संधिवातावर व मूत्रविकारावर गुणकारी काकडी | Health Benefits of Cucumber in Marathi

चेहऱ्यावर मुरुम, पुटकळ्या, वांग, तीळ आणि चामखीळ आल्यामुळे चेहरा विद्रुप दिसतो. अशा वेळी काकडीचे चपटे तुकडे चेहऱ्यावर घासावे आणि काही वेळ म्हणजे जवळजवळ अर्धा तास तसेच ठेवावेत. दुसरे कोणतेही औषध करण्याची गरज नाही.सगळ्यात पहिले आपण काकडीमध्ये नेमके असते तरी काय ? ते जाणून घेऊया.

काकडीमध्ये नेमके असते तरी काय ?

पाणी 96.4 टक्के, प्रोटीन 0.4 टक्के, चरबी 0.1 टक्के, काबोदित पदार्थ 2.8 टके, खनिज 0.3 टके, कॅल्शियम 0.01 टक्के, फॉस्फरस 0.03 टक्के, लोह 1.5 मि. ग्रॅम / 100 ग्रॅम, जीवनसत्त्व ‘बी’ 90 आं. रा. ए. 100 ग्रॅम.

संधिवातावर व मूत्रविकारावर गुणकारी काकडी | Health Benefits of Cucumber in Marathi

काकडी ही वेलीवर तयार होणारे फळभाजी आहे. नवीन संशोधनानुसार संधिवातावर काकडी अतिशय गुणकारी ठरलेली आहे. वजन कमी करण्यासाठी काकडीचा रस हा एक उत्तम उपाय आहे. मूत्रविकारावर काकडी अत्यंत परिणामकारक आहे.

शरीराला शीतलता देण्याचा अभिनव गुणधर्म या काकडीत आहे. ज्यांना वारंवार अंगावर पुळ्या उठतात, गळवे उठतात, उन्हाळ्यात घामोळ्याचा त्रास होतो अशा लोकांनी काकडीचा अवश्य औषधासारखा उपयोग करावा.

सर्वसाधारणपणे काकडी कापून त्यावर तिखट, मीठ, मिरची लावून चवदारपणे खाण्याची सर्वांना इच्छा असते. तशी खातातही पण काकडी औषध म्हणून उपयोगात आणायची तर जिभेच्या चोचल्यांना आवर घालायला हवा.

काकडीचा रस बियांसह ज्युसरमध्ये काढा. ज्युसर नसल्यास काकडी किसून रस काढा. तो रस प्राशन करा. काकडीमध्ये कॅलरीज अत्यंत कमी प्रमाणात असतात. त्याचा फायदा स्थूलपणा कमी करण्यासाठी होतो. काकडीच्या रसातील इतर औषधी गुणधर्म आपले काम चोख बजावतात.

कोणत्याही प्रकारचा थकवा न जाणवता वजन कमी करणे आणि स्थूलपणा घालविणे सहज शक्य आहे. एखाद्या निसर्गोपचार तज्ज्ञाच्या देखरेखीखाली अथवा मार्गदर्शनाखाली हा प्रयोग करून बेढव शरीरयष्टी तयार झालेल्यांनी सुडौल आणि आकर्षण व्यक्तिमत्व प्राप्त करून घ्यावे.

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वजन कमी करणे सहज शक्य आहे. स्थूलपणा, केस गळणे, टकल पडणे या दोन भेडसावणाऱ्या तक्रारी वारंवार ऐकायला येतात. या तक्रारी दूर करण्यासाठी लोक हजारो रुपये खर्च करीत असतात. यापैकी स्थूलपणा काकडीच्या कल्पाने कमी करता येतो. निसर्गोपचार तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग जरूर करा.स्थूलपणा कमी झाल्यास त्याच्याशी संबंधित हृदयविकार, पोटाच्या तक्रारी अशा अनेक असाध्य विकारांनाही निश्चितच आळा बसेल.

काकडीमध्ये साधी काकडी, सातपत्ती काकडी, तरकाकडी आणि नारंगी काकडी अशा पुष्कळ जातीच्या काकड्या आहेत. पिवळ्या आणि छोट्या फळास काडी म्हणतात तर काळसर हिरवट सालीच्या व मोठ्या आकाराच्या फळास ‘तौसे’ किंवा ‘खिरा’ म्हणतात. काकडीचा उपयोग जेवणात कोशिंबीर, रायते व सांगडे अशा अनेक प्रकाराने केला जातो.

मूतखड्यावर काकडी

ज्येष्ठमध आणि दारूहळदीच्या चूर्णात काकडीच्या बीयांचा मगज मिसळून ते मिश्रण तांदुळाच्या धुवणातून मूतखडा पडेपर्यंत सकाळ, दुपार, संध्याकाळ तीन वेळा घ्या. मूतखड्यासाठी दुसरा उपाय म्हणजे कबुतराच्या विष्ठेमध्ये काकडीचे बी वाटून तांदुळाच्या धुवणातून द्या.

मांसाहारानंतर काकडी

मांसाहार हा पचनास जड असतो. मांसाहार झाल्यानंतर मिरे व मीठ लावून काकडी अवश्य खावी. मांसाहार पचनी पडतो. दारू चढली तर काकडी व कांद्याचा रस एकत्र करून प्यावा. दारूची नशा उतरते. नुसती काकडी खायला दिली तरी दारूची नशा उतरते.

मुरुम, पुटकळ्यांवर काकडी

चेहऱ्यावर मुरुम पुटकळ्या, वांग, तीळ आणि चामखीळ आल्यामुळे चेहरा विद्रुप दिसतो. अशा वेळी काकडीचे चपटे तुकडे चेहऱ्यावर घासावे आणि काही वेळ म्हणजे जवळजवळ अर्धा तास तसेच ठेवावेत. दुसरे कोणतेही औषध करण्याची गरज नाही.

नेत्रांजनाऐवजी काकडी

अतिमद्यपानामुळे, जागरण, अतिवाचन यामुळे डोळे लाल होतात. अशा वेळेस आपण नेत्रांजन नाहीतर औषध डोळ्यात घालतो. परंतु निसर्गाने आपल्या जवळपास दिलेल्या औषधाचा एकतर विसर पडतो किंवा माहिती नसते. विसराळू विनूसाठी आणि ज्यांना माहीत नाही अशांसाठी निसर्गाने दिलेला उपाय सांगतो. काकडीच्या चकत्या करा. त्या डोळ्यावर ठेवा आणि रूमालाने डोळे बांधा आणि झोपा. उठल्यानंतर डोळ्यातली लाली पळून गेलेली असेल. डोळे पूर्ववत झालेले असतील. लघवी होण्यासाठी काकडीचा रस

कधीकधी लघवी तुंबते. त्याची कारणे अनेक आहेत. प्रसंगी हातापायास मुंग्या, अस्वस्थपणा, डोळे दुखणे अशी लक्षणे आढळतात. अशा वेळी लघवी गर्द पिवळी होते आणि कावीळ झाली की काय अशा शंकेनेच माणूस घाबरून अर्धमेला होतो. अशा वेळी 1 कप काकडीचा रस, 1 कप लिंबाचा रस व 1 चमचा खडीसाखर हे मिश्रण दिवसातून तीन वेळा घ्यावे. त्याने लघवी भरपूर सुटते आणि अतिशय बरे वाटते. अंगाला सूज आल्यास काकडीचा रस चोळा. सूज कमी होते.

श्वेतप्रदर आणि काकडी

काकडीच्या बीयांचा मगज 1 तोळा आणि पांढऱ्या कमळाच्या कळ्या 1 तोळा घ्या. त्यात जिरे आणि साखर घालून सकाळ-दुपार – संध्याकाळ असे दिवसातून तीन वेळा हा प्रयोग श्वेतप्रदर विकार नष्ट होईपर्यंत करा.

लघवीतून रक्त पडणे

ज्यांना लघवीतून रक्त पडण्याचा अधुनमधुन त्रास होतो, त्यांनी 1 चमचा काकडी बीचे चूर्ण घेऊन, आवळ्याचा रस 1 चमचा व गुलकंद 1 चमचा अशा मिश्रणात घालून खावे. शक्यतो जेवणापूर्वी हा प्रयोग करावा. काकडीच्या बिया काकडीचा मोसम असतानाच काढून सुकवून ठेवाव्यात. म्हणजे त्याचा योग्य वेळी घरगुती स्वरूपात औषधासारखा उपयोग करणे सहज शक्य होईल.

अजीर्ण

काकडीच्या बियांचा उपयोग अजीर्णावरसुद्धा आहे. अजीर्ण ही आपल्या कुटुंबात वर्षातून एक दोनदा तरी कुणालातरी भेडसावणारी तक्रार आहे. अजीर्ण होऊन मळमळ, तोंडास पाणी सुटणे, उलट्या होणे वगैरे त्रासावर काकडीच्या बिया पाण्यात वाटाव्यात आणि साखर टाकून चाटण्यासारख्या खा. उत्तम लाभ होतो. अजीर्ण पळून जाते.

वरचेवर सर्दी, खोकला असणाऱ्यांनी काकडी जास्त प्रमाणात खाऊ नये. दमेकऱ्यांनी तर काकडीकडे दुरुनही पाहू नये. तौसा किंवा काकडी पिवळीगर्द पिकलेली उपयोगात आणू नये. रात्री काकडी खाऊ नये. संधिवातावर काकडीचा रस उत्तम उपाय आहे. पण तो निसर्गोपचार तज्ज्ञाच्या देखरेखीखालीच करावा.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button