तांदळाचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Health benefits of rice in marathi

मित्रांनो आहारामध्ये भाताचे (Rice) सेवन न करणारे लोक फारच कमी आहेत. ज्यांना भाताची आवड नाही किंवा ज्यांनी पथ्यामुळे भात खाणे वर्ज्य मानले असेल अशी माणसे सोडल्यास बाकी सर्वत्र दिवसांतून एकदा तरी भाताचे सेवन करतात. शिजवलेल्या तांदुळाला भात म्हणतात. दीड ते दोन हात उंचीच्या तांदळाच्या रोपाला हिरव्यागार लोंब्या लागतात. या लोंब्या पिकून पिवळसर पडल्यावर त्यातून तांदळाचे दाणे बाहेर पडतात.

आंबेमोहोर, इलायची, बासमती, रायभोग, पंचसाल, जिरेसाळ, कमोद अशा अनेक प्रकारामध्ये तांदूळ मिळतो. भारतात तांदूळ सर्वत्र होतो. महाराष्ट्रामध्ये तांदळाचे सर्वाधिक पीक कोकणात येते. यंत्रावर पॉलिश करून आलेल्या तांदळापेक्षा हातसडीचा तांदूळ अधिक श्रेष्ठ, गुणकारी व पौष्टिक आहे.

तांदळाचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Health benefits of rice in marathi

  • तांदूळ थंड, हलका, गोड, रुचकर, स्निग्ध, थंड, पित्तनाशक, वीर्यवर्धक, शरीर पुष्टीवर्धक असतो.
  • भांग पिऊन नशा चढल्यास तांदळाची पेज करून प्यावी.
  • भाजल्यामुळे शरीरावर व्रण पडल्यास तांदळाची फोलकटे जाळून त्याची राख तुपात खलून व्रणांवर लावल्याने ते नाहीसे होतात.
  • तांदुळाची पेज काढून त्यात मध घालून प्यायल्याने तृषा रोग नाहीसे होतात.
  • शरीराचा दाह होत असल्यास तांदुळाच्या लाह्यांचा खडीसाखर घालून केलेला काढा वरचेवर थोडा थोडा प्यावा.
  • तांदळामध्ये चरबीचा अंश कमी असल्याने तो पचावयास हलका असतो. आजारी माणसाला तांदूळ व मुगाची खिचडी करून दिल्याने ती पचते.

हे सुध्दा वाचा:गव्हाचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • भात करीत असता त्यावर येणारी पेज काढून फेकू नये कारण ती थंड व पौष्टिक असते.
  • आजारी तसेच आजारामधून उठलेल्या माणसांना तांदळाची पेज द्यावी. तांदुळाची पेज देताना तांदूळ व मूग सारख्या प्रमाणात घेऊन भाजावे व त्यात पाणी घालून शिजत घालावेत. हे मिश्रण शिजत असतानाच त्यात सैंधव, मिरपूड, हिंग, सुंठपूड, धनेपूड व पिंपळपूड टाकावी व पूर्णपणे शिजल्यावर ही पेज खावयास द्यावी.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button