अशी झाली जगन्नाथ मंदिराची स्थापना | Shri Jagannath temple information in marathi

जगन्नाथ मंदिर हे भारतातील प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर अतिशय पवित्र मानले जाते. शिवाय हिंदू धर्माच्या चार धामांपैकी हे एक धाम आहे. भगवान विष्णूची मनोभावे येथे पूजा केली जाते. परंतू तुम्हाला हे माहिती आहे का, की जगन्नाथ मंदिर हे त्याच्या भव्यतेसोबतच त्याच्या रहस्यमय कथेसाठी सुध्दा प्रसिद्ध आहे. या मंदिराची स्थापना कशी झाली, कोणी केली हे तुम्हाला माहिती आहे का? तर आज या लेखात आपण याच गोष्टीची माहिती घेणार आहोत.

अशी झाली जगन्नाथ मंदिराची स्थापना | Shri Jagannath temple information in marathi


राजा इंद्रद्युम्न हा माळव्याचा राजा होता, त्याच्या वडिलांचे नाव भरत आणि आईचे नाव सुमती होते. इंद्रद्युम्न राजाला स्वप्नात जगन्नाथाचे दर्शन झाले व त्यानंतर राजाने अनेक मोठे यज्ञ केले आणि तलाव बांधला. एका रात्री भगवान विष्णूंनी त्यांना स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले, की निलांचल पर्वतातील एका गुहेत माझी एक मूर्ती आहे, तिचे नाव नीलमाधव आहे. तुम्ही मंदिर बांधा आणि त्यात माझी ही मूर्ती बसवा. राजाने आपल्या नोकरांना नीलांचल पर्वताच्या शोधात पाठवले. त्यापैकी एक ब्राह्मण विद्यापती होता. विद्यापतीने ऐकले होते, की सबर कुळातील लोक नीलमाधवची पूजा करतात आणि त्यांनी ही मूर्ती निलांचल पर्वताच्या गुहेत लपवून ठेवली होती. सबर कुळाचा प्रमुख हा नीलमाधवाचा उपासक आहे आणि त्याने ही मूर्ती गुहेत लपवून ठेवली होती हेही त्याला माहीत होते. हुशार विद्यापतीने सरदाराच्या मुलीशी लग्न केले व शेवटी पत्नीच्या माध्यमातून तो नीलमाधवच्या गुहेत पोहोचू शकला. अत्यंत शिताफीने त्याने मूर्ती चोरून राजाकडे आणली.

आपल्या प्रिय देवतेची मूर्ती चोरीला गेल्याने विश्ववसुला खूप दुःख झाले. आपल्या भक्ताच्या दुःखाने भगवानही दुःखी झाले. भगवान गुहेत परतले, परंतु त्याच वेळी राज इंद्रद्युम्नाला वचन दिले, की तो एक दिवस त्याच्याकडे परत येईल, जर तो त्याच्यासाठी एक मोठे मंदिर बांधेल. राजाने मंदिर बांधले आणि भगवान विष्णूंना मंदिरात बसण्यास सांगितले. देव म्हणाले, की माझी मूर्ती बनवण्यासाठी समुद्रात तरंगणाऱ्या झाडाचा एक मोठा तुकडा आण. जो समुद्रात पोहत द्वारकेहून पुरीला येत आहे. राजाच्या सेवकांना त्या झाडाचा तुकडा सापडला, पण सर्व लोक मिळून ते झाड उचलू शकले नाहीत. तेव्हा राजाला समजले, की नीलमाधवचा अनन्य भक्त, सबर कुळाचा प्रमुख विश्ववसुची मदत घ्यावी लागेल. म्हणून त्याने त्याची मदत घेतली आणि विश्ववसूने अगदी सहजरित्या जड लाकूड उचलून मंदिरात आणले. हे पाहून तिथे जमलेले सगळेच आश्चर्यचकित झाले.

आता देवाची मूर्ती लाकडापासून बनवण्याची पाळी होती. राजाच्या कारागिरांनी खूप प्रयत्न केले पण कोणीही लाकडात छिन्नी टाकू शकले नाही. तेव्हा तिन्ही लोकांचे कुशल कारागीर भगवान विश्वकर्मा वृद्धाच्या वेशात आले. त्याने राजाला सांगितले, की आपण नीलमाधवची मूर्ती बनवू शकतो. परंतू 21 दिवसात मी ही मूर्ती एकटाच बनवणार अशी अटही त्यांनी घातली तसेच त्यांना मूर्ती बनवताना कोणीही पाहणार नाही. या सर्व अटी मान्य करण्यात आल्या व मूर्ती बनवण्याच्या कामाला सुरूवात झाली. लोकांना करवतीचे, छिन्नीचे, हातोड्याचे आवाज ऐकू येत होते. परंतू थोड्या दिवसांनी हे सगळे आवाज बंद झाले. त्यामुळे राजा इंद्रद्युम्नची राणी गुंडीचा स्वतःला रोखू शकली नाही. ती दाराजवळ गेली. तिथे गेल्यावर तिला कोणताच आवाज आला नाही. ती घाबरली. तिला वाटले म्हातारा कारागीर मेला. तिने राजाला याची माहिती दिली. आतून आवाज येत नव्हता त्यामुळे राजालाही तसेच वाटले. सर्व परिस्थिती आणि इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून राजाने खोलीचा दरवाजा उघडण्याचा आदेश दिला.

खोली उघडली असता म्हातारा बेपत्ता होता आणि त्यामध्ये 3 अपूर्ण मूर्ती पडलेल्या आढळल्या. त्यामध्ये भगवान नीलमाधव आणि त्यांच्या भावाचे हात लहान होते, परंतु त्यांचे पाय नव्हते, तर सुभद्राचे हात आणि पाय अजिबात बनलेले नव्हते. देवाची इच्छा मानून राजाने या अपूर्ण मूर्तीची स्थापना केली. तेव्हापासून आजतागायत तिन्ही भावंडे या रूपात अस्तित्वात आहेत आणि अशाप्रकारे जगन्नाथ मंदिर स्थापन झाले.

सध्याचे मंदिर हे जरी सातव्या शतकात बांधले गेले असले तरी हे मंदिर इ.स.पू. 2 मध्येच बांधले गेले होते. तसेच येथे असलेल्या मंदिराची 3 वेळा मोडतोड झाली आहे व 1174 मध्ये ओरिसाचा शासक अनंगा भीमदेव याने त्याचे नूतनीकरण केले. जगन्नाथ मंदिर स्थापनेबद्दलचा इतिहास सांगितला जातो.

Note – जर तुम्हाला Shri Jagannath temple information in marathi हि माहिती आवडली असेल तर तुम्ही Facebook, instagram आणि sharechat वर शेअर करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button