मित्रांनो आजच्या काळात बँक खाते असणे अत्यंत गरजेचे आहे. हे कोणतेही आर्थिक व्यवहार सोपे करते. डिजिटल बँकिंगनंतर आर्थिक व्यवहार हे एका झटक्यात होतात. तुम्ही बचत खाते (saving account) आणि चालू खाते ( current account) उघडू शकता. प्रत्येक खात्याचे स्वतःचे फायदे आहेत. अशा परिस्थितीत, एक प्रश्न पडतो तो म्हणजे, आपण आपल्या बचत खात्यात किती पैसै ठेऊ शकतो. चला तर जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण माहिती.
Saving account मध्ये किती पैसे ठेवता येतात? आयकर नियम काय आहेत, जाणून घ्या संपूर्ण माहिती |What is the Cash Deposit Limit in Savings Account as Per Income Tax?
बचत खात्यात किती रोख ठेवावी
लोक आपली बचत ही saving account मध्ये ठेवतात. या खात्यात किती पैसे जमा करता येतील असा प्रश्न अनेकांना पडतो. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या खात्यात रोख ठेवण्यावर कोणतीही मर्यादा नाही. याचा अर्थ तुम्हाला हवे तेवढे पैसे ठेवता येतात. तुम्ही एका गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे, या खात्यात फक्त तेवढीच रोख रक्कम ठेवा जेवढी आयटीआरच्या कक्षेत येते. जर तुम्ही अकाउंट मध्ये जास्त पैसे ठेवल्यास त्यावर तुम्हाला कर (Tax) भरावे लागू शकते.
आयकर विभागाला कोणती माहिती द्यावी?
तुमच्या बचत खात्यात किती व्याज मिळते याची माहिती तुम्हाला आयकर विभागाला द्यावी लागेल. यासोबतच तुम्ही खात्यात किती पैसे ठेवता. तुमच्या बचत खात्यातील ठेवींवर मिळणारे व्याज तुमच्या उत्पन्नात जोडले जाते.
हे सुध्दा वाचा:- नविन घर घेण्याच्या तयारीत असाल तर या कागदपत्रांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, भविष्यात कोणताही त्रास होणार नाही
उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असेल आणि त्याला व्याज म्हणून 10,000 रुपये मिळत असतील, तर त्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न 10,10,000 रुपये मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रोकड ठेवली तर तुम्हाला ही माहिती आयकर विभागाला द्यावी लागेल. तुम्ही असे न केल्यास आयकर विभाग तुमच्यावर कारवाई करू शकतो.
Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.