संयुक्त महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माहिती |Uddhav thackeray biography in marathi

मित्रांनो महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक कुठलं नाव चर्चेत असेल तर ते उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांचं आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे आत्ता ज्या परिस्थितीतून जात आहेत ती परिस्थिती. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षाचं चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण गोठवला आहे. उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिलं आहे. हे चिन्ह घेऊन आता उद्धव ठाकरे अंधेरीची पोटनिवडणूक जिंकतात का? तसंच यापुढे पक्ष आणखी वाढवतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकमेकांचे सख्खे चुलत भाऊ. उद्धव ठाकरे हे राजकारणात तसे फारच उशिरा आले. मात्र त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास जाणून घेण्यासारखा आहे. चला तर जाणून घेऊया संयुक्त महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्याबद्दल संपुर्ण माहिती.

संयुक्त महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माहिती |Uddhav thackeray biography in marathi

पूर्ण नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे
जन्म2 जुलै 1960 रोजी जन्म
जन्मस्थानमुंबई , महाराष्ट्र
वडिलांचे नावबाळासाहेब ठाकरे
आईचे नावमीनाताई ठाकरे
पत्नीचे नावरश्मीताई ठाकरे
अपत्येआदित्य ठाकरे, तेजस ठाकरे
राजकीय पक्षशिवसेना
निवास स्थानमातोश्री,बांद्रा, मुंबई, महाराष्ट्र
मुख्य संपादकसामना
राष्ट्रीयत्व   भारतीय
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात संयुक्त महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 27 जुलै 1960 साली महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बाळासाहेब ठाकरे व आईचे नाव मीनाताई ठाकरे होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आपल्या तीन भावंडांमध्ये सर्वात लहान होते. त्यांच्या सर्वात मोठ्या बंधूंचे नाव बिंदूमाधव ठाकरे होते तर दुसऱ्या बंधूंचे नाव जयदेव ठाकरे होते. उद्धव ठाकरे यांचे वडील अर्थात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ख्यातनाम व्यंगचित्रकार तर आई मीनाताई ठाकरे गृहिणी होत्या.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शालेय शिक्षण बालमोहन विद्यामंदिर येथून पूर्ण झाले. तर पुढील महाविद्यालयीन शिक्षण जे.जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स मधून पूर्ण केले. व इथूनच त्यांनी कला शाखेची पदवी मिळवली. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचा प्रमुख विषय हा फोटोग्राफी होता.

उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवनाविषयी सांगायचे झाल्यास त्यांचा जन्म हा राजकीय, सामाजिक विचारसरणी असलेल्या कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे हे ख्यातनाम व्यंगचित्रकार तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रादेशिक पक्षाचे म्हणजेच शिवसेना या पक्षाचे प्रमुख होते. उद्धव ठाकरे यांचा जन्मानंतर बरोबर 6 वर्षांनी शिवसेना या प्रादेशिक पक्षाचा जन्म झाला (शिवसेना स्थापना दिवस 19 जून 1966). व बाळासाहेब ठाकरे या नावाचे वलय महाराष्ट्रातील मराठी जनतेवर रुजले गेले.

मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी निर्माण झालेल्या शिवसेना पक्ष

मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी निर्माण झालेल्या शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आपले बीजे रोवण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात मुंबईच्या बाहेर पाऊल न टाकणारी शिवसेना नंतरच्या काळात ठाणे महानगरपालिकेत दिमाखाने उभी राहिली. एकीकडे शिवसेना हा पक्ष विस्तारला जात होता व बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मराठी जनतेवर विश्वास निर्माण करत होते. बाळासाहेबांच्या सोबतीला त्या काळात छगन भुजबळ,मनोहर जोशी, नारायण राणे, प्रमोद नवलकर यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांची फौज होती.

शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले

1990 च्या काळात शिवसेना या पक्षाने संयुक्त महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली. भारतीय जनता पक्षाच्या साह्याने शिवसेनेने राज्यात सत्ता परिवर्तन घडविले व 1995 च्या विधानसभेत शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. राज्यातील सत्ता परिवर्तनामध्ये महत्त्वाचे योगदान असलेले नेते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन हे होते. 1990 च्या दशकात बाळासाहेब ठाकरेचे उत्तरअधिकारी म्हणून त्यांचे पुतणे राज ठाकरे यांच्या नावाची चर्चा राहायची तेव्हा उद्धव ठाकरे हे फारसे राजकारणात सक्रिय नव्हते एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांचे वय वाढत चालले होते तेव्हा आई मीनाताई ठाकरेंच्या विनंतीवरून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रत्येक बैठकीत हजेरी लावण्यास सुरुवात केली.

राज ठाकरे शिवसेनेच्या निर्णय प्रक्रियेतून हळूहळू बाजूला पडत गेले

उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेच्या मोर्चात सहभाग नोंदवला व त्यानंतर पक्षात त्यांचे प्रस्थ वाढले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा त्यांच्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडे कामासंदर्भात पाठविण्यास सुरुवात केली त्यानंतर उद्धव ठाकरेंना कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमाचे आमंत्रण येण्यास सुरुवात झाली. असे मानले जाते की शिवसेनेत उद्धव यांची निर्णय प्रक्रिया 1997 साली झालेल्या मुंबई महानगरपालिकेत दिसून आली .परिणामी उद्धव यांनी तिकीट वाटपात हस्तक्षेप केला व राज ठाकरे शिवसेनेच्या निर्णय प्रक्रियेतून हळूहळू बाजूला पडत गेले.

1999 च्या संयुक्त महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेना-भाजप युतीचा पराभव झाला. तिकीट वाटतात वरिष्ठ नेत्यांचे मत निर्णय प्रक्रियेत सहभागी करून न घेतल्याने नारायण राणे नाराज होते. कालांतराने उद्धव ठाकरेचे शिवसेनेतील प्रस्थ वाढत चालले होते. 2002 च्या मुंबई महानगरपालिकेतील विजयाने उद्धव ठाकरेंचे नेतृत्वगुण सिद्ध झाले. एकीकडे उद्धव ठाकरे शिवसेनेवर आपली पकड मजबूत करत होते. तर एकीकडे राज ठाकरे, नारायण राणे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते निर्णय प्रक्रियेतून बाजूला पडत होते.

शिवसेना या पक्षाचा पुढील वारसदार कोण होणार

2003 साली महाबळेश्वर येथे शिवसेना पक्षाचे अधिवेशन झाले. व या अधिवेशनात शिवसेना या पक्षाचा पुढील वारसदार कोण होणार हे ठरणार होते. या अधिवेशनात स्वतः राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा पुढील वारसदार म्हणून घोषित केले व त्या निर्णयावर बाळासाहेब ठाकरेनी मोहर उमटवली. व त्यानंतर शिवसेनेत नव्याने तयार झालेल्या कार्यकारी अध्यक्ष या पदावर उद्धव ठाकरे विराजमान झाले.

नारायण राणे यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर शिवसेना पक्षातील खदखद बाहेर येऊ लागली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंनी उद्धव ठाकरेवर बाळासाहेबांना भेटू दिले जात नाही हा टपका ठेवला. तसेच निवडणुकीच्या काळात तिकीट मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागतात हा आरोप केला. त्यानंतर खुद बाळासाहेब ठाकरे यांनी या आरोपाचे खंडन करत 2005 साली नारायण राणेची शिवसेना पक्षातून हकालपट्टी केली. या धक्क्यातून बाहेर येण्यापूर्वीच राज ठाकरेंनी शिवसेना नेत्यापदाचा राजीनामा दिला व 2005 साली शिवसेनेला सोडचिट्टी दिली.

‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ या नव्या प्रादेशिक पक्षाची स्थापना

राज ठाकरेंनी शिवसेना पक्षाला सोडचिट्टी दिल्यानंतर महाराष्ट्राचा दौरा केला व त्यानंतर मुंबईत 9 मार्च 2006 साली ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ या नव्या प्रादेशिक पक्षाची स्थापना करून शिवसेनेसमोर आव्हान निर्माण केले. राज ठाकरे, नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेना संपणार असे अनेक राजकीय तज्ञ सांगत होते. पण उद्धव ठाकरेंनी अत्यंत संयमपणे परिस्थिती हाताळत 2007 साली झालेल्या मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेला सत्ता मिळवून दिली व मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर बसविला.

या निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरेचे नेतृत्व गुण सिद्ध झाले त्यानंतर 2009 साली संयुक्त महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. शिवसेना-भाजप युतीसमोर तत्कालीन आघाडी सरकार म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे आव्हान होते. व त्याचबरोबर राज ठाकरेंचा ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ हा पक्ष आपला प्रभाव पाडत होता.

शिवसेनेने आपले राज्यातील विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद गमावले

या निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरेचे नेतृत्वगुण पणाला लागले होते. पण या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचा पराभव झाला व तत्कालीन आघाडी सरकार (काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष) पुन्हा सत्तेत आले. या निवडणुकीत शिवसेनेला राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा जोरदार फटका बसला. या पक्षाने शिवसेनेचा पारंपारिक मतदार म्हणजेच मराठी माणूस काही प्रमाणात आपल्याकडे वळविला तसेच मुंबई-ठाणे-नाशिक या शहरी पट्ट्यात शिवसेनेला खिंडार पाडले.

परिणामी मुंबई-ठाणे-नाशिक या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही व शिवसेना राज्याच्या सत्ता केंद्रातून बाहेर फेकली गेली. तसेच 2009 साली झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेला भारतीय जनता पार्टी पेक्षा कमी जागा मिळाल्या व त्यानंतर शिवसेनेने आपले राज्यातील विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद देखील गमावले. या निवडणुकीत प्रथमच उतरणाऱ्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तब्बल 13 ठिकाणी आमदार निवडून आले.

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले

या सर्व घडामोडीनंतर उद्धव ठाकरे अत्यंत संयमाने शिवसेनेला राज्याच्या राजकारणात पुढे नेत गेले. भारतीय जनता पक्षाच्या मदतीने शिवसेनेने तत्कालीन आघाडी सरकारवर सिंचन घोटाळ्याचे आरोप लावले. त्यानंतर 2012 साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या मदतीने मुंबई महानगरपालिकेतील आपली सत्ता राखली. 2013 साली भारतीय जनता पक्षाने पुढील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील असे जाहीर केले.
त्यानंतर देशात 2014 साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत प्रथमच शिवसेनेच्या इतिहासात सर्वाधिक 19 खासदार निवडून आले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेस प्रणित आघाडीला बाजूला करून केंद्रातील सत्ता मिळवली व नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले.

लोकसभा निवडणुकी पाठोपाठ राज्यात विधानसभेचे बिगुल वाजले. युतीत नेहमी प्रथम ठिकाणी राहणारी शिवसेना विधानसभेच्या जागावाटप प्रश्नावरून आक्रमक होती पण भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या मागण्या धुडकावत शिवसेनेबरोबर असलेली युती तोडली. पण अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी आपल्यातील संयमीपणा दाखवत विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची धुरा एक हाती हाताळत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला तब्बल 63 आमदार जिंकून दिले. मोदी लाटेत देशातील अनेक प्रादेशिक पक्षाची अधोगती झाली. पण शिवसेना पक्ष मोठ्या दिमतीने मोदी लाटेत देखील उभा राहिला 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष 122 जागा जिंकत अग्रस्थानी होता.

हे सुध्दा वाचा:संयुक्त महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनाविषयी माहिती

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले

विधानसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसची bargaining power कमी करत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला व शिवसेनेच्या साह्याने देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. राज्यातील सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेला भारतीय जनता पक्षातील नेते दुय्यम वागणूक देतात हा आरोप शिवसेनेतील नेते उद्धव ठाकरे कडे मांडू लागले. पण राज्यातील राजकीय परिस्थिती बघता उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेचा गाडा चालविला.

राज्यातील सत्तासंघर्षातील वाद टोकाला असतानाच 2017 साली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक बिगुल वाजले. राज्यात सत्तेत एकत्र असताना सुद्धा शिवसेनेने महानगरपालिकेत भाजपची काडीमोड करत एकट्याने निवडणूक लढवली व जिंकली देखील. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे मातब्बर नेते उतरवले होते. या सर्वांचा हेतू एकच शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेतून खाली खेचणे. पण उद्धव ठाकरे यांनी अत्यंत सामस्यस, निर्भयपणे आपल्या पक्षाचे धोरण राबविले व मुंबई महानगरपालिकेतील सत्ता मिळवली.

लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा केंद्रातील सत्ता राखली

देशातील राजकारणात नरेंद्र मोदीच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्षाची घोडदौड यशस्वीपणे पुढे चालत होती. व अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी च्या नेतृत्वात 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा केंद्रातील सत्ता राखली त्यानंतर होऊ घातलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या विधानसभेतील निवडणुकात भाजपने शिवसेनेबरोबर युती करून आघाडीला पक्षाला ( काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष) आव्हान दिले.

संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा युती जागावाटपात भारतीय जनता पक्ष नंबर एकचा पक्ष होता. निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीला प्रचंड बहुमत मिळाले. या युतीला तब्बल 161 जागा मिळाल्या (भारतीय जनता पक्ष 105) (शिवसेना 61) 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला देखील जोरदार यश मिळाले. या यशाचे खरे मानकरी होते राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसेन शरद पवार.

उद्धव ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

2019 च्या निवडणूक निकालानंतर शिवसेना पक्षाची बार्गेनिंग पॉवर वाढली होती. व हेच उद्धव ठाकरेंनी वेळेत ओळखले. त्यानंतर सत्ता वाटपात ठरल्याप्रमाणे पदाचे सम-समान वाटप व्हावे ही मागणी शिवसेनेत जोर धरू लागली. पण भारतीय जनता पक्षाने ही मागणी मान्य केली नाही. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाची काडीमोड करत काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाबरोबर शिवसेनेचा घरोबा केला.

त्यानंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या पक्षाची मिळून महाविकास आघाडीची स्थापना केली व त्या आघाडीच्या गटनेतेपदी उद्धव ठाकरेची निवड झाली. त्यानंतर 28 नोव्हेंबर 2019 ला उद्धव ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

आपल्या सुरवतीच्या काळात ‘दैनिक सामना’ या वृत्तपत्राचे कामकाज उद्धव ठाकरे बघत त्यानंतर शिवसेनेतील निवडणुकी संदर्भात कामकाजात लक्ष घालत 2012 साली बाळासाहेब ठाकरेचे निधन झाल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून कार्यकाळ कार्यभार स्वीकारला. उद्धव ठाकरे यांच्या स्वभावात त्यांच्या वडिला इतका आक्रमकपणा, बेधडकपणा नसतानाही त्यांनी अत्यंत हुशारीने शिवसेनेला राज्यातील सत्तेच्या केंद्रस्थानी ठेवले. हाच उद्धव ठाकरेच्या नेतृत्वगुणाचा विजयच म्हणावा लागेल.

WHO ने देखील महाराष्ट्र राज्याचे कौतुक केले

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात अनेक यशस्वी योजना राबविल्या. त्यामध्ये उद्योग जलप्रभाग या योजनेचा समावेश आहे. कोरोना महामारीच्या काळात राबविल्या जाणाऱ्या योजनांची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. WHO ने देखील महाराष्ट्र राज्याचे कौतुक केले. तसेच मुंबई हायकोर्टाने देखील कोरोना हाताळणीचे राज्य सरकारचे काम देशात अग्रस्थानी आहे. यामुळेच उद्धव ठाकरे देशातील होणाऱ्या लोकप्रिय मुख्यमंत्री सर्वेक्षणात पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये येतात. उद्धव ठाकरेंनी नुकतीच आपल्या मुख्यमंत्रीपदाची दोन वर्षे पूर्ण केली आहेत. व त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्य अधिक विकसित होईल ही आस आहे.

उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाविषयी

उद्धव ठाकरे यांचा वैवाहिक जीवनाविषयी सांगायचे झालास त्यांचा विवाह हा रश्मी ठाकरे यांच्यासोबत झाला आहे. या दांपत्याला दोन मुले आहेत त्यापैकी एक आदित्य ठाकरे आणि दुसरा तेजस ठाकरे. रश्मी ठाकरे या दैनिक सामना व मार्मिकच्या संपादिका आहेत आदित्य ठाकरे हे वरळीतून आमदार म्हणून निवडून आले आहे व ठाकरे मंत्रिमंडळात पर्यटन मंत्री म्हणून काम पाहत आहेत. तेजस ठाकरे हा वन्यजीव संशोधक आहे. सध्याच्या घडीची लोकप्रिय नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा समावेश होतो. उद्धव ठाकरेंना फोटोग्राफीची आवड आहे व त्यावर त्यांनी पुस्तके देखील प्रकाशित केली आहे त्यामधील एक महाराष्ट्र देश आणि पहावा विठ्ठल अशी आहेत.

Note: जर तुमच्याकडे Biography of Uddhav thackeray in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Uddhav thackeray biography information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button