शेअर्सच्या किंमती वाढण्यामागे किंवा कमी होण्यामागे कोण कोणती कारणे असतात? | What are the reasons behind the rise or fall of share price?

शेअरच्या किमती या सप्लाय आणि डिमांड यानुसार कमी जास्त होत असतात. सप्लाय म्हणजे पुरवठा आणि डिमांड म्हणजे मागणी.

शेअर्सच्या किंमती वाढण्यामागे किंवा कमी होण्यामागे कोण कोणती कारणे असतात? |What are the reasons behind the rise or fall of share price?

जर उदाहरण द्यायचे झाले तर आपण सोन्याची उदाहरण घेऊ. दसरा दिवाळी सारख्या सणांना किंवा लग्नसराईमध्ये सोन्याचे भाव वाढतात कारण या दिवसांमध्ये सोन्याला मागणी जास्त असते तसेच शेअर मार्केटमध्ये जास्त प्रमाणात पडझड झाली तरी सोन्याचे भाव वाढतात कारण लोक गुंतवणुकीसाठी इतर पर्याय शोधू लागतात आणि सोन्यामधील गुंतवणूक हा पारंपारिक गुंतवणुकीचा प्रकार असल्याने सोन्याची मागणी वाढते म्हणून मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती उत्पन्न होते म्हणून सोन्याचे भाव वाढतात.

तसेच ज्या वेळी लोकांना गुंतवणुकीचे इतर पर्याय उपलब्ध असतात किंवा स्टॉक मार्केटमध्ये तेजी असते किंवा कोणताही सण किंवा लग्नसराई नसते तेव्हा सोन्याचे भाव कमी होतात कारण मागणी कमी होते.

स्टॉकचे सुद्धा असेच आहे. जर एखादी कंपनी चांगला नफा कमवत असेल तर त्या कंपनीच्या शेअर्स ला मागणी वाढते म्हणजेच विकणारे कमी आणि घेणारे जास्त अशी स्थिती उत्पन्न होते म्हणून घेणारे मिळेल त्या भावात तो स्टॉक खरेदी करतात आणि म्हणून त्या स्टॉक ची किंमत वाढू लागते.याउलट कंपनी जर तोट्यात गेली तर विकणाऱ्यांची संख्या वाढते आणि खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी होते म्हणून स्टॉक ची किंमत कमी होऊ लागते.

Note- मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात. या विषयावर आणखी पोस्ट येणार आहेत त्या नक्की वाचा. आणि हो आपल्या Dnyan_shala आणि Shares_dnyan या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.

Leave a Comment

error: ओ शेठ