स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक का करावी? | Why invest in the stock market?

गुंतवणुकीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत त्यापैकी बरेच जण हे पारंपारिक गुंतवणूक प्रकारांवर भर देतात जसे की रिअल इस्टेट, सोने चांदी किंवा मौल्यवान धातू मधील गुंतवणूक, बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट मध्ये रक्कम गुंतवणे इत्यादी.

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक का करावी? | Why invest in the stock market?

रिअल इस्टेट आणि सोन्यामधील गुंतवणूक वाढण्याची शक्यता जास्त असते पण त्याला वेळ सुद्धा तेवढाच द्यावा लागतो. आपण आपल्याकडील रक्कम फिक्स जर डिपॉझिट मध्ये ठेवली तर रक्कम सुरक्षित राहते पण त्याचा आपल्याला काहीच परतावा मिळत नाही. कसा ते पाहू या.

गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय समजल्या जाणाऱ्या फिक्स डिपॉझिट मध्ये आपल्याला आठ टक्के प्रमाणे व्याजदर मिळतो. या मिळालेल्या व्याजावर आपल्याला टॅक्स सुद्धा द्यावा लागतो. सरासरी जर आपण 20% इन्कम टॅक्स स्लॅब मध्ये बसत असाल तर आपला टॅक्स कापला जाऊन आपल्याला सहा टक्के पर्यंत परतावा मिळतो. जर आपण महागाईदर पाहिला तर तो सुद्धा सहा टक्क्यांच्या जवळपास आहे. म्हणजे जर आपण शंभर रुपये एफडी मध्ये गुंतवले तर त्याचे 106 रुपये होतात आणि महागाई दर जर सहा रुपये पकडला तर आपल्याला एवढी मधून शून्य टक्के परतावा मिळतो पण बर्याच जणांच्या ही गोष्ट लक्षात येत नाही आणि ते एफडी मध्ये गुंतवणूक करीत राहतात.

याउलट स्टॉक मार्केटमध्ये अशी बरीच उदाहरणे आहेत ज्याने आपल्याला एका वर्षात शंभर टक्के पेक्षा जास्त रिटर्न्स दिलेले आहेत. पण हे प्रत्येक वेळी शक्य होत नाही त्यासाठी स्टॉक मार्केटचा अभ्यास असणं जरुरी आहे. जर आपल्याला स्टॉक मार्केट विषयी काही माहित नसेल तर आपल्यासाठी गुंतवणुकीचा आणखी एक पर्याय आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड याविषयी आपण आपल्या म्युच्युअल फंड सेक्शनमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.

तर तात्पर्य म्हणजे, बँकेमध्ये एफडी करणे म्हणजे वर्षानुवर्षे कपाटात पैसे ठेवण्यासारखे आहे ज्यावर आपल्याला कोणताही परतावा मिळत नाही. स्टॉक मार्केटमध्ये जर योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर आपली इन्वेस्टमेंट कितीतरी पटीने वाढू शकते.

यामध्ये रिस्क निश्चितच आहे पण जर आपण मोठ्या कालावधीसाठी स्टॉक मध्ये इन्वेस्टमेंट केली तर आपल्याला निश्चितच चांगला परतावा मिळतो. राकेश झुनझुनवाला, दमानी यासारखी बरीच उदाहरणे आपण ऐकली असतील ज्यांना स्टॉक मार्केटनेच करोडपती बनवले. पण स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकी पूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात. या विषयावर आणखी पोस्ट येणार आहेत त्या नक्की वाचा. आणि हो आपल्या Dnyan_shala आणि Shares_dnyan या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button