‘ही’ आहेत भारतातील टॉप सिव्हिल इंजिनियरिंग कॉलेज? या कॉलेजमधून शिक्षण घेतल्यास मिळेल लाखोंचे पॅकेज |Which college has highest package for Civil Engineering in India?

मित्रांनो तुम्हाला पण बिल्डिंग डिझाईन, रस्ते, धरणे आणि पूल यासारख्या प्रचंड पायाभूत सुविधा बनवायला आवडत असतील, तर तुम्ही या क्षेत्रात सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून काम करु शकता. तुम्हाला 12वीत सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक करून या क्षेत्रात करिअर करता येते. आज आपण या पोस्टमध्ये भारतातील टॉप 5 अभियांत्रिकी/आर्किटेक्चर कॉलेज (Top civil engineering colleges in india) बद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो ही यादी NIRF रँकिंग 2023 नुसार आहे.

ही आहेत भारतातील टॉप सिव्हिल इंजिनियरिंग कॉलेज? या कॉलेजमधून शिक्षण घेतल्यास मिळेल लाखोंचे पॅकेज |Which college has highest package for Civil Engineering in India?

आयआयटी रुरकी (Indian Institute Of Technology Roorkee)

मित्रांनो IIT रुरकी हे देशातील सर्वात जुने अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपूर्वी 1847 मध्ये या कॉलेजची स्थापना झाली. NIRF रँकिंग 2023 मधील सिव्हिल इंजिनीअरिंग कॉलेजच्या यादीत IIT रुरकी नंबर-1 कॉलेज आहे. अहवालानुसार आयआयटी रुरकीमध्ये यावर्षी सर्वाधिक वेतन पॅकेज 27.94 रुपये प्रतिवर्ष होते.

एनआयटी कालिकत (National Institute of Technology, Calicut)

केरळमध्ये स्थित NIT कालिकत हे देशातील सर्वोत्कृष्ट टॉप अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. NIRF रँकिंग 2023 मध्ये या कॉलेजला दुसरा क्रमांक मिळवला आहे. अहवालानुसार, एनआयटी कालिकतच्या सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये यावेळीच सर्वाधिक पॅकेज हे 11.4 लाख रुपये प्रतिवर्ष आहे.

IIT खरगपूर (Indian Institute of Technology, Kharagpur)

पश्चिम बंगालमध्ये स्थित IIT खरगपूर हे सिव्हिल इंजिनीअरिंगचे प्रसिद्ध महाविद्यालय आहे. मित्रांनो इंजीनियरिंग मधला प्रत्येक विद्यार्थ्याला या कॉलेज बद्दल माहित आहे. NIRF रँकिंग 2023 मध्ये, IIT खरगपूरने 76.82 गुणांसह तिसरा क्रमांकाच कॉलेज आहे.

एनआयटी तिरुचिरापल्ली (National Institute of Technology Tiruchirappalli)

तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे स्थित NIT तिरुचिरापल्ली हे देशातील टॉप 5 सिव्हिल इंजीनियरिंग महाविद्यालयांमध्येही येते. NIRF रँकिंग 2023 मध्ये, NIT तिरुचिरापल्ली हे कॉलेज 65.42 गुणांसह चौथा क्रमांकावर येते.

हे सुध्दा वाचा:- एथिकल हॅकर बनण्यासाठी हा कोर्स करा, मिळेल महिन्याला लाखो रुपयांचा पगार

स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर नवी दिल्ली ( School of Planning and Architecture)

हे देशातील सर्वोत्कृष्ट सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेजपैकी एक आहे. NIRF रँकिंग 2023 नुसार हे देशातील टॉप सिव्हिल अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या यादीत 5व्या क्रमांकावर आहे. या महाविद्यालयाचा 65.14 गुणांसह पाचवा क्रमांक लागतो

Telegram Grouplink
WhatsApp Channellink
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button