नंबरप्लेटची सुरुवात कधीपासून झाली? | History of Number Plates in marathi

आपल्याला रस्त्यावर वेगवेगळ्या गाड्या धावताना दिसतात. या प्रत्येक गाडीवर नंबरप्लेट लावलेली असते. भारतात प्रत्येक गाडीला RTO ऑफिसमधून एक वाहन क्रमांक दिला जातो. तो वाहन क्रमांक म्हणजे त्या गाडीची ओळख असते. त्या वाहन क्रमांकावरून मग गाडीचा मालक कोण? गाडी कधी घेतली? अशाप्रकारे गाडीची सर्व माहिती उपलब्ध होते. प्रत्येक राज्याचे RTO ऑफिस त्यांच्या निर्धारित कोड आणि क्रमांकानुसार आपल्या राज्यातील गाड्यांना क्रमांक पुरवते. सेंट्रल मोटर व्हेईकल नियमानुसार गाडीच्या मालकाला RTO ऑफिसकडून मिळालेला क्रमांक गाडीच्या पुढल्या आणि मागच्या बाजूला दिसेल अशा स्थितीमध्ये लावणे बंधनकारक असते. तुम्हाला माहित आहे का नंबरप्लेटचा इतिहास? जगात कधीपासून नंबरप्लेटची पद्धत सुरू झाली?

नंबरप्लेटची सुरुवात कधीपासून झाली ? | History of Number Plates in marathi

नंबरप्लेटची प्रथा सगळ्यात पहिल्यांदा फ्रान्समध्ये अस्तित्वात आली. रजिस्ट्रेशन नंबरप्लेट फ्रान्सने सुरू केली. 14 ऑगस्ट1893 रोजी पॅरिस पोलीस ऑर्डिनेंसला पास केल्यानंतर पहिल्या नंबरप्लेटचा जन्म झाला. काही जण असे म्हणतात सोळावा किंग लुईस यांच्या आदेशानंतर राजघराण्यातील गाडीवर नंबरप्लेट लावण्यात आली होती. 1783 पासून फ्रान्समध्ये गाडीवर नंबरप्ले लावण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 1896 पासून जर्मनीने नंबरप्लेट स्विकारली आणि जर्मनीमधील वाहनांवर नंबरप्लेट दिसू लागली. जर्मनीनंतर नेदरलँण्डने 1898 मध्ये ड्राइविंग परमिट या प्रकाराद्वारे नंबरप्लेट देण्यास सुरुवात केली. 1906 पर्यंत नंबरप्लेटमध्ये अनेक बदल पहायला मिळाले.

भारतात नंबरप्लेटचा ट्रेन्ड 18 व्या शतकापासून सुरु झाला. आपल्या देशात नोंदणी प्लेट प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे जारी केली जाते. या नंबर प्लेटवर त्या राज्याचा कोड दोन अक्षरात लिहिलेला असतो जिथे गाडीचे रजिस्ट्रेशन झालेले असते. त्यानंतर असणारे दोन रोड प्रादेशिक ट्रांसपोर्ट ऑफिसची माहिती देतात. मग आणखी एक कोड असतो. त्यानंतर एक युनिक नंबर मिळतो आणि ऑप्शनल लेटर्स मिळतात. या प्रकारात देशभरात रजिस्ट्रेशन नंबर अलॉट केले जातात. सध्या राज्यात आणि शहरात नंबरप्लेटची जी सिस्टम सुरू आहे त्याची सुरुवात 1990 पासून झाली होती.

काहीजणांसाठी गाडीची नंबर प्लेट हा प्रतिष्ठेचा विषय असतो. त्यामुळे अनकेजण लकी नंबर नुसार गाडीची नंबर प्लेट घेतात. हा ट्रेन्ड अनेक वर्षांपासून आपल्या देशात प्रचलित आहे. आपल्या लोकांना हे नंबर्सचं आकर्षण खूप असतं. त्यामागची प्रत्येकाची कारणं वेगळी असतात, काहींना त्या नंबरमध्ये संख्याशास्त्र दिसतं तर काहींना नुसता रुबाब दाखवायचा असतो. तुम्हाला वाहनावर VIP नंबर हवा असेल तर RTO चे रेट ठरलेले असतात आणि आपल्याकडे लकी नंबरसाठी लोक काहीही करतील अशीच अवस्था आहे. आरटीओने दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे नोंदणी क्रमांक कसे लिहावेत, यासंबंधी नियमावली स्पष्ट केली असतानाही ती सर्रास धाब्यावर बसवली जाते. तुम्ही पाहिले असले की कुठे लहान मोठे क्रमांक, कुठे कॅलिग्राफी, कुठे नंबरबरोबर प्रिय व्यक्तीचे नाव किंवा राजा महाराज यांची चित्र असे अनेक कलात्मक प्रकार आपल्याला नंबर प्लेटमध्ये दिसतात.

नंबरप्लेटचे विविध प्रकार आहेत. जर गाडीवर लाल रंगाची नंबर प्लेट असेल तर ते वाहन भारताच्या राष्ट्रपतींचे किंवा कोणत्या तरी राज्याच्या राज्यपालांचे असते. तारे असणारी नंबर प्लेट दिसली तर समाजावे ती गाडी सैन्यातील आहे. हे खास नंबर असतात त्याला रक्षा मंत्रालयाकडून मान्यता मिळालेली असते. ही नंबर प्लेट 11 अंकांची देखील असते. पांढरी नंबर प्लेट असलेल्या गाड्या रस्त्यावर आपण नेहमी पाहतो. ही गाडी वैयक्तिक कारणासाठी वापरली जाते. जी वाहने ट्रान्सपोर्टसाठी असतात त्यावर आपल्याला पिवळी नंबर प्लेट दिसते. ही नंबर प्लेट पाहिली की लगेच लक्षात येते की ही टॅक्सी आहे.

जी वाहने विदेशी प्रतिनिधींद्वारे वापरली जातात त्यांना निळ्या रंगाची नंबरप्लेट असते. अशी वाहने आपल्याला दिल्लीत जास्त करून पहायला मिळतील. रस्ते मंत्रालयाच्या इलेक्ट्रिक परिवहन वाहनांना हिरव्या रंगाच्या नंबर प्लेट लावलेल्या असतात. आता वैयक्तिक इलेक्ट्रीक वाहन असल्यास त्याच्या आकड्याचा रंग पांढरा आणि नंबर प्लेट हिरवी असेल. जर कमर्शियल इलेक्ट्रिक वाहन असल्यास त्याच्या आकड्यांचा रंग पिवळा असेल ती वाहने टॅक्सी म्हणून वापरली जाते. नंबर प्लेट्स ही खरं तर गाडीची ओळख असते. त्या नंबर वरून ती गाडी कोणत्या राज्यातील कोणत्या शहरातील आणि कधीची तिची पासिंग आहे हे समजतं. यासाठीच त्या गाडीत बसणाऱ्या व्यक्तीकडून काही गुन्हा घडल्यास लगेचच गाडीचा नंबर टिपून घ्यायला सांगितलं जातं कारण त्यावरूनच तो व्यक्ती पकडला जाऊ शकतो. अशी ही नंबर प्लेट लहान असली तरी तिचं काम फार मोठं आहे.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button