मित्रांनो तुमचे पीएफ खाते (PF account) असल्यास. तुम्हाला हे माहिती आहे का की तुम्ही पीएफमधून ॲडव्हान्स पैसे काढू शकता. जर तुमच्या कुटुंबातील कोणाचे लग्न असेल तर तुम्ही त्याच्यासाठी पीएफ खात्यातून ॲडव्हान्स पैसे काढू शकता. अशा परिस्थितीत तुम्हाला ॲडव्हान्स रोख कधी काढता येईल असा प्रश्न निर्माण होतो. तुमचा मुलगा आणि मुलगी यांच्यासोबत भाऊ आणि बहिणीच्या लग्नासाठी तुम्ही पीएफ खात्यातून पैसे कसे काढू शकता.
तुम्ही तुमच्या खात्यातून फक्त 50% पैसे काढू शकता. पगारदार व्यक्तीचे पीएफ हे त्याच्या पगारांमधून कट होत असतात. आणि या पैशावर सरकार त्यांना व्याजही देते. दर महिन्याला व्यक्तीच्या पगाराचा काही भाग पीएफ खात्यात जातो. यावर्षी सरकारने पीएफच्या व्याजदरात वाढ केली आहे. आता पीएफ खात्यावर 8.15 टक्के व्याज मिळणार आहे. यापूर्वी केवळ 8.1 टक्के व्याज मिळत होते. चला तर जाणून घेऊया पैसे काढण्यासाठी (How to Withdraw PF) काय प्रोसिजर आहे.
PF धारकांनो लग्नासाठी पैसे पाहिजे? मग या स्टेप्स फॉलो करुन PF मधून पैसे काढू शकता |How to withdraw pf amount online
पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी ही अट पूर्ण करावी लागेल?
- PF खात्यातून फक्त 50% पैसे काढता येतात. तुमचे खाते 7 जुने असेल तरचं तुम्ही ही रक्कम काढू शकता. लग्न आणि शिक्षणासाठी तुम्ही पीएफ खात्यातून पैसे काढू शकता. तुम्ही पीएफमधून फक्त तीन वेळा पैसे काढू शकता.
- तुमचा UAN क्रमांक सक्रिय असेल तेव्हाच तुम्ही PF खात्यातून पैसे काढू शकता. तुमचा UAN नंबर चालू असेल तर तुम्ही PF खात्यातून पैसे काढू शकत नाही.
हे सुध्दा वाचा:- पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड वापरताय, मग या तीन चुका कधीही करू नका
- तुम्ही तुमचे आधार कार्ड पीएफ खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे.
- पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्जही देऊ शकता. ऑनलाइन प्रक्रियेद्वारे तुम्ही 72 तासांत पैसे काढू शकता.
Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.