हैदराबादमध्येच का IPS अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण केले जाते? जाणून घ्या काय कारण आहे |What is there in IPS training?

मित्रांनो सर्व टप्पे पार केल्यानंतर, उमेदवारांना अत्यंत कठीण प्रशिक्षणातून जावे लागते. UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांपुढील आव्हाने कमी होत नाहीत. यानंतर त्यांना नवीन टप्पा पार करावा लागेल. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत CSE परीक्षा घेतली जाते. त्यानंतर ते आयपीएस, आयएएस आणि आयएफएस होऊ शकतात. आज या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की देशात आयपीएस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण (IPS training) कुठे होते आणि ते किती दिवस चालते. चला तर जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती.

हैदराबादमध्येच का IPS अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण केले जाते? जाणून घ्या काय कारण आहे |What is there in IPS training?

फाऊंडेशन कोर्स एलबीएसएनएए, मसूरी येथे आयोजित केला जातो

UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, IPS प्रशिक्षणाचा प्रारंभिक टप्पा फक्त IAS अधिकार्‍यांसह केला जातो. त्यांना LBSNAA, मसूरी येथे फाउंडेशन कोर्स देखील करावा लागतो आणि त्याचा कालावधी हा 3 महिने आहे. यानंतर, येथून आयएएस आणि आयपीएस इच्छुकांचे मार्ग हे वेग वेगळे होतात.

हे सुध्दा वाचा:- ‘ही’ आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगची टॉप 5 महाविद्यालये

पुढील प्रशिक्षण हे SVPNPA मध्ये होते

आता या उमेदवारांना पुढील प्रशिक्षणासाठी सरदार वल्लभभाई पटेल (SVPNPA) राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद गाठावे लागते. त्यानंतर त्यांना 11 महिने प्रशिक्षण दिले जाते. अकरा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना जिल्हा प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी जावे लागते, जे 6 महिन्यांचे असते. यानंतर हे उमेदवार पुन्हा SVPNPA, हैदराबाद येथे परततात. जिथे ते पुन्हा प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यातून जातात. यानंतर त्यांना कुठेतरी अंतिम पोस्टिंग दिली जाते. वेगवेगळ्या टप्प्यात होणारे हे प्रशिक्षण उमेदवारांसाठी सोपे नसते.

Telegram Grouplink
WhatsApp Channellink
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button