जर तुम्हाला पहिलेच कळाल की, ट्रॅफिक जॅम आणि पाणी कुठ साचलं आहे? मग ही पोस्ट तुमच्यासाठी |How To Report Road Accident In Google Maps And Mappls During Rain in marathi

मित्रांनो या पावसाळ्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना सर्वाधिक त्रास होतो. पावसाळ्याच्या दिवसात खराब रस्ता, ट्रॅफिक जाम, पाणी साचणे अशा अनेक समस्या येत असतात. घराबाहेर पडण्याबरोबरच रस्त्यांसंबंधीच्या या घटनांची माहिती अगोदर मिळाल्यास की चांगल होईल ना, त्यामूळे वेळेची बचत सुद्धा होईल.मग आज आपण याचं गोष्टीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जर तुम्हाला पहिलेच कळाल की, ट्रॅफिक जॅम आणि पाणी कुठ साचलं आहे? मग ही पोस्ट तुमच्यासाठी |How To Report Road Accident In Google Maps And Mappls During Rain in marathi

रस्ता अपघाताची माहिती अगोदर कशी मिळवायची?

गुगल मॅप आणि Mappls द्वारे रस्त्यांसंबंधीच्या घटनांची माहिती देण्याची सुविधा आहे. तुम्ही नेव्हिगेशनसाठी Google Maps किंवा Maples वापरत असल्यास. तुम्हाला अशा घटनांसाठी अलर्ट मिळू शकतात. इतर युजर्सना मदत करण्यासाठी तुम्ही अशा घटनांची तक्रार देखील करू शकता.

Google Maps वर रस्त्याच्या घटनांचा अहवाल कसा द्यावा

 • पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यांशी संबंधित समस्या कळवण्यासाठी सर्वप्रथम गुगल मॅप उघडावा लागतो.
 • तुम्ही प्रवास करताना ॲप वापरत असाल तर तुम्हाला खालच्या बारमधून वर स्वाइप करावे लागेल.
 • आणि वर स्वाइप केल्यावर Add a report वर क्लिक करा.
 • या बटणावर टॅप करण्यासोबतच युजरला घटनेच्या प्रकाराची माहिती द्यावी लागेल.
 • Google Maps वर रस्त्याशी संबंधित घटनांची तक्रार करताना ते इतर युजर्ससाठी एक सोय म्हणून काम करते. ज्या रस्त्यावर घटनांची नोंद केली जाते त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना Google Maps वापरून आगाऊ सूचना मिळू शकतात.

हे सुध्दा वाचा:- अशा प्रकारे तुम्ही मेटा थ्रेड्स खाते हटवू शकता, ‘या’ स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

मॅपल्सवर रस्त्याच्या घटनेची तक्रार कशी करावी?

 • पावसाळ्याच्या दिवसात खराब रस्ते, बंद रस्ते, पाणी साचणे आणि जामची तक्रार करण्यासाठी सर्वप्रथम ॲप उघडणे आवश्यक आहे.
 • येथे ॲपच्या खालच्या अर्ध्या स्क्रीनवर ‘Quick Access’ सेक्शन वर क्लिक करू शकता.
 • नंतर ‘post on Map’ चिन्हावर टॅप करावं लागेल.
 • या आयकॉनवर तुम्हाला ट्रॅफिक, सेफ्टी यांसारख्या श्रेणी आढळतील.
 • नंतर तुम्हाला ज्या श्रेणीसाठी अहवाल द्यायचा आहे ती येथून निवडावी लागेल.
 • ‘Search or choose location from map’ पर्यायाच्या उजवीकडे असलेल्या संपादन बटणावर क्लिक करा.
 • यानंतर तुम्हाला ठिकाण निवडावे लागेल. युजर्स त्यांचे नाव येथे लपवून घटनेची चित्रे आणि वर्णन देखील जोडू शकतात.
 • माहिती सामायिक केल्यानंतर फक्त ‘पूर्ण’ वर टॅप करा आणि तुमचे काम झाले.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan_Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button