती देखील जाणून घेणे चांगले.
  • तुम्ही खरेदी करत असलेल्या विमा उत्पादनाबद्दल संशोधन करा.
  • पॉलिसी खरेदी करण्यासाठी तृतीय पक्ष, विक्रेता किंवा एजंट तुमच्याशी संपर्क करत असल्यास, ओळखपत्र पाहून त्याची पडताळणी करा.
  • पॉलिसी पेमेंटसाठी ऑनलाइन पेमेंट पर्याय निवडा.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button