इंजिन ऑईलचे किती प्रकार आहेत? जाणून घेऊया संपूर्ण माहिती |How many types of oil used in automobile?

मित्रांनो गाडीमध्ये इंजिन ऑइलला खूप महत्त्व असते. याशिवाय तुमचे वाहन अपूर्ण आहे. आपण जेव्हा गाडी सर्विस सेंटरला किंवा गॅरेजमध्ये नेल्यावर आपल्याला अनेक प्रकारचे इंजिन ऑइल दिसतात. पण आपल्याला कळत नाही की कोणते इंजिन ऑइल आपल्या गाडीसाठी चांगले आहे. काही गॅरेजवाले मार्जिन साठी लोकल इंजिन ऑइल सुद्धा गाडी टाकतात. यामुळे गाडीचे मायलेज आणि इंजिनला प्रॉब्लेम होऊ शकतो. यावेळेस आपल्याला काही सुचत नाही. म्हणून आज आपण या पोस्टमध्ये किती प्रकारचे इंजिन ऑइल (Types Of Engine Oil) असतात ते जाणून घेणार आहोत.

इंजिन ऑईलचे किती प्रकार आहेत? जाणून घेऊया संपूर्ण माहिती |How many types of oil used in automobile?

पारंपारिक इंजिन ऑईल (Conventional Engine Oil)

या तेलाला आपण नैसर्गिक किंवा खनिज इंजिन तेल असेही म्हणू शकतो. जे पूर्णपणे पेट्रोलियम पदार्थ आहे. हे इंजिन तेल समुद्रतळातून काढलेल्या कच्च्या तेलासह बाहेर येते. पेट्रोलियम रिफायनरीमध्ये कच्च्या तेलापासून इंजिन तेल वेगळे केले जाते. ही तेले सर्वात स्वस्त आहेत. पण हे ऑईल जास्त काळ सुरक्षित राहत नाहीत.

सेमी-सिंथेटिक इंजिन ऑईल (Semi-Synthetic Engine Oil)

सिंथेटिक तेलापेक्षा सामान्य इंजिन तेल खूपच स्वस्त आहे. पण त्याची कार्यक्षमता सिंथेटिक तेलापेक्षा कमी असते. हे लक्षात घेऊन खनिज आणि कृत्रिम इंजिन तेलांमध्ये संतुलन राखण्यासाठी सेमी-सिंथेटिक इंजिन ऑईल काढण्यात आले.

फुल सिंथेटिक इंजिन ऑईल (Full Synthetic Engine Oil)

फुल सिंथेटिक इंजिन तेल हे आधुनिक प्रकारचे इंजिन तेल आहे. त्यामुळे ते वापरण्याचे फायदे आहेत. फुल सिंथेटिक ऑईल कारखान्यात किंवा प्रयोगशाळेत पूर्णपणे रासायनिक पद्धतीने बनवले जाते. पण हे इंजिन ऑईल देखील सर्वात महाग आहेत. सिंथेटिक इंजिन तेल इतरांपेक्षा जास्त काळ टिकते.

हे सुद्धा वाचा: तुम्ही स्वतःच वाहनाच्या डॅशबोर्डवर कॅमेरा इंस्टॉल करू शकता, इंस्टॉल करण्यासाठी फक्त या स्टेप्स फॉलो करा

हाय मायलेज ऑईल (high-mileage oil)

उच्च-मायलेज इंजिन ऑइलमध्ये काही विशेष ऍडिटीव्ह जोडले जातात ज्यामुळे कारचे मायलेज देखील वाढते. लांबचा प्रवास करणाऱ्या गाड्यांमध्ये हे तेल वापरले जाते. जर तुम्ही तुमची कार किंवा बाईक जास्त वापरत असाल तर मायलेजसाठी हाय-मायलेज इंजिन ऑइल हा उत्तम पर्याय असू शकतो.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button