लॅपटॉपची स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या गोष्टी तर वापरत नाही ना…| How to Clean a Laptop Screen Without Damaging It

मित्रांनो स्क्रीन ही लॅपटॉप (laptop) ची सर्वात महत्वाची गोष्ट आहे. थोडा जरी दबाव पडला की स्क्रीन क्रॅक व्हायला वेळ लागत नाही. अशा परिस्थितीत जेव्हा लॅपटॉपची स्क्रीन (laptop screen) घाण होते आणि ती साफ करण्याची गरज भासते तेव्हा युजर्सला बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो. स्क्रीनवर साचलेली धूळ काढण्यासाठी तुम्ही स्प्रे वापरत असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. तज्ज्ञांच्या मते साफसफाईसाठी लिक्विड वापरल्याने लॅपटॉपचे हार्डवेअर खराब होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही लॅपटॉपची स्क्रीन (How to Clean Laptop Screen) इतर काही मार्गांनी स्वच्छ करू शकता. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत मार्ग.

लॅपटॉपची स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या गोष्टी तर वापरत नाही ना… |How to Clean a Laptop Screen Without Damaging It

लॅपटॉप स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी कोणते कापड वापरावे?

लॅपटॉपची स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी घरात पडलेल्या जुन्या कपड्यांऐवजी मायक्रोफायबर कापडाचा वापर करा. मायक्रोफायबर कापड वापरल्याने लॅपटॉप स्क्रीनवर ओरखडे (स्क्रॅच) पडत नाही.

लॅपटॉप स्क्रीन कशी स्वच्छ करावी?

  • लॅपटॉप स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापडावर साफसफाईची सामग्री फवारणी करा. लक्षात ठेवा स्वच्छता सामग्री थेट लॅपटॉप स्क्रीनवर मारू नका.
  • लॅपटॉप स्क्रीनची मध्यभागी साफसफाई सुरू करा, स्वच्छतेसाठी गोलाकार हालचालीत हात हलवा.
  • कोपरे स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापडाचा कोरडा भाग वापरा.
  • साफसफाईसाठी हलक्या हाताचा दाब वापरा. स्क्रीनवर जास्त जोर देऊ नका नाहीतर हृदय बाहेर येईल. लॅपटॉपच नाही आपलं.

हे सुध्दा वाचा:- एकाच वेळी दोन ॲप्स वापरायचे आहेत? मग Android फोनची ही सेटिंग तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल

लॅपटॉप स्क्रीनसाठी अल्कोहोलचा वापर

कधीकधी स्क्रीनवर एखादा घाणेरडा स्पॉट दिसून येतो. ते स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोलचा अगदी कमी प्रमाणात वापर केला जाऊ शकतो. पण लॅपटॉपच्या एलसीडी नसलेल्या स्क्रीनवरच अल्कोहोल वापरण्याची शिफारिश तज्ञांकडून केली जाते.

टिपः तुम्ही मायक्रोफायबर कपड्यावर अल्कोहोलचे काही थेंब टाकू शकता आणि ते स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. लॅपटॉपची स्क्रीन एलसीडी असेल तर त्यावर अल्कोहोल वापरू नका. नाहीतर काही खर नाही.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button