Home loan घेताय? मग सरकारी किंवा खाजगी बँकांकडून तुम्हाला चांगला व्याजदर कुठे मिळेल? जाणून घ्या |Home loan interest rate of private and government banks

मित्रांनो ती म्हण आहे ना, आपलं घर ते आपलंच असतं. भारतात लोक आयुष्यभराची कमाई ही घर विकत घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी खर्च करतात. पण, घर खरेदी करणे किंवा घर बांधणे हा नक्कीच मोठा खर्च आहे. बहुतेक लोक घर बांधण्यासाठी गृहकर्ज घेतात आणि नंतर दर महिन्याला ईएमआयद्वारे परतफेड करतात.

देशात दोन प्रकारच्या बँका आहेत, खाजगी आणि सरकारी बँका. दोन्ही बँका ग्राहकांना गृहकर्ज देतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमचे स्वप्नातील घर विकत घ्यायचे असेल किंवा बनवायचे असेल, तर तुम्हाला विविध सरकारी आणि खाजगी बँकांकडून दिल्या जाणार्‍या गृहकर्जावरील व्याजदरांबद्दल (Home loan interest rate?) देखील माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला सर्वोत्तम गृहकर्ज मिळू शकेल. 29 नोव्हेंबर रोजी बँकांच्या अधिकृत वेबसाइटवरून व्याजदराची माहिती घेण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊया संपुर्ण माहिती.

Home loan घेताय? मग सरकारी किंवा खाजगी बँकांकडून तुम्हाला चांगला व्याजदर कुठे मिळेल? जाणून घ्या |Home loan interest rate of private and government banks

सरकारी बँकांचे गृहकर्जाचे व्याजदर काय आहेत?

SBI Bank

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) गृहकर्जावर वार्षिक 8.40% व्याजदर देत आहे.

PNB Bank

पंजाब नॅशनल बँक (PNB) आपल्या पगारदार ग्राहकांसाठी गृहकर्जावर वार्षिक 8.50% व्याजदर देत आहे. तर पगार नसलेल्या लोकांसाठी व्याजदर 8.8% पासून सुरू होतो.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदा (BOB) गृहकर्जावर वार्षिक 8.40% व्याजदर देत आहे.

UCO Bank

UCO बँक गृहकर्जावर वार्षिक 8.45% व्याजदर देत आहे.

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडिया (BOI) गृहकर्जावर वार्षिक 8.30% व्याजदर देत आहे.

हे सुध्दा वाचा:- पोस्ट ऑफिसमध्येही मिळतो जीवन विमा योजनेचा लाभ, जाणून घ्या काय आहेत फायदे

खाजगी बँकांचे गृहकर्जाचे व्याजदर काय आहेत?

HDFC बँक

HDFC बँक, देशातील सर्वात मोठी बँक, आपल्या ग्राहकांना विशेष गृहकर्ज दर 8.50% देत आहे. तर मानक गृह कर्ज 8.75% पासून सुरू होत आहे.

ICICI बँक

ICICI बँक गृहकर्जावर वार्षिक 9.00% पासून व्याजदर देत आहे.

ॲक्सिस बँक

ॲक्सिस बँक आपल्या पगारदार ग्राहकांसाठी गृहकर्जावर वार्षिक 8.7% व्याजदर देत आहे. तर पगार नसलेल्या लोकांसाठी व्याज दर 9.10% पासून सुरू होतो.

कोटक महिंद्रा बँक

कोटक महिंद्रा बँक आपल्या पगारदार ग्राहकांसाठी गृहकर्जावर वार्षिक 8.7% व्याजदर देत आहे. तर पगार नसलेल्या लोकांसाठी व्याजदर हे 8.75% पासून सुरू होतो.

Telegram Grouplink
WhatsApp Channellink

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button