भारतातील कोणत्या गावाला ‘ग्रीन व्हिलेज’ म्हणून ओळखले जाते? जाणून घ्या संपूर्ण माहिती |Which is India’s first green village?

मित्रांनो आपल्या भारत देशाला विविधतेचा देश म्हटले जाते. यासोबतच भारत विविध गावांसाठी प्रसिद्ध आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे, जिथे तुम्हाला प्रत्येक गावात प्रामुख्याने शेती आढळेल. या शेतीतून जिथे लोकांचा उदरनिर्वाह चालतो. तर दुसरीकडे देशाच्या आर्थिक विकासाच्या चाकालाही गती मिळते.

भारतातील विविध गावांबद्दल तुम्ही वाचले किवा ऐकले असेल.पण तुम्हाला माहिती आहे का की भारतात असे एक गाव आहे ज्याला ‘ग्रीन व्हिलेज’ असेही म्हणतात. भारतातील हे गाव हिरवीगार शेतं आणि सौंदर्यासाठी भारतभर प्रसिद्ध आहे. त्यामुळेच या गावाला भेट देण्यासाठी देशाच्या विविध भागातून लोक येथे येतात. चला तर जाणून घेऊया या गावाबद्दल.

भारतातील कोणत्या गावाला ‘ग्रीन व्हिलेज’ म्हणून ओळखले जाते? जाणून घ्या संपूर्ण माहिती |Which is India’s first green village?

भारतातील कोणत्या गावाला ‘ग्रीन व्हिलेज’ म्हणतात?

भारतात वेगवेगळ्या गावांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. पण या सर्व गावांमध्ये एक असे गाव आहे ज्याची स्वतःची वेगळी ओळख आहे. भारताच्या उत्तर-पूर्व राज्यांमध्ये समाविष्ट असलेल्या नागालँडमधील भारत-म्यानमार सीमेवरील खोनोमा (Khonoma) गावाला ग्रीन व्हिलेज या नावाने ओळखले जाते.

या गावाला ‘ग्रीन व्हिलेज’ का म्हणतात?

मित्रांनो भारतात अनेक हिरवी गार गावे आहेत. पण याचं गावाला ‘ग्रीन व्हिलेज’ का म्हटले जाते असा प्रश्न आता उपस्थित होतो. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, पूर्वी हे गाव शिकारीसाठी ओळखले जात होते जिथे वन्य प्राण्यांची शिकार केली जायची. पण नंतर 1998 मध्ये सरकारने येथे खोनोमा निसर्ग संवर्धन आणि ट्रगोपन अभयारण्य तयार केले . त्यानंतर येथे शिकार करण्यास बंदी घालण्यात आली आणि व हिरवाईला प्रोत्साहन देण्यात आले. यामुळे इथल्या लोकांच्या राहणीमानातही बदल झाला. सध्या सुमारे 500 घरे आहेत ज्यात सुमारे 2 हजार लोक राहतात.

हे सुद्धा वाचा: भारतातील कोणत्या गावाला ‘सापांचे गाव’ म्हणतात? या गावात प्रत्येक घरात साप राहतात

या ठिकाणचं खोनोमा युद्ध प्रसिद्ध आहे

या गावाच्या खोनोमा युद्धाचीही इतिहासाच्या पानात नोंद आहे. खरे तर इंग्रज अधिकार्‍यांनी आपल्या लोकांना मजूर म्हणून काम करायला लावायचे. पण येथे राहणाऱ्या लोकांना हे आवडत नव्हते. अशा स्थितीत येथील एका नेत्याने काही ब्रिटिश सैनिकांना गावात आणून त्यांच्यावर कर लादला. यानंतर सैन्य आणि स्थानिक लोकांमध्ये संघर्ष खूप झाला. ज्यामध्ये स्थानिक नेते आणि काही ब्रिटिश लोकही मारले गेले. यानंतर इंग्रजांनी हे गाव ताब्यात घेतले.पण नंतर येथे शांतता करारही करण्यात आला.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button