स्मार्टफोन ॲप्स अनइन्स्टॉल करण्यापूर्वी हे काम करा, नाहीतर काही खर नाही… |How to uninstall any app that doesn’t show up on the menu?

मित्रांनो अँड्रॉईड (Android) फोनमध्ये ॲप्स इन्स्टॉल करण्याची प्रक्रिया सोपी आहे. पण फोनवरून ॲप्स अनइन्स्टॉल करणे तितके सोपे नाही. तुम्ही देखील अशा युजर्सपैकी एक आहात ज्यांना ॲप अनइंस्टॉल (app uninstall) करणे हे एक टॅपचे काम वाटते? जर तुमचं उत्तर होय असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी. खूप कमी युजर्सना याची जाणीव आहे की ॲप अनइंस्टॉल करण्यापूर्वी ॲपमधून लॉग आउट करणे आणि मंजूर केलेल्या सर्व परवानग्या काढून टाकणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

स्मार्टफोन ॲप्स अनइन्स्टॉल करण्यापूर्वी हे काम करा, नाहीतर काही खर नाही…|How to uninstall any app that doesn’t show up on the menu?

ॲप अनइंस्टॉल करण्यापूर्वी हे काम आवश्यक करा?

ॲप अनइंस्टॉल (App uninstall) करण्यापूर्वी तुम्ही ॲपमधून लॉग आउट करणे आवश्यक आहे. यानंतर ॲपला दिलेल्या सर्व परवानग्या, कॅशे डेटा, लोकेशन, कॉन्टॅक्ट, मीडिया फाइल्स, मायक्रोफोनची माहिती काढून टाकणे आवश्यक आहे.

यासाठी तुम्ही फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ॲप सिलेक्ट करून हा महत्त्वाचा डेटा काढून टाकू शकता. जर तुम्ही फोनवरून कोणतेही ॲप अनइंस्टॉल केले असेल आणि परवानगी हटवायला विसरला असेल तर काळजी करण्याची गरज नाही. ॲप अनइंस्टॉल केल्यानंतरही ॲपची परवानगी हटवली जाऊ शकते.

हे सुध्दा वाचा:- स्मार्टफोन ओव्हरहीट होणे म्हणजे नेमकं काय ? तुमचा फोन पण ओव्हरहीट होत असेल तर, या स्टेप्स फॉलो करा

ॲप अनइंस्टॉल केल्यानंतर हे काम आवश्यक करा?

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये यावे लागेल.
  • आता खाली स्क्रोल करा आणि Google वर टॅप करा.
  • येथे तुम्हाला Google Apps साठी सेटिंगच्या विभागात यावे लागेल.
  • येथे कनेक्ट केलेले ॲप्स तपासावे लागतील.
  • Connected apps वर क्लिक करण्यासोबतच तुम्ही ज्या ॲप्सना परवानगी दिली आहे ते पाहू शकाल.
  • ॲप परवानगी हटवण्यासाठी ॲपपवर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर Remove access टॅप करून ते हटवावे लागेल.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button