12वी नंतर हे कोर्स केल्यावर तुम्हाला मिळेल चांगल्या पॅकेजची नोकरी |Best career options after 12th with high salary

मित्रांनो 12वी उत्तीर्ण (Career After 12th) झाल्यानंतरचा काळ कोणत्याही तरुणांसाठी करिअर घडवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येकाला बारावीनंतर असा कोर्स करायचा असतो जो केल्यावर लगेच चांगले पगाराचे पॅकेज मिळू शकते.

जर तुम्ही सुद्धा 12वी उत्तीर्ण झाला असाल आणि तुम्हाला अशा कोर्सेसची माहिती हवी असेल जे केल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त पगाराचे पॅकेज मिळते. तर मग ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही अशाच काही कोर्सेसची माहिती देणार आहोत जे केल्यानंतर तुम्हाला चांगले सॅलरी पॅकेज मिळू शकते.

12वी नंतर हे कोर्स केल्यावर तुम्हाला मिळेल चांगल्या पॅकेजची नोकरी |Best career options after 12th with high salary

बीटेक इन कम्प्युटर सायन्स

या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराला बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्याने गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यामध्ये प्रवेशासाठी JEE Mains, SRMJEE, MU-OET सारख्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. याशिवाय तुम्ही परदेशातूनही बी.टेक करू शकता. हा कोर्स केल्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनीअर, टेक्निकल सपोर्ट मॅनेजर, सॉफ्टवेअर ॲनालिस्ट इत्यादी म्हणून काम करता येते. हा कोर्स केल्यानंतरच विविध कंपन्या तुम्हाला चांगल्या पॅकेजवर नोकरी देतात. या क्षेत्रातील तुमचा प्रारंभिक पगार तुमच्या पात्रतेनुसार वार्षिक रु. 5 लाख ते रु. 40 लाख पर्यंत असू शकतो.

मेडिकल क्षेत्रात करिअर करा

तुमचा कल मेडिकल लाईनकडे असेल आणि तुम्हाला चांगल्या पगाराने सुरुवात करायची असेल तर तुम्ही एमबीबीएस कोर्स करू शकता. हा पाच वर्षांचा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये 4 वर्षांचा अभ्यास आणि शेवटचे एक वर्ष इंटर्नशिप केली जाते. टोटल 5 वर्षाचा आहे. या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला NEET परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. हा कोर्स केल्यानंतर सरकारी हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटलमध्ये नोकरी करून तुम्हाला लाखोंमध्ये पगार मिळू शकतो. याशिवाय तुम्ही तुमचे क्लिनिक उघडून महिन्याभरात लाखो रुपये कमवू शकता.

चार्टर्ड अकाउंटंट (CA)

जर तुम्ही 12वी नंतर असा कोर्स शोधत असाल ज्यामध्ये तुम्हाला सुरुवातीचा पगार लाखात मिळू शकेल, तर त्यासाठी तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट (CA) कोर्स करू शकता. भारतातील सीएचा सरासरी वार्षिक पगार 6 ते 7 लाख रुपये आहे. सीए कोर्स केल्यानंतर तुम्हाला सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील.

हे सुध्दा वाचा:- IT क्षेत्रातील या जॉब्सवर Artificial intelligence चा कोणताही परिणाम नाही, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या पोस्ट

मार्केटिंग मॅनेजर

12वी उत्तीर्ण झाल्यावर तुम्ही मार्केटिंग मॅनेजर कोर्स देखील करू शकता. हा कोर्स करण्यासाठी तुम्ही वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आजकाल प्रत्येक कंपनी मार्केटिंग मॅनेजरच्या पदासाठी लोकांना नोकऱ्या देते. नोकरी देण्याबरोबरच तुम्हाला या क्षेत्रात अधिक चांगले पगाराचे पॅकेजही दिले जाते. भारतात तसेच परदेशात मार्केटिंग मॅनेजर म्हणून नोकरी मिळवून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button