फक्त स्मार्टफोनच नाहीतर, चार्जरलाही आग लागू शकते, तुम्ही पण करत आहात का या 5 चुका? |5 Mistakes People Make While Charging Their Mobile Phone

मित्रांनो स्मार्टफोनला आग लागण्याच्या अनेक घटना समोर येतात. पण काहीवेळा युजर्सची काही निष्काळजीपणा यामागील कारण बनते. मात्र नुकतेच एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाच्या फोन चार्जरला आग लागली. ही घटना प्रत्येकासाठी धक्कादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत स्मार्टफोनची योग्य काळजी घेण्यासोबतच चार्जरचीही काळजी घेणे आवश्यक आहे.आज आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत की कोणत्या गोष्टीमुळे चार्जर ला आग लागू शकते.

फक्त स्मार्टफोनच नाहीतर, चार्जरलाही आग लागू शकते, तुम्ही पण करत आहात का या 5 चुका? |5 Mistakes People Make While Charging Their Mobile Phone

चुकीचे चार्जर वापरणे

अनेकदा लोक फोन चार्ज करण्यासाठी कोणतेही चार्जर, केबल किंवा अडॅप्टर वापरतात. असे करणे धोकादायक ठरू शकते. स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी युजर्सला ज्या कंपनीचा मोबाईल आहे त्याच कंपनीचा चार्जर वापरण्याचा सल्ला दिला जातो. बरेच युजर्स पैसे वाचवण्यासाठी लोकल कंपनीचे चार्जर वापरतात. एक गोष्ट लक्षात ठेवा कधी पण लोकल कंपनीचे चार्जर वापरु नका.

चार्जिंग करताना फोन वापरणे

चार्जिंग दरम्यान फोनची बॅटरी गरम होते. फोन चार्जिंग दरम्यान फोनवर बोलणे, गेमिंग, डाउनलोड किंवा व्हिडिओ पाहणे. यामुळे मोबाईल आणि चार्जरला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

बॅटरीकडे लक्ष द्या

स्मार्टफोनची बॅटरी खराब होऊ लागली की ती लगेच फुगते. अशा स्थितीत अनेक यूजर्स स्मार्टफोनच्या पूर्ण बॅटरीकडे लक्ष देत नाहीत. अशा स्थितीत स्मार्टफोन चार्ज करणे धोकादायक ठरू शकते.

स्मार्टफोन गरम होणे

कधीकधी हवामानाच्या स्थितीमुळे स्मार्टफोनचे तापमान जास्त असू शकते. मोबाईल जास्त उन्हात किंवा गरम जागी ठेवल्यास तो गरम होऊ शकतो. आणि यामुळे चार्जिंगनंतर फोनमध्ये मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

हे सुध्दा वाचा:- लेजर इंटरनेट तंत्रज्ञान म्हणजे काय? आणि ते कसे कार्य करते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

स्मार्टफोन चार्जिंग स्टेशन

अनेक युजर्स फोन चार्ज करण्यासाठी जागेची काळजी घेत नाहीत. फोन चार्ज होत असताना त्याला उष्णता मिळेल अशा ठिकाणी ठेवतात. ही गोष्ट सुध्दा आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. युजर्सना सल्ला दिला जातो की तो चार्ज होत असताना फोन बेडवर किंवा उशीखाली ठेवू नये.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button