जपानच्या ‘या’ टॉप विद्यापीठांमध्ये जास्त करुन भारतीय विद्यार्थी प्रवेश घेतात, जाणून घ्या संपूर्ण माहिती |Is it possible for Indian students to apply for studies in Japan after class 12th?

मित्रांनो परदेशात शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जपान हा चांगला देश आहे. जपान ( Japan) हे आधुनिक जीवनशैली, चालीरीती आणि परंपरांसाठी ओळखले जाते. जागतिक स्तरावर जाहीर करण्यात आलेल्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये जगातील सर्वोच्च विद्यापीठांच्या यादीत एकूण 51 जपानी विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये टोकियो विद्यापीठ जागतिक स्तरावर 28 व्या क्रमांकावर आहे. यामुळेच येथे शिक्षण घेणे हे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना जपानमध्ये अभ्यास करण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

जपानच्या ‘या’ टॉप विद्यापीठांमध्ये जास्त करुन भारतीय विद्यार्थी प्रवेश घेतात, जाणून घ्या संपूर्ण माहिती |Is it possible for Indian students to apply for studies in Japan after class 12th?

बर्‍याच देशांप्रमाणे, जपान देखील विद्यार्थ्यांना पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पदवी प्रदान करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इतर देशांतील 3 लाखांहून अधिक विद्यार्थी जपानी विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी येतात. जपानमध्ये शिक्षण घेण्याचे कारण म्हणजे तेथील विद्यापीठांची उत्तम शिक्षणपद्धती तर आहेच, शिवाय रोजगाराच्या भरपूर संधीही आहेत. जपानची विद्यापीठे शिक्षणात तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रातही खूप पुढे आहेत. भारतीय विद्यार्थी 12वी नंतर जपानमध्ये शिकण्यासाठी अर्ज करू शकतात.

जपानमधील Top 10 विद्यापीठे कोणती आहेत?

  • टोकियो विद्यापीठ (University of Tokyo)
  • क्योटो विद्यापीठ (Kyoto University)
  • ओसाका विद्यापीठ (Osaka University)
  • तोहोकू विद्यापीठ (Tohoku University)
  • नागोया विद्यापीठ (Nagoya University)
  • क्युशू विद्यापीठ (Kyushu University)
  • टोकियो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Tokyo Institute of Technology)
  • होक्काइडो विद्यापीठ (Hokkaido University)
  • सुकुबा विद्यापीठ (University of Tsukuba)
  • केयो विद्यापीठ (Keio University)

येथील प्रवेश प्रक्रिया काय आहे?

जपानमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून अभ्यास करण्यासाठी, तुम्हाला विद्यापीठातील अभ्यासक्रम निवडणे आवश्यक आहे. IELTS सारख्या परीक्षा द्या जी भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये शिकण्यासाठी आवश्यक आहे. यासह विद्यापीठाचा अर्ज, वैयक्तिक माहिती आणि शिफारस पत्रे यासारखी कागदपत्रे तयार लागतात. विशेष बाब म्हणजे जपानमधील शिक्षण शुल्क इतर विकसित देशांच्या तुलनेने कमी आहे.

हे सुध्दा वाचा:- एखादी व्यक्ती किती वेळा आणि किती वयापर्यंत NEET परीक्षा देऊ शकते? जाणून घ्या नियम काय आहेत?

जपानमधील जेवण कसं आहे?

मित्रांनो जपानमध्ये सध्या खूप थंडी आहे. या ठिकाणी जास्त करून उकडलेले अन्न खाल्ले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बिस्किटे, मिठाई आणि नाशवंत बेकरी वस्तू सोबत ठेवाव्यात. तसेच या ऋतूत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी उबदार कपडे सोबत ठेवावेत. मित्रांनो आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल.

Telegram Grouplink
WhatsApp Channellink
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button