काय म्हणता! PDF फाईलमुळे फोन आणि लॅपटॉप हॅक होऊ शकते? जाणून घ्या काय आहे ही भानगड |Pdf files can hack your pc and smartphone

मित्रांनो डिजिटल जगात सायबर गुन्हेगार सतत हॅकिंगच्या नवनवीन पद्धती वापरतात. हॅकर्स हॅकिंगसाठी अशा पद्धती वापरतात ज्याद्वारे मोठ्या युजर्सना टार्गेट केले जाऊ शकते. डिजिटल जगात काम करताना इंटरनेट युजर्सला फायलींच्या विविध स्वरूपांची आवश्यकता असते. पण मित्रांनो मार्केटमध्ये एक नवीन स्कॅम आला आहे पीडीएफ स्कॅम (pdf scam) नावाचा. हो मित्रांनो या पीडीएफ मुळे तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप हॅक होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया काय आहे ही भानगड.

PDF फाईलमुळे फोन आणि लॅपटॉप हॅक होऊ शकते? जाणून घ्या काय आहे ही भानगड |Pdf files can hack your pc and smartphone

कोणती फाईल हॅक केली जाऊ शकते?

  • फाईल फॉरमॅटचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे PDF. अनेक युजर्स महत्त्वाची माहिती फक्त PDF स्वरूपात ठेवतात. पण तुम्हाला माहिती आहे का? हे फाइल स्वरूप तुमचे डिव्हाइस हॅक करण्यासाठी जबाबदार असू शकते. हा आमचा नसून सायबर हॅकिंगसंदर्भात नुकत्याच आलेल्या अहवालाचा दावा आहे.
  • मीडिया रिपोर्ट्सनुसार असा दावा एका ग्लोबल सायबर सिक्युरिटी फर्मने केला आहे. जागतिक सायबर सुरक्षा फर्म पालो अल्टो नेटवर्क्सच्या अलीकडील अहवालात पीडीएफ फाइल्स (PDF file) सायबर हॅकिंगसाठी जबाबदार आहेत.
  • या अहवालानुसार ईमेल अटॅचमेंटमध्ये पीडीएफ फाइल फॉरमॅटसह युजरच्या डिव्हाइसमध्ये मालवेअर टाकला जात आहे. टारगेट युजर्सच्या डिव्हाइसमध्ये मालवेअरच्या प्रवेशासाठी PDF फाईलचा वापर केला जात आहे.

ईमेल संलग्नक असलेली PDF फाइल किती असुरक्षित आहे?

रिपोर्टनुसार ईमेल अटॅचमेंटमध्ये सापडलेल्या 10 पैकी 6 पीडीएफ फाइल्सना मालवेअरचा धोका आहे. एवढेच नाही तर या पीडीएफ फाईल्स डिव्हाईसमध्ये एंट्री करून डिव्हाइस सहजपणे हॅक केले जाऊ शकते. बर्‍याच वेळा युजर्सला माहितीही नसते आणि हॅकरला त्याचा डेटा रिमोट ऍक्सेस असतो.

हे सुध्दा वाचा:- MicroLED म्हणजे काय? ते इतर एलईडी पेक्षा किती वेळ आहे? आणि कोणती कंपनी हे तंत्रज्ञान वापरते

पीसी आणि फोन हॅकिंगपासून कसे वाचवायचे?

  • पीसी (PC ) किंवा फोनवर (phone )कोणत्याही अज्ञात वेबसाइटवरून PDF डाउनलोड करणे टाळा. विशेषत: अनोळखी मेलद्वारे प्राप्त झालेली कोणतीही फाईल डाउनलोड करू नका.
  • फोन किंवा लॅपटॉपमध्ये मालवेअरचा प्रवेश रोखण्यासाठी डिव्हाइसमध्ये अँटी-व्हायरस सुविधा ठेवा.
  • पीसी आणि फोन नेहमी अपडेट ठेवा.

Note 2 – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button