पॅन कार्डचे नाव, पत्ता किंवा जन्मतारीख चुकली असेल तर, या स्टेप्स फॉलो करून तुम्ही बदलू शकता | How to change pan card details in online

मित्रांनो आयकर जमा करण्यापासून ते बँक खाते उघडण्यापर्यंत किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी पॅन कार्ड हे आवश्यक आहे. यामध्ये काही चूक झाली तर तुमचे काम रखडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पॅनमधील माहिती नेहमी अपडेट आणि बरोबर ठेवावी. या पोस्टमध्ये आपण पॅन कार्ड घरबसल्या कसे कसा अपडेट करायचं ते जाणून घेणार आहोत.

पॅन कार्डचे नाव, पत्ता किंवा जन्मतारीख चुकली असेल तर, या स्टेप्स फॉलो करून तुम्ही बदलू शकता |How to change pan card details in online

घरबसल्या पॅन कार्ड कसं अपडेट करायचं?

पॅन कार्डमधील माहिती अपडेट करण्यासाठी तुम्ही प्रथम NSDL PAN किंवा UTIITSL PAN च्या ऑफिशियल वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला माहिती अपडेट करण्यासाठी अर्ज करावा लागेल. पॅनवरील माहिती अपडेट करण्यासाठी 15 ते 30 दिवस लागतात.

पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

  • सगळ्यात पहिले https://www.pan.utiitsl.com/PAN/csf.html. या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.यानंतर तुम्हाला पॅन सुधारणा करण्यासाठी लिंकवर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन प्रकाराच्या पर्यायावर जावे लागेल आणि विद्यमान पॅन डेटामध्ये बदल किंवा दुरुस्तीचा पर्याय निवडावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला योग्य श्रेणी निवडावी लागेल.
  • त्यानंतर पॅन क्रमांक टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • यानंतर तुमचे नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला सर्व माहिती अपडेट करावी लागेल जी तुम्हाला दुरुस्त करायची आहे.
  • त्यानंतर पुरावा कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरा.
  • त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या अर्जाचा मागोवा घेऊ शकता.

हे सुध्दा वाचा:- जर तुम्ही PAN आधारशी लिंक नाही केलं तर, तुम्हाला 6000 रुपये दंड भरावा लागेल

पॅन अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • वीज बिल
  • पासपोर्ट
  • बँक स्टेटमेंट
  • ड्रायव्हिंग लायसन्स

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button