मित्रांनो, तुम्हाला नवीन कंपनी उघडायची आहे का? जर होय, तर यासाठी तुम्हाला तुमचं उत्पादन आणि त्याचं नाव ट्रेडमार्क करावं लागेल. ट्रेडमार्क नोंदणी करण्यापूर्वी तुम्हाला ट्रेडमार्कचा अर्थ काय आहे हे माहित असलं पाहिजे. एखाद्या वस्तूची बाजारामधील किंमत ठरविण्यासाठी ‘ब्रॅन्ड’ कशी मदत करतो, आणि या ब्रॅन्डचे संरक्षण करणारी ट्रेडमार्क ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ट्रेडमार्कची निवडताना काय काळजी घ्यायला हवी किंवा तो कसा निवडावा हा सामान्य नवउद्योजकाला पडणारा एक नेहमीचा प्रश्न आहे. कोणकोणत्या गोष्टींसाठी ट्रेडमार्क मिळू शकतो याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊया..
ट्रेडमार्क म्हणजे काय? | What is Trademark in marathi
मुळात ट्रेडमार्क हा “ब्रँड” किंवा “लोगो” असतो. कोणताही शब्द, नाव, चिन्ह किंवा उपकरण हे ट्रेडमार्क असू शकतं, ज्याचा वापर व्यवसाय ओळखण्यासाठी आणि इतरांपेक्षा वेगळा बनविण्यासाठी केला जातो. थोडक्यात, ट्रेडमार्क म्हणजे ब्रँड नेम. आजकाल अशा अनेक बनावट कंपन्या आहेत ज्या बनावट वस्तु विकतात आणि बरेच लोक ही बनावट वस्तु देखील खरेदी करतात कारण त्यांना खऱ्या आणि नकली वस्तु यात फरक करता येत नाही. या बनावट कंपन्यांच्या बनावट उत्पादनांना बळी पडू नये म्हणून ट्रेडमार्क कायदा लागू करण्यात आला आहे. एका उदाहरणामधून हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करुयात.
तीन वर्षांपूर्वी गुगल कंपनीने त्यांच्या बहुचर्चित गुगल ग्लासचा ट्रेडमार्क फक्त ‘ग्लास’ या नावाने नोंदणीकृत करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये ‘ग्लास’ हा शब्द मोठय़ा अक्षरामध्ये लिहिलेला होता; परंतु हा ट्रेडमार्क मंजूर केला गेला असता तर दुसऱ्या कुठल्याही काचेच्या वस्तू उदा. चष्मे बनविणाऱ्या कंपनीला त्याच्या वस्तुची जाहिरात करताना ग्लास हा शब्द वापरता आला नसता. म्हणूनच या कारणामुळे हा ट्रेडमार्क गुगल कंपनीला नाकारला गेला. थोडक्यात काय, तर ट्रेडमार्क हा कधीही कोणत्याही वस्तूची माहिती सांगणारा किंवा वर्णन करणारा नसायला हवा. ट्रेडमार्क हा नेहमी वैशिष्टय दर्शवणारा शब्द असला पाहिजे.
इतर कोणतीही कंपनी आपली वस्तु किंवा उत्पादन विकण्यासाठी ब्रँड आणि आपलं नाव वापरू शकत नाही. कोणत्याही कंपनीला त्याच्या नावाचा ट्रेडमार्क मिळाला की, दुसरी कोणतीही कंपनी त्या कंपनीचे नाव व्यावसायिक नफा मिळवण्यासाठी वापरू शकत नाही. उदाहरणार्थ, Apple, Nike, Mercedes-benz, Dell, Honda इत्यादी कंपन्यांना त्यांचे नाव ट्रेडमार्क मिळाले आहे. इतर कोणत्याही कंपनीला त्याच्या व्यावसायिक फायद्यासाठी वापर करता येणार नाही.
ट्रेडमार्क हे कंपनीच्या वस्तुसाठी बनवलेलं चिन्ह आहे, जे त्या कंपनीद्वारे नोंदणीकृत केलं जातं. ट्रेडमार्कचा वापर केला जातो जेणेकरून आपल्याला कळेल, की कोणत्या कंपनीचे उत्पादन किंवा वस्तु कोणी बनवली आहे. प्रत्येक कंपनीचा स्वतःचा वेगळा ब्रँड आणि लोगो असतो. ट्रेडमार्क हे असं चिन्ह आहे जे उत्पादनावर छापलं जातं. जेणेकरून त्या कंपनीचं उत्पादन किंवा वस्तु बाजारात सहज ओळखता येईल.
ट्रेडमार्क हे कंपनीच्या वस्तुसाठी बनवलेलं चिन्ह आहे, जे त्या कंपनीद्वारे नोंदणीकृत केलं जातं. ट्रेडमार्कचा वापर केला जातो जेणेकरून आपल्याला कळेल, की कोणत्या कंपनीचे उत्पादन किंवा वस्तु कोणी बनवली आहे. प्रत्येक कंपनीचा स्वतःचा वेगळा ब्रँड आणि लोगो असतो. ट्रेडमार्क हे असं चिन्ह आहे जे उत्पादनावर छापलं जातं. जेणेकरून त्या कंपनीचं उत्पादन किंवा वस्तु बाजारात सहज ओळखता येईल.
ट्रेडमार्क नोंदणी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे करता येते. ऑनलाइन ट्रेडमार्क नोंदणी करण्यासाठी तुम्ही भारत सरकारच्या पेटंट डिझाइन आणि ट्रेडमार्कचे नियंत्रण जनरलच्या, ipindiaonline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन, नोंदणी करू शकता. भारतातील ट्रेडमार्क नोंदणीच्या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे दीड ते दोन वर्षे लागू शकतात.
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.