नोकरी सोडून फ्रीलान्सिंगची तयारी करताय? मग ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा |Should I quit my job and become a freelancer?

मित्रांनो प्रत्येकालाच वाटते की आपल शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे. कारण नोकरीमध्ये प्रत्येक महिन्याच्या शेवटी एक निश्चित रक्कम हातात येते. ज्यातून भविष्य सुरक्षित करता येते. पण कधी कॉर्पोरेट जॉबच्या दैनंदिन कामामुळे, कधी कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पूर्णवेळ नोकरी सोडून फ्रीलान्सिंग (freelancer) करण्याचा विचार होतो. जर तुम्ही पण हा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहोत. ज्या तुम्ही नक्की वाचल्या पाहिजेत.

नोकरी सोडून फ्रीलान्सिंगची तयारी करताय? मग ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा |Should I quit my job and become a freelancer?

  • सर्वप्रथम स्वत:ला हा एक प्रश्न विचारा की, तुम्ही रोजच्यारोज तुमच्या नोकरीत येणाऱ्या अडचणींमुळे हा निर्णय घेतला आहे का? हा प्रश्न स्वत:ला नक्कीच विचारा. कारण नोकरीचा ताण टाळण्यासाठी असे असू शकते. कारण तसे असल्यास ते तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकते.
  • आर्थिक काळजी घ्या, कारण फ्रीलांसर म्हणून तुम्हाला महिन्याच्या शेवटी फिक्स पगार मिळत नाही. कारण यात तुम्ही जितके प्रोजेक्ट करता त्यानुसार तुम्हाला पैसे दिले जातील. अशा स्थितीत तुमचा मासिक खर्च कसा भागेल हे ध्यानात ठेवावे लागेल.

हे सुध्दा वाचा:- 12वी नंतर एअरफोर्समध्ये नोकरी कशी मिळेल? पात्रता आणि निवड प्रक्रियेबद्दल जाणून घ्या

  • फुल टाइम जॉब सोडण्यासाठी आणि फ्रीलान्सिंग काम करण्यासाठी तुमच्याकडे संपूर्ण स्ट्रॅटेजी असणे आवश्यक आहे. आपण कोणत्या दिशेने पुढे जाणार आहे? त्यासाठी कोणती आवश्यक पावले उचलली पाहिजेत? असे प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत.
  • फ्रीलान्सिंग सुरू करण्यापूर्वी संबंधित क्षेत्राशी संबंधित काही महत्त्वाची कौशल्ये शिकण्याची गरज आहे. असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते शिकू शकता. असे केल्याने तुम्हाला स्वतःला फ्रीलांसर म्हणून मदत होईल.
  • आपण आपल्या मित्र आणि सोशल मीडियाच्या मदतीने स्वतःची जाहिरात करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन आणि इन्स्टाग्रामवर अचूक पोस्ट करून याविषयी माहिती देऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला प्रोजेक्ट मिळण्यास मदत होईल. याशिवाय तुम्ही मित्रांचे नेटवर्कही वापरू शकता.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button