एखादी व्यक्ती किती वेळा आणि किती वयापर्यंत NEET परीक्षा देऊ शकते? जाणून घ्या नियम काय आहेत? |How many times can attempt neet exam in marathi

मित्रांनो NEET म्हणजेच राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा, NEET ही देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवीपूर्व कोर्सच्या प्रवेशासाठी घेतली जाते. यामध्ये एमबीबीएस, बीडीएस, नर्सिंग, बीएएमएस, बीएचएमएस आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांचा समावेश आहे. वर्ष 2024 मध्ये, NEET परीक्षा 5 मे 2024 रोजी घेतली जाईल. परीक्षेची अधिसूचना ही जानेवारी महिन्यात जारी करण्यात येणार आहे, म्हणजे याचं महिन्यात.

परीक्षेच्या नियमांबाबत सध्या अनेक उमेदवारांच्या मनात अनेक प्रकारचे संभ्रम पाहायला मिळत आहेत. असाच एक प्रश्न म्हणजे, एखादी व्यक्ती NEET परीक्षा किती वेळा देऊ शकते आणि किती वयापर्यंत परीक्षा दिली जाऊ शकते. यासंबंधीचे नियम आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये सांगणार आहोत.

एखादी व्यक्ती किती वेळा आणि किती वयापर्यंत NEET परीक्षा देऊ शकते? जाणून घ्या नियम काय आहेत? |How many times can attempt neet exam in marathi

या परीक्षेसाठी कोणतेही बंधन नाही

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, NEET परीक्षेच्या प्रयत्नांवर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. उमेदवार त्यांना पाहिजे तितक्या वेळा परीक्षेला बसू शकतात. याआधी परीक्षेत केवळ 3 प्रयत्नांना परवानगी होती, पण या नियमाला विरोध झाल्यानंतर प्रयत्नांवरील निर्बंध उठवण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत, NEET मध्ये प्रयत्नांची कमाल मर्यादा नाही.

जर आपण वयोमर्यादेबद्दल बोललो तर ती किमान 17 वर्षे असावी, परंतु कमाल वयोमर्यादेबाबत कोणतेही नियम नाहीत, म्हणजेच कोणत्याही वयोगटातील उमेदवार NEET परीक्षा देऊ शकतो.

हे सुध्दा वाचा:- आता पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार 15000 रुपयेची शिष्यवृत्ती

याआधी परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा 25 वर्षे निश्चित करण्यात आली होती, तर राखीव प्रवर्गासाठी ती 30 वर्षे होती, पण नंतर तीही काढून टाकण्यात आली. याचा अर्थ उमेदवार कोणत्याही वयात कितीही वेळा परीक्षेला बसण्यास पात्र आहेत. मित्रांनो आशा आहे की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल.

Telegram Grouplink
WhatsApp Channellink
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button