नारायणेश्वर मंदिराबद्दल तुम्हाला माहित आहे का? | Narayaneshwar Temple Information in Marathi

मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या नारायणपूर येथील नारायणेश्वर (Narayaneshwar Temple) मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. या मंदिराकडे जाण्यासाठी दुसरा रस्ता म्हणजे साताऱ्यापासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर पुण्याकडे जाताना उजव्या हाताला पूर्वेकडे 8 ते 10 किलोमीटर आत आहे. हे पुरातन शिवमंदिर आजूबाजूच्या डोंगराच्या रांगात आहे.

नारायणेश्वर मंदिराबद्दल माहिती |Narayaneshwar Temple Information in Marathi

मित्रांनो हे मंदिर यादवकाळातील हेमाडपंयी शैलीत व काळ्या दगडात बांधले गेले आहे. या मंदिराच्या खांबावर यादवकाळातील शिलालेख पाहायला मिळतात.

मंदिरात मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गाभारा आहे. खांब असलेल्या मुख्यमंडपात नदी व अर्धस्तंभ आहेत. पण या ठिकाणी छप्पर अस्तित्वात नाही. या मंदिराच्या सभामंडपात एक मोठा धातूचा नंदी आहे. मुख्य व गाभाऱ्याच्या दरवाज्यावर कोरीव काम केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांनी दिलेल्या सोन्याच्या शिवलिंग सुद्धा या गाभाऱ्यात स्थापित आहे. या शिवलिंगाच्या खाली ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक असलेले त्रिपिंडगुप्त शिवलिंग आहे.

या मंदिराचे शिखर विटांचे व भुलेश्वर मंदिराच्या शिखराशी साम्य दर्शवणारे आहे. या शिखराला घुमट व अनेक गोपुरे आहेत. शिखराच्या दर्शनी भागावर भव्य व सुंदर नागांचा फणा कोरला आहे.

मंदिराच्या बाह्य भिंतीवर सुंदर असे आडव्या पट्ट्यांचे नक्षीकाम केलेले आहे. या मंदिराला मोठे आवार आहे. या आवारात औदुंबराचा एक जुना वृक्ष आहे. त्यालाही पुजले जाते. मंदिरासमोर एक दीपमाळा सुद्धा आहे.

हे मंदिर घानव व वेकरी नदीच्या संगमावर वसलेला आहे. या मंदिरावर 13वा शतकात हिसामुद्दिनने अनेक वेळा आक्रमण केले होते. या मंदिराजवळ या मंदिराजवळच दत्ताचे मंदिर आहे. हे मंदिर सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. नारायणेश्वर मंदिर खूप कमी लोकांना माहित आहे. मित्रांनो या मंदिराबद्दल जाणून घेणे खूप महत्त्वाचा आहे.

हिंदू संस्कृती जपण्यासाठी आपल्याला प्रत्येक मंदिराच्या इतिहासाबद्दल माहीत असणं खूप महत्त्वाचा आहे.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan_Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button