एथिकल हॅकर बनण्यासाठी हा कोर्स करा, मिळेल महिन्याला लाखो रुपयांचा पगार |Which course is best for ethical hacking after 12th?

मित्रांनो तुम्हाला पण कॉम्प्युटर जगाची आवड असेल आणि काहीतरी वेगळं करायचं असेल तर एथिकल हॅकिंग हा उत्तम पर्याय असू शकतो. वाढत्या डिजिटलायझेशनमध्ये सायबर हल्ले आणि सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. अशा परिस्थितीत एथिकल हॅकरची मागणीही सातत्याने वाढत आहे. एथिकल हॅकर म्हणून एखादी व्यक्ती चांगली कमाई करू शकते. आज आपण इथिकल हॅकर (Ethical Hacking Course) बनण्यासाठी काही कोर्सेसची माहिती घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते कोर्सेस.

एथिकल हॅकर बनण्यासाठी हा कोर्स करा, मिळेल महिन्याला लाखो रुपयांचा पगार |Which course is best for ethical hacking after 12th?

सायबर सिक्युरिटीमध्ये ई-मास्टर्स

आयआयटी कानपूर आणि आयआयटी बेंगलोरसह देशातील अनेक आयटी महाविद्यालये सायबर सुरक्षा अभ्यासक्रम देतात. आयआयटी कानपूर प्रमाणे सायबर सिक्युरिटीमध्ये ई-मास्टर्स ऑफर करते. ज्यामध्ये प्रवेशासाठी गेट परीक्षा आवश्यक नाही. त्याचप्रमाणे आयआयटी बंगलोर सायबर सिक्युरिटीमध्ये प्रगत अभ्यासक्रम ( Advance course) उपलब्ध करून देते.

एथिकल हॅकिंग आणि माहिती सुरक्षा

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT) एथिकल हॅकिंगचे कोर्सेस देते. जे हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. इथिकल हॅकिंगचे कौशल्य आणि ज्ञान या कोर्सद्वारे मिळवता येते.

पायथन आणि एथिकल हॅकिंग

अनअकॅडमी आणि कोर्सेरा सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एथिकल हॅकिंगचे अनेक चांगले कोर्स उपलब्ध आहेत. ज्यामध्ये पायथन प्रोग्रामिंगसह एथिकल हॅकिंगचे स्पष्टीकरण दिले आहे.

डिप्लोमा इन एथिकल हॅकिंग आणि आयटी सिक्युरिटी: दिल्ली विद्यापीठासारख्या अनेक संस्थांमध्ये इथिकल हॅकिंगमधील डिप्लोमा कोर्सेस ऑफर केले जातात. ज्यांची फी 15-20 हजार रुपये आहे. येथे प्रवेश घेऊन इथिकल हॅकिंगचे प्रशिक्षण घेता येते.

बी.टेक कॉम्प्युटर सायन्स

जर तुम्हाला हॅकिंगमध्ये मास्टर व्हायचे असेल तर तुम्ही कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक कोर्सही करू शकता. तुम्हाला B.Tech प्रवेशाची प्रक्रिया आधीच माहित आहे. तुम्हाला JEE परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. पण यानंतर तुम्हाला एथिकल हॅकिंगबद्दलच नव्हे तर संगणक विज्ञानाबद्दलही भरपूर ज्ञान मिळेल.

हे सुध्दा वाचा:- कॉमर्स कोर्स करायचा आहे मग ‘या’ कॉलेज मधून करा, तुम्हाला मिळेल 35 लाखांपर्यंतचे पॅकेज

एथिकल हॅकर झाल्यानंतर पगार किती मिळतो?

Glassdoor नुसार, भारतातील एथिकल हॅकरची कमाई दर महिन्याला 25 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत असते. पण ते पूर्णपणे कौशल्य आणि ज्ञानावर अवलंबून असते.

Telegram Grouplink
WhatsApp Channellink

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button