जीवन विमा खरेदी करताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा? होईल मोठा फायदा |How can I reduce my life insurance premium?

मित्रांनो लाइफ इन्शुरन्स ( Life Insurance Premiums) घेताना प्रीमियमची रक्कम खूप महत्त्वाची असते. ज्याच्या आधारावर अनेक लोक कोणती विमा योजना घ्यायची हे ठरवतात. तुम्हालाही कमी प्रीमियममध्ये आयुर्विमा योजना घ्यायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. चला तर जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आहेत त्या.

जीवन विमा खरेदी करताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा? होईल मोठा फायदा |How can I reduce my life insurance premium?

विमा लवकर घ्या

जीवन विमा हा असाच एक विमा आहे जो लवकर घेण्याचा फायदा आहे. मित्रांनो तुम्ही विमा जितक्या तरुण वयात घ्याल तितकाच त्याचा फायदा होईल. कमी प्रीमियमवर तुम्हाला अधिक कव्हरेज मिळेल.

मुदत विमा

जर तुम्हाला कमी प्रीमियममध्ये अधिक कव्हरेज मिळवायचे असेल तर मुदत विमा हा एक चांगला पर्याय आहे. याद्वारे कमी प्रीमियममध्ये मोठे कव्हरेज उपलब्ध आहे.

मासिक ऐवजी वार्षिक प्रीमियम घ्या

जर एखाद्याने मासिक ऐवजी वार्षिक प्रीमियम घेतला तर त्याचा फायदा होतो. कारण जर तुम्ही वार्षिक प्रीमियम घेतला तर तुम्हाला कंपन्यांकडून बरीच सूट दिली जाते.

पॉलिसी ऑनलाइन खरेदी करा

तुम्ही पॉलिसी ऑनलाइन खरेदी केल्यास तुम्ही प्रीमियमवर बचत देखील करू शकता. पॉलिसी ऑनलाइन खरेदी केल्याने एजंटचे कमिशन काढून टाकले जाते आणि पॉलिसी तुमच्यासाठी स्वस्त होते.

हे सुध्दा वाचा:- 99 वर्षांची लीज संपल्यानंतर आपल्या स्वप्नाचं घर सोडावं लागतं? जाणून घ्या नियम काय सांगतो

विमा पॉलिसींच्या सुविधा काय आहेत त्या चेक करा

अनेक विमा कंपन्या या बिनकामाच्या सुविधा जोडून त्या प्रीमियममध्ये ॲड केले जातात आणि ग्राहकांना दिल्या जातात. या कारणास्तव पॉलिसीच्या प्रीमियमची तुलना करताना तुम्ही नेहमी सुविधांकडे लक्ष दिले पाहिजे. बिनकामाच्या सुविधा कमी करून तुम्ही तुमच्या प्रीमियमची रक्कम कमी करू शकता.

निरोगी जीवनशैली ठेवा

जर तुम्ही निरोगी जीवनशैली ठेवली आणि अल्कोहोल-सिगारेटपासून दूर राहिलात तर विमा कंपन्या त्याचा फायदा म्हणून पाहतात आणि तुमचा विम्याचा हप्ता दारू-सिगारेट ओढणाऱ्यांपेक्षा कमी येतो.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button