पाण्याबद्दलची ही माहिती तुम्हाला माहित आहे का? |Drinking water health benefits in marathi

पाणी (water) हा आपल्या रोजच्या आहारामधील, शरीराच्या चलनवलनासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. पाण्याशिवाय कोणताही प्राणी जगू शकत नाही. पाण्याला जल संजीवनी म्हटले जाते. निसर्गातील प्रत्येक घटकात पाण्याचा अंश असतो.. पाणी उपयोगात आणताना पाळावयाची पथ्ये.

पाण्याबद्दल ची माहिती तुम्हाला माहित आहे का? |Drinking water health benefits in marathi

 • पाणी चांगले उकळवून गरम करावे व मगच वापरात घ्यावे.
 • कोमट पाणी हवे असल्यास गरम पाण्यात दुसरे थंड पाणी घालून न घेता उकळवलेले पाणी थंड करून घ्यावे.
 • एकदा उकळवून थंड केलेल्या पाण्यात पुन्हा थंड पाणी घालून ते पाणी गरम करून घेऊ नये.
 • पाणी उकळवल्याने त्यातील क्षार, खनिजे ह्यांचा -हास होतो हे जरी खरे असले तरी पाणी दूषित असण्याची शक्यता लक्षात घेऊन ते उकळवून वापरणे हितावह ठरते.
 • उन्हातून घरी आल्यावर लगेचच पाणी पिऊ नये. प्रथम शांतपणे बसून हळू हळू पाणी प्यावे. शक्य झाल्यास प्रथम गुळाचा खडा खाऊन त्यावरच मग पाणी प्यावे. असे केल्याने जोम येतो व थकवा जाणवत नाही.
 • स्नानासाठी शक्यतो थंड पाणी वापरावे. स्नान करताना प्रथम खांद्यावरून पाणी ओतावे मगच डोक्यावर पाणी ओतावे. शरीराच्या तापमानाचा तोल त्यामुळे सांभाळला जातो. स्नान करताना गरम पाणी डोक्यावर ओतू नये.
 • चरबीचे प्रमाण वाढल्यास मेदरोग असलेल्यांनी दिवसभर थोड्या थोड्या वेळाने अर्धा ग्लास पाणी आणि जेवणापूर्वी ग्लासभर पाण्यात चिमूटभर सुंठपूड घालून पाणी घोट-घोट अशा रितीने प्यावे.
 • जेवणापूर्वी पाणी पिऊ नये, जेवणाच्या मध्ये थोडे थोडे पाणी प्यावे. जेवणापेक्षा जास्त पाणी पिऊ नये.
 • थकवा, अशक्तता जाणवत असल्यास थंड पाण्याने हात पाय धुऊन कपाळावर कफ, थंड पाण्यात भिजवलेल्या कपड्याची घडी ठेवावी.
 • डोके दुखत असल्यास, मिनिटे पाय बुडवून ठेवावे. डोळे दुखत असल्यास गरम पाण्यात 10 ते 15
 • तोंडावर पाण्याचे हळुवारपणे हबके मारल्याने प्रसन्न वाटते. चेहऱ्यावरील रंध्रे मोकळी होतात. चेहरा स्वच्छ होतो.
 • डोळे धुवायचे असल्यास काठोकाठ भरलेला पेला घेऊन त्यात डोळ्यांची उघडझाप करावी. त्यामुळे डोळ्यांमधील धूलीकण, कचरा बाहेर पडतो व डोळे स्वच्छ होतात.

हे सुध्दा वाचा:टोमॅटोचे side effects तुम्हाला माहित आहे का?

 • सकाळी उठल्यावर दात घासण्यापूर्वी ग्लासभर पाणी प्यावे. अनेक जुन्या रोगांपासून आराम मिळतो. शौचास साफ होते. संपूर्ण दिवसभर प्रसन्न वाटते.
 • हाताचे तळवे कोमट पाण्यात 15-20 मिनिटे बुडवून ठेवल्याने श्वास, धाप लागणे तसेच दम्याच्या विकारात आराम पडतो.
 • जळवात किंवा फार घाम येत असल्यास पायाचे तळवे 10-15 मिनिटे थंड पाण्यात बुडवून ठेवावे.
 • कोमट पाणी 4-5 मिनिटे ओटीपोटावर ओतत राहिल्याने पोटातील उष्णता कमी होते व आतड्यांच्या विकारांमध्ये गुण येतो.
 • स्नायू बळकट होण्यासाठी पाण्याच्या टबमध्ये 4-5 मिनिटे बसावे. असे केल्याने शरीरातील स्नायूंमध्ये जोम निर्माण होतो.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button