दरवर्षी 5 जूनला ‘जागतिक पर्यावरण दिन’ (World environment day) म्हणून साजरा केला जातो.सध्याच्या घडीला पर्यावरणाला वाचवले खूप गरजेचा आहे.
लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. पर्यावरण आणि मनुष्य यांचे एक अतूट नाते आहे. निसर्ग शिवाय आपलं जीवन जगणं शक्य नाही. दरवेळेस मनुष्य हा पर्यावरण आलाच हानी पोहोचवत असतो.
कारण नेहमीच आपण वृक्षतोड,समुद्र आणि नद्यांचे पाणी दूषित करतो. म्हणूनच पर्यावरणाबद्दल जागृतता करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राने 1972 पासून 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून घोषित केला आहे. तेव्हापासून दरवर्षी पाच जूनला हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक पर्यावरण दिन मराठी माहिती | World environment day information in marathi
दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी वेगवेगळ्या थीम ठरवल्या जातात. पण ह्या वेळेस कोरोनाव्हायरस मुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे.
लॉकडाऊन मुळे कारखाने वाहनांची वाहतूक या सगळ्या गोष्टी बंद असल्यामुळे प्रदूषण आपोआपच कमी झालेला आहे. त्यामुळे पर्यावरणाबाबत लोकांच्या मनातील चिंताही थोड्या प्रमाणात का होईना कमी झालेली आहे. त्यामुळे यंदाच्या पर्यावरण दिवस मागील वर्षापेक्षा जरा वेगळाच आहे. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार 2020 ची थीम ही
वेळ आणि निसर्ग अशी आहे.
या वर्षी आपण पण एक वेगळा संकल्प आपण करूया
1.ह्या वर्षी आपण एक संकल्प करूया कि, आपण एक झाड नक्की लावायचं.
2.कारण पर्यावरणाला याची गरज आहे आणि त्यात आपण मदत करू या.
3.पॉलिथिन चा वापर शक्यतो नाही केला पाहिजे पण, आपण पण हळूहळू त्याचा वापर कमी करूया.
विजेचा कमीत कमी वापर आपण करूया.
4.घरातील कोणतीही वस्तू फेकण्याच्या पहिले तिचा कोणत्या प्रकारे वापर करता येईल याचा आपण विचार करूया आणि दुसऱ्यांना मदत करूया.
5.आता कोरोनाव्हायरस मुळे आपण सोशल डिस्टन्स राहून सगळे काम केले पाहिजे. रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी थुकणार नाही याबाबतची काळजी आपणच घ्यायला हवी.
6.नवीन पिढीला पर्यावरण बद्दल माहिती दिली पाहिजे.
Note – जर तुम्हाला World environment day information in marathi हि माहिती आवडली असेल तर तुम्ही Facebook, instagram, helo आणि twitter वर शेअर करा