जगातील सर्वात महाग फळाबद्दल तुम्हाला माहित आहे का? |Most expensive fruit of the world information in marathi

मित्रांनो फळे आणि भाजीपाल्याचे भाव वाढले की लगेच बातम्या सुरु होतात. दर वेळेस शेतकऱ्याच आणि मध्यमवर्गीय माणसाचं मरण होत. पण मित्रांनो जगात अशी काही फळे आणि भाज्या आहेत ज्यांची किंमत ऐकल्यानंतर प्रश्न पडेल की, लोक त्या का खातात. असेच एक फळ म्हणजे युबरी खरबूज (Yubari King melon). हे जगातील सर्वात महाग फळ आहे. त्याची किंमत इतकी जास्त आहे की चांगली त्यात एक आलिशान कार येऊ शकते. सर्वात मनोरंजक गोष्ट अशी आहे की, त्या फळाला खूप मागणी आहे. जपानचे काही श्रीमंत लोकं ते आवर्जून खातात. आज आपण या पोस्टमध्ये या फळाबद्दल जाणून घेणार आहोत.

जगातील सर्वात महाग फळाबद्दल तुम्हाला माहित आहे का? |Most expensive fruit of the world information in marathi

जपानचे हे लक्झरी फळ आहे

जगात अनेक प्रकारची फळे आणि भाज्या आढळतात. यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. काही फळे आणि भाज्या देखील आहेत जे त्यांच्या गुणधर्मांपेक्षा जास्त किंमतीमुळे चर्चेत राहतात. अशा फळांमध्ये युबरी खरबूजाची गणना केली जाते. हे जगातील सर्वात महाग फळ मानले जाते. रिपोर्ट्सनुसार, त्याची प्रति किलो किंमत 20 लाख रुपये झाली आहे. हे फळ फक्त जपानमध्ये घेतले जाते आणि ते एक लक्झरी फळ मानले जाते. त्याची किंमत इतकी जास्त आहे की, तेथील स्थानिक बाजारपेठेत किंवा सुपरमार्केटमध्ये सहज उपलब्ध होत नाही. हे फक्त ऑर्डर करून मागवावे लागतात.

अतिशय नाजूक फळ आहे

हे फळ जपानमध्ये इतक्या कमी प्रमाणात पिकवले जाते की ते बाहेर कुठेही पाठवता येत नाही. युबरी खरबूज हरितगृहांमध्ये सूर्यप्रकाशाखाली उगवले जातात. हे खरबूज प्रथम युबारी शहरात उगवले गेले, त्यानंतर त्याचे नाव युबरी खरबूज (Yubari melon) पडले. तेथील हवामान या खरबूजासाठी योग्य आहे. हे खरबूज अतिशय नाजूक असतात. त्यांची लागवड करण्यापासून ते साठवण्यापर्यंत खूप मेहनत घ्यावी लागते. जेव्हा ते विकले जातात तेव्हा परिपूर्ण खरबूज (melon) फक्त विक्रीसाठी जाते.

हे सुध्दा वाचा:- ‘हे’ आहे जगातील सर्वात श्रीमंत गाव, स्थानिक लोकांकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे?

आरोग्यासाठी खूप फायदेशीर

युबरी खरबूजाचे अनेक फायदे आहेत जसे की डीहायड्रेशन कमी करणे, प्रतिकारशक्ती वाढवणे, रक्तदाब कमी करणे, जळजळ कमी करणे आणि त्वचेसाठी चांगले असणे. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स कॅन्सरचा धोका कमी करतात असेही म्हटले जाते.मित्रांनो आशा करतो की world’s most expensive fruit of the world information in marathi हि माहिती आवडली असेल.

Note – मित्रांनो असेच रोचक आणि एज्युकेशनल माहितीसाठी तूम्ही आपल्या Facebook, Instagram आणि YouTube चॅनलला नक्की भेट द्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button