बाबूराव गोपाळ पेंढारकर यांचा जीवनप्रवास | Baburao Pendharkar Biography in Marathi

असं म्हणतात की, कलाकाराला त्याच्या कलेला कसलीच सीमा नसते. तो जगतो केवळ कलेसाठी आणि लढतो ते ही कलेच्या ओढीनेच. असाच एक कलाकार ज्याने आपल्या कलाकृतींनी भल्याभल्याना आपल्या प्रेमात पाडलं. या कलाकाराचं नाव म्हणजे “नटवर्य बाबुराव पेंढारकर” ज्याला एक कला अवगत असते, त्याला दुसऱ्या कलेतलं सौंदर्य ही खुणावत राहतं.

बाबूराव गोपाळ पेंढारकर यांचा जीवनप्रवास | Baburao Pendharkar Biography in Marathi

बाबुरावांच्या बाबतही असंच झालं होतं. ते अभिनयात जितके माहीर होते तितकेच ते दिग्दर्शक आणि निर्मातेही होते. त्यांच्या अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती या तिहींचा मिलाफ त्यांच्या ठायी होता. ह्यामुळे त्यांना प्रेक्षकांची नस बरोबर सापडली. त्यांचा जन्म 22 जून 1896 मध्ये कोल्हापुरात झाला होता. कोल्हापूरच्या रश्याचा तो झणझणीतपणा त्यांच्या कामातही दिसत होता.

बाबुरावांच्या आईचं नाव ‘राधाबाई पेंढारकर तर वडिलांचं नाव हे ‘गोपाळ पेंढारकर’ होतं. पेंढारकर कुटुंबियांचं वास्तव्य हे कोल्हापुरातच होतं. त्यामुळेच बाबूरावांनी अभिनय आणि निर्मितीचा पहिलाच डाव कोल्हापुरात मांडला. म्हणजे असं की कोल्हापूरात 1929 मध्ये “प्रभात” ही चित्रपट कंपनी सुरू झाल्यानंतर लगेचच त्यांना ‘व्यवस्थापक’ म्हणून तिथे काम करण्याची संधी मिळाली. इथे व्यवस्थापन करता करता, त्यांच्यातला अभिनेता काही शांत बसेना म्हणून त्यांच्या कलागुणांना तिथल्या प्रमुखांनी ओळखलं. नंतर बाबूरावांनी आपल्या पहिल्या वहिल्या “अयोध्येचा राजा” या चित्रपटा मधून अभिनय क्षेत्रात दमदार एन्ट्री घेतली. त्याचा अभिनय लोकांना आवडला आणि म्हणून आपली पॅशन ओळखूनच ते पुढे कधी थांबलेच नाही. आयोध्येचा राजा या चित्रपटानंतर त्यांनी आकाशवाणी, सुखाचा शोध, अग्निकंकण, विलासी ईश्वर, छाया, सिंहगड, धर्मवीर, अशा अनेक चित्रपटांतून आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट क्षेत्र गाजवलं. त्यांनी अनेकदा चित्रपटांमध्ये खलनायक म्हणूनही काम केलंय.

एवढ्या चित्रपटातून आपला ठसा उमटवल्यानंतर “ज्ञान देवता” या चित्रपटमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. आणि ते पाहिल्यांदाच नायकाच्या भुमिके दिसले. त्यांनी “सैरंधी” या चित्रपटासाठी दिग्दर्शन आणि लेखनही केलं. प्रभात कंपनीत तीन चार वर्षे व्यवस्थापनाबरोबरच अभिनयाचे धडे घेऊन त्यांनी नंतर 1933 मध्ये कोल्हापूर मध्येच ‘सिनेटोन’ या कंपनीत पुन्हा व्यवस्थापनाचं कार्य हातात घेतलं. इथे ही त्यांनी नेटाने आणि पूर्ण श्रद्धेने आपलं काम केलं. अभिनय क्षेत्रातला एवढा अनुभव आल्यानंतर त्यांनी स्वतःची ‘हंस पिक्चर्स’ ही चित्रपट कंपनी सुरू केली. तेव्हा त्याच्या डोक्यात केवळ मराठी चित्रपट सृष्टीला भरभरून आशय प्रधान चित्रपट देण्याची उर्मी होती आणि त्यांनी त्याचा ध्यास घेतला होता.

एका नावाजलेल्या कंपनीचा मालक असतानाही त्यांनी अभिनयाकडे पाठ फिरवली नाही. त्यांनी ही कंपनी सुरू केल्यानंतर धर्मवीर, ब्रम्हचारी, देवता, छाया, अमृत, पहिला पाळणा, ज्वाला अशा अनेक चित्रपटांची उत्कृष्ट निर्मिती केली. या चित्रपटाचं स्वतः दिग्दर्शन केलंच पण नंतर दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी त्यांचे भाऊ मा. विनायक राव यांच्या हाती सोपवली. चित्रपटांची नावे आणि चित्रपटांचा एकूणच आशय हा तेव्हाच्या काळाशी अगदी मिळता जुळता असायचा. म्हणूनच एक प्रेक्षक म्हणून पाहतानाही चित्रपटातल्या प्रत्येक घटनेशी प्रेक्षक समरूप होत होते. त्यांना ते चित्रपट आपले वाटत होते. हेच त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या यशाचं गमक ठरलं.

त्यांनी आपल्या एकूण 45 वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीत पन्नासपेक्षा जास्त चित्रपटांच दिग्दर्शन केलं. म्हणजे आपल्या कार्यकाळापेक्षा चित्रपटांची संख्या जास्त हे एका वेड्या कलाकारांलाच जमू शकतं. कारण आपल्या वेडात वेडं झाल्या शिवाय असे चमत्कार घडत नाहीत. पेंढारकरांनंतर त्यांच्या स्मृतीला आपल्या प्रत्येकाच्या मनात तेवत ठेवण्यासाठी त्यांचे सुपुत्र श्रीकांत पेंढारकर यांनी त्यांच्या जीवनावर आधारित “बाबूराव नावाचे झुंबर” हा चरित्र ग्रंथ संपादित केला. या चरित्र ग्रंथाला मुंबई मधल्या ‘मोरया’ या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलं. बाबुराव पेंढारकर या कलाकाराने मराठी चित्रपट सृष्टीला दिलेल्या चित्रपटाचं देणं हे अमूल्य आहे. आणि कितीही काळ लोटला तरीही त्यांची कामगिरी ही प्रत्येक पिढीपुढे एका वेड्या कलावंताच्या वेड्या ध्येयाचं उदाहरण म्हणूनच उभी राहील. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या 54 स्मृती दिनानिम्मित विनम्र अभिवादन…

Note: जर तुमच्याकडे Biography of Baburao Pendharkar in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Baburao Pendharkar information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button