तुम्हाला पण IIT मध्ये शिकायचं आहे? ते पण JEE exam न देता? मग ही माहित तुमच्यासाठी|IIT Kharagpur Introduces Online Short-Term Digital Marketing Course

मित्रांनो आयआयटीमध्ये प्रवेशाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. IIT खरगपूरच्या विनोद गुप्ता स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या नवीन उपक्रमामुळे विद्यार्थी JEE परीक्षेतील गुणांशिवायही IIT खरगपूरमधून अभ्यास करू शकतात. यासाठी त्यांना sites.google.com/view/mdpdmvgsom/home येथे ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

आजकाल डिजिटल मार्केटिंग क्षेत्र हे जोरात आहे. पश्चिम बंगालमध्ये असलेल्या IIT खरगपूरने डिजिटल मार्केटिंग – मार्केटिंग इन डिजिटल वर्ल्ड या विषयावर ऑनलाइन शॉर्ट टर्म कोर्स सुरू केला आहे. अर्ज करण्यासाठी जानेवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या ऑनलाइन कोर्समध्ये कोण प्रवेश घेऊ शकतो आणि अर्ज कसा करायचा ते जाणून घेऊया.

तुम्हाला पण IIT मध्ये शिकायचं आहे? ते पण JEE exam न देता? मग ही माहित तुमच्यासाठी |IIT Kharagpur Introduces Online Short-Term Digital Marketing Course

IIT खरगपूरमध्ये कोण प्रवेश घेऊ शकतो?

आयआयटी खरगपूरचा हा ऑनलाइन शॉर्ट टर्म कोर्स मध्यम स्तरावरील व्यवस्थापक, एमएसएमई आणि कोणत्याही व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप उद्योजकांसाठी तसेच डिजिटल मार्केटिंगमध्ये (Digital Marketing course) करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी तयार करण्यात आला आहे. कार्यरत व्यावसायिकही यामध्ये प्रवेश घेऊ शकतात.

ही बॅच कधी सुरु होणार आहे?

IIT खरगपूरने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार 15 जानेवारी ते 19 जानेवारी 2024 दरम्यान या अभ्यासक्रमाचे वर्ग घेण्यात येणार आहेत. उमेदवारांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश मिळेल. यामध्ये जास्तीत जास्त 50 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. इच्छुक अर्जदार 10 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

हे सुध्दा वाचा:- Exam च्या पहिले syllabus पूर्ण करायचा आहे? मग ‘या’ टीप्स तुमच्यासाठी

काय शिकाल आणि फी किती आहे?

या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना ईमेल, सोशल मीडिया मार्केटिंग, वेब, संलग्न, प्रायोजित आणि परफॉर्मन्स मार्केटिंग शिकवले जाईल. आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी वेगळे शुल्क भरावे लागणार नाही. पण, उद्योग आणि प्राध्यापकांना अनुक्रमे 11,800 आणि 8,850 रुपये शुल्क जमा करावे लागेल. इतर विद्यार्थ्यांसाठी फी 5,950 रुपये (IIT Kharagpur fees) निश्चित करण्यात आली आहे.

यासाठी अर्ज कसा करायचा?

  • IIT खरगपूरच्या ऑनलाइन शॉर्ट टर्म डिजिटल मार्केटिंग कोर्ससाठी, तुम्हाला sites.google.com/view/mdpdmvgsom वर अर्ज करावा लागेल.
  • होम पेजवर कोर्सची माहिती तपासल्यानंतर, Apply वर क्लिक करा.
  • तेथे विचारलेले सर्व माहिती भरा आणि फी पण भरा.
  • अर्ज पूर्णपणे तपासल्यानंतरच सबमिट करा.
Telegram Grouplink
WhatsApp Channellink
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button