फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करायचं आहे? मग ही पोस्ट तुमच्यासाठी |How to update Aadhaar address proof for free in marathi

मित्रांनो आधार कार्ड हे आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. आता प्रत्येक कामांसाठी आधार कार्ड हे लागतच. आजच्या काळात रेल्वे तिकीट बुक करण्यापासून कोणतेही सिम खरेदी करण्यापर्यंत आधार आवश्यक आहे. आधार कार्ड हा आपल्या बायोमेट्रिक तपशीलांशी जोडलेला आहे. याशिवाय त्यात आपला घरचा पत्ता, जन्मतारीख, वडिलांचे नाव समाविष्ट आहे. पण एखाद्या वेळेस आपल्याला घराचा पत्ता, चुकीची जन्मतारीख किंवा नावामध्ये चुकी असल्यास ते आपल्याला कधी ना कधी अपडेट तर करावेच लागेल.

यावर उपाय म्हणून, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार अपडेट करण्यासाठी मोफत सेवा सुरू केली आहे. ही सेवा या महिन्याच्या अखेरीस संपणार आहे. नंतर तुम्हाला आधार अपडेट करण्यासाठी 50 रुपये मोजावे लागणार आहे. आता तुम्हाला वाटेल फक्त पन्नास रुपये साठी कुठ करायचं0अपडेट नंतर निवांत करु . अरे पण मित्रा 50 रुपये मध्ये एका दिवसाचे पेट्रोल येते.

फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करायचं आहे? मग ही पोस्ट तुमच्यासाठी |How to update Aadhaar address proof for free in marathi

UIDAI ने कळवले आहे की ज्या सर्व आधार वापरकर्त्यांनी 10 वर्षांपासून त्यांचे आधार अपडेट केलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर त्यांचे आधार अपडेट करावेत. जर कोणत्याही युजर्सनी त्यांचे आधार अपडेट केले नाही तर त्यांना भविष्यात सरकारी सुविधा मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

तुम्ही किती काळ मोफत आधार अपडेट करू शकता?

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने म्हटले आहे की कोणतेही आधार वापरकर्ते केवळ 14 सप्टेंबरपर्यंत आधार अपडेट करू शकतात. याबाबत UIDAI ने म्हटले आहे की, यूजर्स आधार अपडेट फक्त ऑनलाइन करू शकतात. जर त्याने आधार केंद्रावर जाऊन अपडेट केले तर त्याला 50 रुपये शुल्क द्यावे लागेल. चला तर काय प्रोसिजर आहे आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्यासाठीची जाणून घेऊया.

हे सुध्दा वाचा:- सरकारच्या या 5 योजनांबद्दल तुम्हाला माहित आहे का? जे तुम्हाला चांगले परतावा देऊ शकतात

याप्रमाणे आधार अपडेट करा

  • तुम्हाला तुमच्या आधार क्रमांकाद्वारे https://myaadhaar.uidai.gov.in/ वर लॉग इन करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला ‘document update’ चा पर्याय निवडावा लागेल. येथे तुम्हाला तुमचा आधार तपशील दर्शविला जाईल.
  • आता तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करा आणि हायपर-लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर, ड्रॉपडाउन सूचीमधून ओळखीचा पुरावा आणि पत्त्याच्या पुराव्याची कागदपत्रे निवडा.
  • आता तुम्हाला तुमची नवीन कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर ते UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होतील.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button