भारताचा पहिला UPI ATM card लॉन्च, आता डेबिट कार्डची गरज नाही? |India’s first UPI-ATM unveiled for hassle-free, cardless cash withdrawals

मित्रांनो युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा वापर देशात झपाट्याने वाढत आहे. लोक अगदी लहान पेमेंटसाठी सुध्दा UPI चा वापर करत आहेत. देशात डिजिटायझेशनला चालना देण्यासाठी अनेक बँका ग्राहकांना विविध सुविधाही पुरवत आहेत. आता देशात UPI एटीएमही सुरू करण्यात आले आहे.

जपानच्या हिताची कंपनीने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या सहकार्याने पहिले UPI-ATM व्हाइट लेबल एटीएम (WLA) म्हणून लाँच केले आहे. यामध्ये ग्राहक UPI च्या माध्यमातून एटीएममधून सहज पैसे काढू शकतात. डिजिटलायझेशनला चालना देण्यासाठी हे केले गेले आहे. हे ATM 5 सप्टेंबर 2023 रोजी मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये पहिल्यांदा वापरले गेले. या सुविधेमुळे ग्राहक एटीएममधून सहज पैसे काढू शकतील असा कंपनीचा विश्वास आहे.

भारताचा पहिला UPI ATM card लॉन्च, आता डेबिट कार्डची गरज नाही?

या आधी एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डची गरज होती. त्याच वेळी यूपीआय एटीएममध्ये आपण डेबिट कार्डशिवायही एटीएममधून पैसे काढू शकतो. एटीएममधून पैसे काढण्याचा हा एक सोयीस्कर आणि सुरक्षित मार्ग आहे. अशा स्थितीत प्रश्न पडतो की आपण UPI ATM कसे वापरावे?

UPI ATM कसे वापरावे?

  • तुम्हाला आधी एटीएममध्ये जितकी रक्कम काढायची आहे तितकी रक्कम टाकावी लागेल.
  • यानंतर तुमच्या समोर QR कोड (UPI-QR Code) दिसेल.
  • आता UPI QR कोड स्कॅन करा.
  • यानंतर तुम्हाला UPI पिन टाकावा लागेल.
  • यानंतर एटीएममधून लगेच पैसे निघतील.

UPI एटीएम डेबिट कार्डपेक्षा वेगळे कसे आहे?

नावाप्रमाणेच UPI ATM मध्ये UPI पिन वापरावा लागेल. हा कार्डलेस व्यवहार आहे. यामध्ये तुम्ही नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि ओटीपीद्वारे यूपीआय एटीएम वापरू शकता. आजच्या काळात, तुम्ही Android (Android) किंवा iOS (IOS) उपकरणांवर UPI ॲप सहजपणे इन्स्टॉल करू शकता.

हे सुध्दा वाचा:- कमी पैशात तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक कशी करू शकता? जाणून घ्या

अनेक बँका ग्राहकांना UPI-ATM सुविधाही देत आहेत. UPI-ATM बद्दल, NPC ने म्हटले आहे की ग्राहकांना बँकिंग सुविधा सहज उपलब्ध करून देण्यात खूप मदत होते. या सुविधेद्वारे ग्राहक कोणत्याही कार्डशिवाय कुठेही UPI वापरून पैसे काढू शकतात.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button