कारले खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Bitter melon health benefits in marathi

मित्रांनो स्वादाने अत्यंत कडू परंतु परिणामात गोड फळ देणारी कारली (Bitter melon) आहारात औषधाचे एक महत्त्वाचे स्थान निर्माण करते. मोठ्या व लहान स्वरूपात आढळणारी कारली पांढऱ्या व हिरव्या रंगात मिळतात. आहारामधून आपल्याला आवश्यक अशा रसांची पूर्तता कारल्यातील कडू रस करतो. कारल्यातील कडूपणा कमी करण्यासाठी त्याच्यावरील साल काढण्यात येते तर त्यांचे काप करून त्याला मीठ चोळण्यात येते. नंतर ती कारली दाबून त्यातील पाणी काढून टाकल्याने कडवटपणाचे प्रमाण कमी होते. कारल्याच्या भाजीमध्ये भरपूर कांदा घातल्यानेही कारल्याचा कडवटपणा कमी होतो. कारल्याच्या मोसमात शक्य तेवढी कारली खाणे श्रेयस्कर ठरते.

कारले खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Bitter melon health benefits in marathi

 • कारली हलकी, कडू, थंड, मलावरोध दूर करणारी, वायुहारक, वात- -पित्त- रक्तविकार, कृमी दूर करणारी आहेत. मोठ्या कारल्यापेक्षा लहान कारली गुणकारी असतात. कारल्याची पाने ज्वर- -कृमीनाशक व मूत्रल असतात.
 • कारल्याच्या पानांचा रस गरम पाण्यातून दिल्यास कृमी दूर होतो. कारल्याच्या पानांना वाटून तो रस त्वचारोगांवर लावल्यास फायदा होतो.
 • रक्तशर्करेच्या विकारामध्ये कारल्याच्या पानांचा चमचाभर रस साखर घालून घेतल्याने फायदा होतो.
 • देवी हा रोग झाल्यास कारल्याच्या पानांच्या रसात हळद घालून घ्यावा.
 • कारल्याच्या पानांचा रस प्यायल्यास उलटी व जुलाबामधून पित्त बाहेर पडते. त्यावर उतार पडावा म्हणून तूप-भात खावा.
 • विषमज्वराचा ताप आल्यास कारल्याच्या पानांचा रस शरीरावर चोळावा.

हे सुध्दा वाचा:पावसाळ्यात या खाद्यपदार्थांपासून दूर राहा, अन्यथा तुम्ही पण आजारी पडू शकता

 • आम्लपित्तामुळे जेवल्यावर उलटी झाल्यास कारल्याची पाने तुपात भाजून सैंधव घालून खावीत.
 • मधुमेहामध्ये लघवीवाटे साखर जाते अशा वेळेस कोवळ्या कारल्याचे तुकडे करून ते सावलीत सुकवावे व तुकडे कुटून त्याचे बारीक चूर्ण रोज सकाळ- संध्याकाळ थोडे थोडे चार महिने घ्यावेत.
 • कारल्याचे मूळ वाटून त्याचा लेप कंड सुटत असेल तेथे किंवा फोडावर लावल्यास फायदा होतो.
 • कावीळ झाली असता कारल्याचा अर्धा कप रस सूर्योदयापूर्वी रिकाम्या पोटी घ्यावा व त्यानंतर साधारणपणे अर्धा-पाऊणतास काही खाऊ नये.
 • संधिवात किंवा ब्राँकायटीसमध्ये कारल्याच्या पानांचा रस घेण्याने उलटी होऊन कफ बाहेर पडतो व वाताचा जोर कमी होतो.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button