संयुक्त महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनाविषयी माहिती | Devendra fadnavis biography in marathi

देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) अर्थात संयुक्त महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 साली महाराष्ट्रातील नागपूर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर फडणवीस व आईचे नाव सरिता फडणवीस हे आहे देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस हे नागपूर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. देवेंद्र फडणवीस यांचे प्राथमिक शिक्षण नागपूर येथील सरस्वती विद्यालय येथून झाले. व पुढील माध्यमिक शिक्षण धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केले. व त्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याच्या पदवीचे शिक्षण घेतले.

संयुक्त महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनाविषयी माहिती | Devendra fadnavis biography in marathi

पुर्ण नाव देवेंद्र गंगाधर फडणवीस
जन्म दिनांक22 जुलै 1970
जन्म स्थाननागपूर
ओळखराजकारणी
वडिलांचे नावगंगाधर फडणवीस
आईचे नावसरिता फडणवीस
पत्नीचे नावअमृता फडणवीस
अपत्याचे नावदिविजा फडणवीस (मुलगी)
शिक्षणदेवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले तसेच व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले.
राष्ट्रीयत्वभारतीय
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

देवेंद्र फडणवीस याचं राजकीय जीवन

देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात नव्वदच्या दशकात सुरू झाली. बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. आपल्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) चे सदस्य होते. नागपूर महानगरपालिकेत त्यांनी 21व्या वर्षी नगरसेवक होण्याच्या बहुमान मिळवला व त्यानंतर वयाच्या 26व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेचे सर्वात तरुण महापौर झाले. तसेच सर्वात कमी वयात दुसऱ्यांदा महापौर झालेले देवेंद्र फडणवीस देशातील दुसऱ्या नंबरचे नेते आहेत.

आपल्या पारदर्शक कामामुळे लोकांमध्ये लोकप्रिय असलेले देवेंद्र फडणवीस 1999 साली झालेल्या विधानसभेतील विजयाने महाराष्ट्र विधानसभेत पोहोचले. फडणवीस हे महाराष्ट्र विधानसभेतील नागपूर दक्षिण-पश्चिम मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्वामुळे देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षात (Bharatiya Janata Party )राज्यस्तरावर लोकप्रिय बनत गेले. (90च्या दशकात देवेंद्र फडणवीस भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहिले तसेच 2001 साली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले).

2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र राज्यात प्रथम भारतीय जनता पक्ष युती धर्मात मोठा भाऊ म्हणून नावारूपास आला. त्यांचे कारण म्हणजे महाराष्ट्र विधानसभेत भारतीय जनता पक्षाला शिवसेनेपेक्षा अधिक जागावर विजय मिळवला.

राष्ट्रवादी-काँग्रेस या आघाडी सरकारवर जोरदार हल्ला

शिवसेनेकडे असलेले विरोधी पक्षनेता हे पद भारतीय जनता पक्षाच्या आमदार असलेल्या एकनाथ खडसे यांच्याकडे आले. एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या साह्याने तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी-काँग्रेस या आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. खडसे -फडणवीस या जोडीगोळीने आघाडी सरकारचे कथित सिंचन घोटाळा, बांधकाम घोटाळा यांसारखे अनेक आरोप करून आघाडी सरकारला अडचणीत आणले.

याच दरम्यान केंद्रात काँग्रेस प्रणित आघाडीला आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केले होते. 2013 साली देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले होते. त्यानंतर पुढील वर्षात 2014 साली देशात लोकसभेचे पडघम वाजले.

नरेंद्र मोदी (Narendra modi) यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने काँग्रेस प्रणित आघाडीचा पराभव केला. व त्यानंतर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. लोकसभा निवडणुकीनंतर संयुक्त महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल वाजले. लोकसभा निवडणुकीत सोबत असलेले मित्रपक्ष (शिवसेना) विधानसभेच्या यांच्यासोबतच्या जागांवर मतभेद घेऊन भारतीय जनता पक्ष दुरावला गेला. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 288 विधानसभा जागेपैकी 122 जागा मिळाल्या.

भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष

2014 च्या संयुक्त महाराष्ट्राच्या विधानसभेत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला.1999-2014 पर्यंत सलग आमदार राहिलेले व कधीही मंत्रीपद न भूषवलेले देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे गटनेते म्हणून निवडले गेले. 31 ऑक्टोंबर 2014 ला देवेंद्र फडणवीस संयुक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात जलयुक्त सिंचन योजना, कोकण रेल्वे, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीच्या महाराष्ट्र अग्रेसर बनविला.

31 ऑक्टोंबर 2014 – 8 नोव्हेंबर 2019 हा सलगपणे पाच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासात केवळ वसंतराव नाईक (vasantrao naik) यांच्यानंतरचे दुसरे मुख्यमंत्री आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्रीपद झालेले पहिले व आजपर्यंतचे एकमेव व्यक्ती आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासात शरद पवार नंतर (वय – 38) सर्वात कमी वयात मुख्यमंत्री होण्याचा बहुमान देवेंद्र फडणवीस (वय -44) यांना मिळाला आहे.

सर्वात कमी म्हणजे तीन दिवसाचे मुख्यमंत्री

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन करणारे देवेंद्र फडणवीस (23 नोव्हेंबर 2019 – 26 नोव्हेंबर 2019) या कार्यकाळात सर्वात कमी म्हणजे तीन दिवसाचे मुख्यमंत्री होते. सध्याच्या घडीला आपली पारदर्शक, अभ्यासकवृत्ती असलेले देवेंद्र फडणवीस संयुक्त महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेता म्हणून कार्यकाळ सांभाळत आहे.

Note: जर तुमच्याकडे Biography of Devendra fadnavis in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Devendra fadnavis biography information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button