नॅशनल क्रश असलेली भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना विषयी माहिती |Smriti mandhana biography in marathi

मित्रांनो भारतात क्रिकेटचे लाखो चाहते आहेत. येथे तुम्हाला छोट्या गल्लीपासून ते मोठमोठ्या शहरापर्यंत क्रिकेट खेळणारे लोक दिसतील. सामना कोणताही असो मॅच एकदा सुरु झाली की टीव्हीसमोरुन न उठणारे देखील मोठ्या संख्येत पाहायला आपल्याला मिळतात.पण जेव्हा आपण या क्रिकेटमधील महिलांबद्दल बोलतो तेव्हा फार कमी लोकांना त्याबद्दल माहिती असते. पण महिला क्रिकेटनेही काही वर्षात बरीच ओळख निर्माण केली आहे.

आज आम्ही तुम्हाला भारतीय महिला क्रिकेट संघाच्या अशाच एका खेळाडूबद्दल सांगणार आहोत, जिने ही प्रतिमा बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आम्ही बोलत आहोत डाव्या हाताची फलंदाज जी नॅशनल क्रश सुध्दा आहे जिचं नाव आहे स्मृती मानधना (Smriti mandhana). चला तर जाणून घेऊया तिच्याविषयी संपूर्ण माहिती.

नॅशनल क्रश असलेली भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना विषयी माहिती |Smriti mandhana biography in marathi

स्मृती मानधना जन्म आणि वैयक्तिक जीवन

भारतीय क्रिकेटर स्मृती मानधना हीचा जन्म जन्म 18 जुलै 1996 रोजी मुंबई (महाराष्ट्र) येथे झाला. तिच्या आईचे नाव स्मिता आणि वडिलांचे नाव श्रीनिवास मानधना आहे. तिच्या कुटुंबात आई-वडिलांशिवाय एक भाऊ श्रावण आहे. स्मृती दोन वर्षांची असताना तिचे आईवडील सांगलीतील माधवनगर येथे स्थायिक झाले. स्मृतीने तिचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील एका खासगी शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिने चिंतामण राव कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. तेथून तिने कॉमर्स शाखेतील पदवी यशस्वीरित्या मिळवली.

स्मृतीला क्रिकेटची आवड लागली जेव्हा ती तिच्या भावाला क्रिकेट खेळताना पाहायची. तिच्या भाऊ महाराष्ट्राच्या 15 वर्षांखालील संघाकडून खेळला होता. तेव्हापासूनच स्मृतीने यातच करिअर करण्याचा विचार केला होता. स्मृती अवघी 11 वर्षांची असताना तिची अंडर-19 संघात निवड झाली.या क्षेत्रात स्मृती यांचे कुटुंब आधीच विभक्त झाले होते. त्यामुळे स्मृतीलाही फारसा त्रास झाला नाही. स्मृतीची निवड झाल्यावर तिच्या वडिलांनी तिच्या क्रिकेटची, आईने आहाराची आणि भावाची सरावाची जबाबदारी घेतली.

स्मृती मानधना डोमेस्टिक करिअर

क्रिकेटपटू स्मृतीने ऑक्टोबर 2013 मध्ये गुजरातविरुद्ध 150 चेंडूत नाबाद 224 धावा करत देशांतर्गत सामन्यात नाव कमावले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी स्मृती ही पहिली खेळाडू ठरली. त्यानंतर 2016 मध्ये महिला चॅलेंजर ट्रॉफीमध्ये इंडिया रेडकडून खेळताना मंधानाने 3 अर्धशतके झळकावली. यात तिने अंतिम फेरीत संघाला विजय मिळवून देण्यासाठी केलेल्या 62 धावांच्या खेळीचा समावेश आहे.

स्मृती मानधना आंतरराष्ट्रीय कारकीर्द

क्रिकेटपटू स्मृतीने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. स्मृतीने 10 एप्रिल 2013 रोजी बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय सामन्याने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ऑगस्ट 2014 मध्ये वर्म्सले पार्क येथे इंग्लंडविरुद्ध तिने कसोटीत पदार्पण केले. या कसोटीच्या दोन्ही डावात स्मृतीने 22 आणि 51 धावांचे योगदान दिले.

हे सुध्दा वाचा:- भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

स्मृती विश्वचषक 2017 पासून लोकांना कळली जेव्हा स्मृतीने इंग्लंडविरुद्ध क्वालिफायर सामन्यात 90 धावांची मौल्यवान खेळी खेळली. यानंतर तिने वेस्ट इंडिजविरुद्धही 106 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. स्मृति मानधनाचे नाव हे त्या खेळाडूंच्या यादीत होते ज्यांनी संघाला अंतिम फेरीत नेण्यात मोठे योगदान दिले.

स्मृती मानधनाच्या अतुलनीय विक्रम तुम्हाला माहित आहे का?

  • महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा (84 सामने) करणारी 9वी महिला खेळाडू.
  • महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके (22) झळकावणारी जगातील दुसरी महिला खेळाडू.
  • वनडे क्रिकेटमध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावा करणारा सहावी खेळाडू.
  • कसोटी सामन्यात पहिल्या विकेटसाठी भागीदारी करणारी चौथी महिला खेळाडू (शेफाली-स्मृती – 167 धावा).
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 90 धावा करणारी जगातील चौथी महिला खेळाडू.
  • वनडेमध्ये एका मालिकेत सर्वाधिक (2) शतके झळकावणारी दुसरी महिला खेळाडू.
  • सर्वात कमी (39) शून्यावर बाद होणारी जगातील पाचवी महिला खेळाडू.
  • वनडेमध्ये चौथ्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करणारा तिसरा खेळाडू (184 धावा).

राहुल द्रविडचा खास संबंध आहे?

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची स्मृती मंधानाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका होती. ही भूमिका कोणत्याही टिप्स देण्याची नसून त्याच्या बॅटची होती. 2013 मध्ये स्मृतीने 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत गुजरातविरुद्ध 224 धावा केल्या होत्या. ती बॅट दुसऱ्या कोणाची नसून राहुल द्रविड यांची होती.

खरं तर या सामन्यापूर्वी जेव्हा स्मृती यांच्या भावाला द्रविडला भेटण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने द्रविडकडे त्याच्या बहिणीसाठी बॅट मागितली होती आणि राहुलने त्याला त्याच्या किटमधून बॅट भेट दिली होती. या बॅटवर त्याने आपला ऑटोग्राफही दिला. या बॅटने स्मृतीने अंडर-19 मध्ये गुजरातविरुद्ध द्विशतक झळकावले.

नॅशनल क्रशच्या फिटनेसचे रहस्य काय आहे?

क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजीच नाही तर स्मृती मानधना चाहत्यांच्या मनावर राज्य करते. ती नेहमीच साध्या स्टाईलमध्ये दिसते. ती जास्त मेकअप वापरत नाही. एका मुलाखतीत स्मृतीने याबाबत सांगितले होते की, तिला मेकअप करायला आवडत नाही. स्मृती फिट राहण्यासाठी रोज अंडी आणि प्रोटीन शेक पिते. ती एक दिवसही जिम चुकवत नाही हे तिच्या सुंदर चेहऱ्याचे रहस्य आहे.

स्मृती मानधना यांची एकूण संपत्ती किती आहे?

मंधानाने आतापर्यंत 6 हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या असून तिचा समावेश सर्वात श्रीमंत महिला खेळाडूंमध्ये झाला आहे. स्मृती मानधना यांची एकूण संपत्ती 33 कोटींहून अधिक आहे.

Note: जर तुमच्याकडे Biography of Smriti mandhana in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Smriti mandhana information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button