जर तुम्ही UPI द्वारे पेमेंट करत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर काही खर नाही |What are the disadvantages of UPI?

मित्रांनो आजच्या काळात ऑनलाइन पेमेंट करणे खूप सोयीचे आहे. तुम्ही काही सेकंदात पेमेंट करता. तुम्ही UPI किंवा UPI आधारित ॲप्स (PayTm, PhonePay, BHIM) द्वारे पेमेंट करू शकता. ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर लोकांना कार्ड किंवा रोख घेऊन जाण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही ऑनलाइन पेमेंट करता तेव्हा तुम्ही खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. असे न केल्यास तुमची फसवणूक होऊ शकते. UPI पेमेंट करताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? आज आपण जाणून घेऊया.

जर तुम्ही UPI द्वारे पेमेंट करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर काही खर नाही |What are the disadvantages of UPI?

ऑनलाइन फसवणूक

मिञांनो इंटरनेट हे लोकांसाठी अधिक सुलभ झाल्यामुळे ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. ऑनलाइन फसवणुकीला बळी पडलेल्या लोकांची अकाऊंट पूर्णपणे रिकामी झाली आहेत. ज्याप्रमाणे ऑनलाइन फसवणूक वाढत आहे. त्याचप्रमाणे सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. ऑनलाइन फसवणुकीत जिथे लोकांची बँक खाती रिकामी केली जातात. तिथे त्यांची ओळखही चोरली जाते.

आता प्रश्न असा येतो की, ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही तुमचा UPI पिन कोणालाही देऊ नये. याशिवाय तुम्ही फक्त एक खाते UPI शी लिंक करावे. कारण तुम्ही जितकी जास्त खाती UPI ला लिंक कराल तितकी तुमची ऑनलाइन फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. बर्‍याच वेळा जर तुम्हाला तुमच्या फोनवर अज्ञात लिंक असलेले मेसेज आले तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक केले पाहिजे अस नाही. ही फिशिंग लिंक सुध्दा असू शकते. जर तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यास तुमची फसवणूक सुध्दा होऊ शकते.

हे सुध्दा वाचा:- SBI, ICICI आणि HDFC बँकेत आरडीवर किती व्याज दिले जाते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

स्मार्टफोन

ऑनलाइन पेमेंटसाठी स्मार्टफोन असणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आजच्या काळात जवळपास प्रत्येकाकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट सुविधा आहे. अशा परिस्थितीत, जर तुमचा फोन चोरीला गेला तर तुम्ही ताबडतोब तुमचा फोन आणि सिम लगेच ब्लॉक करा. जर तुम्ही असे केले नाही तर कोणीतरी तुमच्या फोनचा गैरवापर करू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही फोन नेहमी सुरक्षित ठेवावा. तर मित्रांनो ही खूप महत्त्वाची माहिती आहे तर नक्की शेअर करा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button