जागतिक कला दिवस का साजरा केला जातो ? – World Art Day

दर वर्षी 15 एप्रिल हा दिवस ‘जागतिक कला दिन’ (world art day) म्हणून साजरा. कलेला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मानले जाते की या जगात असे बरेच लोक आहेत ज्यांना कलेमध्ये खूप रस आहे आणि त्यांना त्यांच्या कलेबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे.

या खास दिवशी सगळे कलाकार एकमेकांना कलेविषयी जागरूकही करतात. कला दिन साजरा करण्याचा मुख्य हेतू म्हणजे लोकांना कलेकडे प्रोत्साहन करणे. इतकेच नाही तर सर्वत्र प्रदर्शन व सेमिनार आयोजित करतात. यामुळे आपल्याला कलाकारांची कला देखील पाहायला मिळते.

जागतिक कला दिवसाचा इतिहास – world art day history

हा दिवस पहिल्यांदा 2012 मध्ये साजरा केला गेला. याच कारण असं की, यादिवशी लिओनार्दो दा विंची यांची जयंती असते. 2017 मध्ये इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ आर्ट आपला पहिला अमेरिकन अध्याय तयार केला.आणि यामुळेच इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ आर्ट प्रत्येक देशातील कलाकारांना हा दिवस साजरा करण्याचं आवाहन केलं. यामुळेच हा दिवस कला दिवस म्हणून साजरा केला जातो.

दरवर्षी हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा केला जातो. हे कलाकार लोक वेगळ्या ठिकाणी प्रदर्शन भरवतात. जेणेकरून आपल्या सारखे लोकं त्या कलेला पाहू शकू. कलाप्रेमी हा दिवस उत्साह म्हणून साजरा करतात. यानिमित्त युनेस्कोने लोकांना कार्यशाळा, कार्यक्रम आणि प्रदर्शनात सहभागी होण्याचे आव्हान करत असतात. हा दिवस जगभरात साजरा करण्यासाठी कलाप्रेमी उत्साहात सहभागी होतात.

या दिवशी फक्त कलाप्रेमीचं नाही तर दुसरे लोक सुद्धा एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात. प्रत्येक कलाक्षेत्रातील लोकांच्या आवडीचा देखील विचार केला जातो. त्याचबरोबर कलेशी संबंधित विविध विषयावरही चर्चा केली जाते. अनेक ठिकाणी स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. कलेकडे लोकांचा प्रोत्साहन वाढण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित सुद्धा केलं जातं.अशा प्रकारे हा दिवस ‘जागतिक कला दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

Note – जर तुम्हाला World Art Day information in marathi हि माहिती आवडली असेल तर तुम्ही Facebook, instagram आणि twitter वर शेअर करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button